मारोडे कुटुंबाची बहुविध पिकांची प्रयोगशील शेती

मध्यंतरी दहा वर्षे मारोडे यांनी सेंद्रिय शेतीही केली. शेतात जनावरे बसवून शेणखताच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारला. जमिनीतील सेंद्रीय कर्ब दीड टक्क्यावर नेला. मात्र क्षेत्र व कुटुंबहा मोठे असल्याने व्यावसायिकदृष्ट्या एकात्मिक शेतीचा अंगीकार केला
हळदीचे पीक दरवर्षी घेतले जाते. या वर्षी दोन एकरांत त्याचे केलेले सेंद्रिय व्यवस्थापन
हळदीचे पीक दरवर्षी घेतले जाते. या वर्षी दोन एकरांत त्याचे केलेले सेंद्रिय व्यवस्थापन

बुलडाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यात नवनवीन प्रयोग करणारे व विविध पिकांची लागवड करणारे शेतकरी म्हणून पळशी झाशी येथील मारोडे कुटुंबाची पंचक्रोशीत अोळख अाहे. केवळ आठ ते दहा एकरांवरून त्यांनी आपली शेती १३० एकरांवर नेली आहे. आजच्या काळात तीन भावांचे कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र नांदते आहे.   बुलडाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील मारोडे कुटुंब शेतीत नवनवे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मारोडे कुटुंबाची शेती

  • सुरवातीची शेती होती ८ ते १० एकर-
  • शेतीतीलच उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने वाढवत- आजची शेती सुमारे १३० एकर
  • शेतीबरोबरच पूरक व्यवसायातही सहभाग
  • तीन बंधूंचे एकत्रित कुटुंब, एकूण सदस्य- सुमारे ३२
  • मनोहर रामभाऊ मारोडे- पेशाने शिक्षक, आता शेती करतात.
  • गुलाबराव रामभाऊ मारोडे- पूर्णवेळ शेती
  • तेजराव रामभाऊ मारोडे- अर्थशास्त्रात पदव्युत्तर-
  • शेतीतील ठळक बाबी

  • सन १९९० च्या दशकात मारोडे कुटुंबाने संग्रामपूर तालुक्‍यात सर्वात प्रथम ठिबक सिंचन केले.
  • पारंपरिक पिकांसोबतच केळी, फूलशेती, सफेद मुसळी, पपई, ऊस आदींकडे लक्ष दिले.
  • मध्यंतरी दहा वर्षे सेंद्रिय शेतीही केली. शेतात जनावरे बसवून शेणखताच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारला. जमिनीतील सेंद्रीय कर्ब दीड टक्क्यावर नेला. मात्र क्षेत्र व कुटुंबहा मोठे असल्याने व्यावसायिकदृष्ट्या एकात्मिक शेतीचाच अंगीकार केला.
  • मारोडे यांची आजची मुख्य पिके सफेद मुसळी-

  • सुमारे सात ते आठ एकर. संग्रामपूर तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी अाहे. सातपुड्यात वनौषधी मोठ्या प्रमाणात पूर्वी अाढळत होत्या, यापैकीच सफेद मुसळीची शेती सुरू करून गेली अनेक वर्षे हे पीक टिकवले अाहे.
  • त्याचे उत्पादन- एकरी- दोन ते अडीच क्विंटल (वाळवलेले)
  • दर- किलोला ४०० रुपयांपासून ते १२०० व कमाल २५०० रुपये.
  • -या पिकात काही वेळा पेमेंटच्या बाबत फसवणुकीचेही अनुभव आले.
  • कापूस-

  • या भागात कापसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. मारोडे दरवर्षी ४० ते ४५ एकरांत कापूस लावतात. -यंदा १९ एकरांत बीटी- उत्पादन- एकरी १५ क्विंटल
  • २६ एकरांत देशी कापूस-उत्पादन- १० क्विंटल
  • देशी कपाशीत रसशोषक किडीस पाते फूलगळ, लाल्या यांचा त्रास कमी असल्याने त्याच्या लागवडीस प्राधान्य.
  • हळद- काही वर्षांपासून या पिकात सातत्य ठेवले आहे. सात एकरांत पीक. एकरी उत्पादन- सुमारे २० क्विंटल- वाळवून विविध पिकांचे प्रयोग मारोडे कुटुंबाने आजपर्यंत विविध पिकांचे प्रयोग केले. काही पिके यशस्वी झाली. काही फेल गेली. काही पिकांपासून उत्पादन सुरू व्हायचे आहे. त्यांची ही झलक.

