agricultural success story in marathi, agrowon, parabhani, k.t.apet | Agrowon

उपयुक्त जैविक घटकाच्या वापरातून वाढली पीक गुणवत्ता
माणिक रासवे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

यंदाच्या हंगामातही परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अगदी पहाटे रांगा लावून बायोमिक्स उत्पादनाला प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या हंगामात आजवर सुमारे ४५० क्विंटलची विक्री झाली आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वनस्पती विकृतीशास्त्र विभागातील संशोधन प्रकल्पांअंतर्गत विविध लाभदायक बुरशी व जिवाणूंचे मिश्रण करून बहुपयोगी जैविक घटकाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या या घटकाचे प्रयोग विद्यापीठात सुरू आहेतच. शिवाय
अनेक शेतकरीदेखील विविध पिकांत त्याचा वापर करून त्याचे निष्कर्ष अजमावत आहेत. पिकाची रोगप्रतिकारक्षमता व गुणवत्ता वाढवण्यास त्याचा उपयोग होत असल्याचे शेतकरी स्वानुभवाने सांगतात.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध निविष्ठांची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वनस्पती विकृतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. के. टी. आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली २००७ पासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध लाभदायक बुरशी, जिवाणू यांचा एकत्रित समावेश असलेल्या जैविक घटकाची निर्मिती केली आहे. बायोमिक्स असे त्याचे नामकरण केले असून कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता ते नाममात्र दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या घटकाचे निष्कर्ष शेतकऱ्यांच्या शेतावरी अभ्यासले जात आहेत.

उत्साहवधर्क प्रतिसाद
हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा (ता. वसमत) येथील शेतकऱ्यांकडील हळद पिकांवरील मररोग विविध कीडनाशकांच वापर करूनही नियंत्रणात येत नव्हता. तेथील शेतकरी डाॅ. आपेट यांच्याकडे आले. त्यांनी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत निर्मीत बायोमिक्स वापरण्याचा सल्ला दिला.
त्याचा वापर केला असता मररोग नियंत्रणात आल्याचे आढळले.

शेतकऱ्यांच्या अनुभवातून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून या जैविक घटकाला मागणी वाढत चालली आहे. कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू, शिक्षण संचालक डाॅ. विलास पाटील, संशोधन संचालक डाॅ. दत्तप्रसाद वासकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. गोखले, वनस्पती विकृती विभाग प्रमुख डॉ. डी. एन. धुतराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत या घटकाची निर्मिती केली जात अाहे.

नाममात्र दरात शेतकऱ्यांना उपलब्ध
या उत्पादनात लाभदायक जीवाणूंच्या सहा तसेच लाभदायक बुरशींच्या सहा प्रजातींचे मिश्रण आहे. जीवाणूखतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जीवाणूंबरोबरच रोगांना आटोक्यात ठेवणाऱ्या ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास आदी सूक्ष्मजीवांचाही याच समावेश आहे. उत्पादनात ‘कॅरिअर’ म्हणून टाल्कम पावडरचा वापर केला आहे. एक किलो वजनाच्या पॅकिंगसाठी केवळ शंभर रुपये नाममात्र दर ठेवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद
विविध पिकांमध्ये सध्या शेतकरी या जैविक घटकाचा वापर करीत असून त्यांना आलेले निष्कर्ष विद्यापीठाकडून अभ्यासले जात आहेत. शेतकऱ्यांकडून मागणी वाढल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या दररोज एक टन एवढी निर्मिती होते. प्रयोगशाळेतूनच विक्री केली जाते. सन २००७ ते आत्तापर्यंत सुमारे ८०० मे.टन एवढ्या या घटकाची विक्री झाल्याचे डॉ. आपेट यांनी सांगितले. गेल्यावर्षी गुजरातमधील एका कंपनीला तीन टन पुरवठा करण्यात आला. एका खासगी बियाणे कंपनीने बीजोत्पादन कार्यक्रमासाठी ३० क्विंटल तर सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने डाळिंबासाठी १० क्विंटलएवढी खरेदी केली. हिंगोली जिल्ह्यात आत्मा अंतर्गंत स्थापन करण्यात आलेल्या सेंद्रिय शेती गटांनादेखील त्याचा पुरवठा करण्यात आला.

शेतकऱ्यांचे अनुभव
हळद, केळी, पपई या पिकांसाठी गेल्या दोन वर्षांपासून बायोमिक्सचा वापर करत आहे. त्यातून रोगांना अटकाव करणे शक्य झाले आहे. एकूण व्यवस्थापनाची जोड मिळाल्याने हळदीचे अडीच एकरांत ७४ क्विंटल उत्पादन मिळाले. हुमणी अळीचा त्रासही कमी झाला आहे.
शिवाजी देशमुख- ९९७०६७०३६९
पार्डी, ता. अर्धापूर, जि. नांदेड

अत्यंत कमी खर्चामध्ये पिके रोग-किडीमुक्त ठेवणे शक्य होत आहे. प्रतिएकरी ४ ते ५ किलो या प्रमाणात त्याची आळवणी केली जाते. पिकांची वाढही जोमाने होत आहे. त्यामुळे एकूण व्यवस्थापनात त्याचा फायदा होऊन उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ मिळत आहे. या घटकाचा वापर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, हदगांव या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. डाॅ. आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली हळद, कापूस या पिकात त्याचा वापर केला. हळद रोगमुक्त आहे.
एस. के. खानसोळे- ९४२०४१४१४०
तालुका तंत्रज्ञान समन्वय व्यवस्थापक (आत्मा)
हदगांव, जि. नांदेड.