  • डाळिंब- सहा एकर- मात्र अलीकडे दर नसल्याने या पिकात नुकसान होत आहे.
  • गावरान अावळा- तीन -३ एकर-
  • केळी- पूर्वी हेच मुख्य पीक होते. आता क्षेत्र ३ एकर
  • साग- ४ एकर- पाच पासून दहा वर्षे वयाची झाडे
  • सोयाबीन, उडीद +तूर, गहू, हरभरा, शाळू, मका, कांदा हंगामानुसार
  • संत्रा- ८ एकर-
  • कडुनिंबाची सुमारे ४५० झाडे
  • पाण्याचे काटेकोर नियोजन सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला हा भाग पूर्वी जलसंपन्न होता. काळानुरूप पाण्याची पातळी खालावली अाहे. त्यामुळे अधिक पाण्याची पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर अाली अाहे. मारोडे पूर्वी केळीची मोठ्या क्षेत्रावर लागवड करीत. आता मात्र केळीचे क्षेत्र कमी करावे लागले आहे. शेतीला लागणारे पाणी मिळवण्यासाठी तीन वेगवेगळ्या तलावांमध्ये साठवण क्षमता तयार केली. सोबतच अाठ विहिरी व पाच ट्युबवेल उभारले. पाण्याचा वापर ठिबक व तुषार पद्धतीनेच केला जातो. नवीन पिढीचे शेतीत पाऊल कुटुंबातील नव्या पिढीचे अरविंद मनोहर मारोडे केळीची जबाबदारी सांभाळतात. त्यांचे सख्खे बंधू अभयसिंह यांनी एमए एएडपर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र नोकरी न करता कडकनाथ, गिरिराज कोंबड्या व शेळीपालनची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या व्यवसायात ते कार्यरत आहेत. गुलाबराव यांचा मुलगा प्रताप कृषी पदवीधर झाला असून नाशिक येथील एका संस्थेत तो कार्यरत आहे. त्याने सेंद्रिय शेतीत लक्ष घातले अाहे. त्यातूनच यंदा मारोडे कुटुंब दोन एकरांत सफेद मुसळी व हळद सेंद्रिय पद्धतीने पिकवत अाहे. प्रतापने नाशिक जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या नागलीचीही लागवड केली आहे. हे पीक आमच्या भागात येऊ शकते असा विश्वास त्याला आहे. कुटुंबातील संग्राम इंजिनिअर असून हार्डवेअरचा व्यवसाय त्याने सुरू केला आहे़, तर शेखर एमबीबीएस असून एमडीचे शिक्षण घेत अाहे. सामाजिक कार्यात अग्रेसर

  • गुलाबराव शेतीबरोबरर सामाजिक कार्यातही पुढे असतात. काही व्यक्तीं, संस्था यांच्या माध्यमातून
  • सामुदायिक विवाह उपक्रमांतही त्यांनी आपला वाटा उचलला. गेल्या काही वर्षांत त्यातूनच सुमारे एक हजार विवाह पार पडल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिरे, व्यसनमुक्ती शिबिरे
  • आदींमध्येही ते सक्रिय असतात. या कामांचे मोठे समाधान मिळते, अशी त्यांची धारणा आहे.
  • पुस्तकप्रेमी गुलाबराव

  • गुलाबरावांना पुस्तकांची मोठी आवड आहे. घरात पाचशेहून अधिक पुस्तके असल्याचे ते सांगतात.
  • एकवेळ हाॅटेलात जाऊन खाण्यासाठी पैसे घालवण्यापेक्षा मी पुस्तके विकत घेणे पसंत करेन, असे ते मिस्कीलपणे म्हणतात.
  • अनेकांना हमखास रोजगार गुलाबराव सांगतात की आमची सर्व प्रगती शेतीवरच झाली आहे. कुटुंबाला त्यातूनच मानसन्मान मिळाला. आज शेतीत पाच कायमस्वरूपी मजूर आहेत. तर सुमारे ४० ते ४५ जणांना हमखास रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. संपर्क- गुलाबराव मारोडे, पळशी झाशी ७७७४९२०५०३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com