हळद, आले, पपई या पिकांसाठी अनेक वर्षांपासून मी या उत्पादनाचा वापर करीत आहोत. बीजप्रक्रिया तसेच फवारणी केल्यामुळे हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळलेला नाही. उत्पादनात १० ते २० टक्के वाढ झाली आहे.
विठ्ठलराव जवंजाळ- ९४२१३८६६३२
नांदगाव, ता. जि. परभणी

 
गेल्या तीन वर्षांपासून हळदीसाठी या जैविक घटकाचा वापर करीत आहे. यंदा चार एकर हळदीत ते वापरले. हळदीवरील मररोगाच्या नियंत्रणासाठी बाजारातील कीटकनाशकांच्या ड्रेंचिंगसाठी एकरी ३००० ते ३५०० रुपये खर्च येतो. या घटकाच्या वापराने एकरी ५०० रुपये केवळ खर्च लागतो. फवारणीवरील खर्च कमी होऊन उत्पादनदेखील वाढले आहे.
प्रल्हाद मुटकुळे
सुलदरी बुद्रुक, ता. सेनगाव, जि. हिंगोली

 
गेल्या तीन वर्षांपासून कापूस आणि हळदीसाठी ठिबकद्वारे बायोमिक्स देतो. पिकाचे व्यवस्थापनदेखील मी चांगले ठेवले आहे. पूर्वी हळदीचे एकरी १६ ते १८ क्विंटल उत्पादन मिळायचे. आता ते  २२ ते २४ क्विंटलपर्यंत पोचले आहे.
माउली वानखेडे - ९८२२२३०८०४
पूर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली
.
 
या उत्पादनाच्या वापरामुळे हळदीला हुमणी, मर लागत नाही. पांढऱ्या मुळींची संख्या वाढते. पीक हिरवेगार राहते. उत्पादनात वाढ होते. हळद शिजविल्यानंतर वाळलेल्या हळद कांड्या जड भरतात. साहजिकच दर चांगला मिळतो.
उत्तमराव राऊत, हयातनगर,
गोविंद नादरे, माळवटा
शेषराव भालेराव, दारेफळ
गजनान दुधाटे, सारोळा
(सर्व शेतकरी वसमत तालुक्यातील)

संपर्क- प्रा. डाॅ. के. टी.आपेट-  ९४०४५९२७९३

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’पुणे : सोयाबीनचे कोसळेले भाव, तूर-मुगाची वेळेत न...
लोकभावनेच्या दबावामुळे कर्जमाफीत काही...नागपूर : कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिवाळीआधी...
अखेर ‘डीबीटी’ धोरण जिल्हा परिषद सेस...पुणे  : राज्यात जिल्हा परिषदांमधील सेस...
साखर उद्योगाबाबत केंद्राशी वाटाघाटी करानागपूर : शेतकरी संघटना उसाला ३,५०० रुपयांची मागणी...
गोंदिया 11.5 अंशांवरपुणे : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा...
सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला ः...औरंगाबाद: आलटून पालटून सत्ता भोगण्याचे सत्ताधारी...
भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर...
बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागा...सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात गेल्या तीन...
कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश...नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
बोंडअळीग्रस्तांना मदतीसाठी रॅपरची अट...नागपूर ः बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना...
कीडरोग सर्व्हेक्षकांना टाकणार काळ्या...नागपूर : कीडरोग सर्व्हेक्षकांनी आपल्या विविध...
विदर्भासाठी कृषी विभागाचा ॲक्‍शन प्लॅननागपूर ः कापूस आणि सोयाबीन उत्पादक पट्टयात रेशीम...
मदतीअभावी राज्यातील सूतगिरण्यांना घरघर...सोलापूर ः कापसाचे वाढलेले दर, सरकारचे कुचकामी...
उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणीउसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्याने लहान...
उपक्रमशीलता असावी तर चांगदेवच्या...जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गाव परिसरातील...
सेंद्रिय भाजीपाल्यासाठी थेट मिळवले...नागपूरचे रहिवासी असलेल्या सुनील कोंडे या...
अर्थकारण सुधारणारी तरुणाची एकात्मिक...एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केल्यानेच सराफवाडी...
कृषी आयुक्तालयातील दक्षता पथक प्रमुखाची...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता...
थेट विक्री, प्रक्रियेतून फायदेशीर...दुग्ध व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला आहे. केवळ...
धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग...नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील...