agricultural success story in marathi, agrowon, pune, Dekkan Gymkhana | Agrowon

मातीला कर्बश्रीमंत करणारी भिडे यांची टेरेस शेती
मंदार मुंडले
मंगळवार, 5 जून 2018

टेरा प्रेटा माती तयार होऊ शकते भारतातही

व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट व पुणे येथील महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष अशी जबाबदारी सांभाळणारे सुनील भिडे निसर्गवेडे आहेत. अनेक जंगले, देवरायांमधून ते हिंडले आहेत. ‘टेरेस गार्डनिंग’ विषयातील २५ ते ३० वर्षांचा अनुभव असणाऱ्या भिडे यांचा अॅमेझॉन खोऱ्यातील टेरा प्रेटा माती व तेथील शेती पद्धतीवर गाढा अभ्यास आहे. अत्यंत सुपीक, निरोगी व सेंद्रिय कर्बाने भरपूर अशी ही माती भारतीय शेतकरीही तयार करू शकतो. हीच माती त्याला भविष्यात तारू शकते, असे ते म्हणतात.

दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन जंगलातील ‘टेरा प्रेटा’ माती जगात सर्वाधिक सुपीक मानली जाते. याच शेती पद्धतीचे तंत्र वापरून पुणे येथील सुनील भिडे यांनी आपल्या घराच्या तीन हजार चौरस फुटांच्या टेरेसवर शंभरहून अधिक प्रकारची फळे, भाजीपाला व फुलांची बाग विकसित केली आहे. रासायनिक निविष्ठांचा जराही वापर न करता केवळ जैविक अवशेषांचा वापर करीत आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत नेण्यात ते यशस्वी झाले आहेत.

रसायनांचा अमर्याद वापर, हवामान बदल, बदलत्या शेती पद्धती आदी विविध कारणांमुळे भारतीय जमिनींची प्रत खालावत असून, तिचे वाळवंटीकरण होत असल्याचा धक्कादायक अहवाल ‘इस्त्रो’ या संस्थेने दिला आहे. त्याच वेळी दक्षिण अमेरिकेत वसलेल्या अॅमेझाॅन या घनदाट जंगलखोऱ्यातील ‘टेरा प्रेटा’ प्रकारची माती जगभरातील संशोधक, तसेच शेतकरी यांच्यासाठी प्रचंड कुतूहलाचा व अभ्यासाचा विषय बनली आहे.

टेरा प्रेटा माती समृद्ध का?

 • सेंद्रिय घटकांचे सर्वोच्च प्रमाण. पालाशचे प्रमाण प्रतिकिलो मातीत २०० ते ४०० मिलिग्रॅम.
 • आयन विनियन क्षमता, सामू (पीएच) या घटकांतही माती सरस
 • सेंद्रिय कर्ब (आॅरगॅनिक कार्बन) प्रतिकिलो मातीत १५० ग्रॅम- (१५ टक्के)
 • मातीतील सुपीक घटकांचा थर तब्बल एक ते दोन मीटर खोल

जैवकोळशाने वाढविली सुपिकता
अॅमेझाॅनच्या जंगलात वनस्पती, प्राणी, पक्षी, किडे, मुंग्यांसह जिवाणू, बुरशी आदी सूक्ष्मजीवांच्या विविध प्रजातींची प्रचंड विविधता आढळते. हजारो वर्षांपासून इथल्या मातीला रसायनांचा स्पर्शही झालेला नाही. वर्षानुवर्षे झालेल्या प्रक्रियेद्वारे इथल्या वनस्पतींचे अवशेष, झाडोरा, जनावरे, मासे यांची हाडे यांचे रूपांतर जैवकोळशात झाले. हा कोळसा भौ.ितकदृष्ट्या स्थिर असतो. त्यामुळेच पाऊस, वारा, महापूर किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत इथल्या मातीत तो असंख्य वर्षांपासून टिकून राहिला आहे. त्यामुळेच इथली माती प्रचंड सुपीक झाली असल्याचे निष्कर्ष नोंदवले आहेत.

महाराष्ट्रात ‘टेरा प्रेटा’ टेरेस शेतीचा प्रयोग
व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट व पुणे येथील महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष अशी जबाबदारी सांभाळणारे सुनील भिडे निसर्गवेडे आहेत. अनेक जंगले, देवरायांमधून ते हिंडले आहेत. ‘टेरेस गार्डनिंग’ विषयातील २५ ते ३० वर्षांचा अनुभव असणाऱ्या भिडे यांचा अॅमेझॉन खोऱ्यातील टेरा प्रेटा माती व तेथील शेती पद्धतीवर गाढा अभ्यास आहे. अत्यंत सुपीक, निरोगी व सेंद्रिय कर्बाने भरपूर अशी ही माती भारतीय शेतकरीही तयार करू शकतो. हीच माती त्याला भविष्यात तारू शकते, असे ते म्हणतात. मात्र, केवळ उपदेश करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवावा, हा ध्यास त्यांनी घेतला. पुणे शहरात डेक्कन जिमखाना परिसरातील आपल्या अपार्टमेंटमधील घराच्या तीन हजार चौरस फुटांच्या टेरेसवर त्या पद्धतीने शेतीही सुरू केली. आश्चर्य म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात सर्वाधिक प्रदूषण, ट्रॅ.िफक अशा विविध वातावरणात राहूनही त्यांनी फुलवलेला निसर्ग, जोडीला मधमाशा, गांडूळे, पक्षी, कीटक, विविध सूक्ष्मजीव यांचा अधिवास पाहून थक्क व्हायला होते.

भिडे यांच्या ‘टेरा प्रेटा’ पद्धतीच्या शेतीची वैशिष्ट्ये

 • माती जिवंत, सकस करणे हा मुख्य उद्देश. उत्पादन, विक्री हा हेतू नाही.
 • बारा वर्षांपासून प्रयोग. झाडांचे शंभरपेक्षा जास्त प्रकार.
 • यात केळी, पपई, डाळिंब, झेंडू, पुदिना, लसूण, मोहरी, तांबडा भोपळा, पालेभाज्या, माठ, लिंबू, कढीपत्ता, वांगी, कोथिंबीर, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, शोभिवंत झाडे, बांबू अशी मोठी विविधता.
 • कोणत्याही झाडाला रासायनिक खत, कीडनाशके, संजीवके यांचा वापर नाही. शंभर टक्के सेंद्रिय पद्धत.
 • फवारणी, खुरपणी आदी काही नाही.
 • टेरेसभर झाडाची पाने, पालापाचोळा यांचा गालीचा
 • हाताला लागणारी अत्यंत मऊ, रवाळ, भुसभुशीत माती
 • माती परीक्षणात (२००९) सेंद्रिय कर्ब आढळला नऊ टक्के.
 • विविध पक्षी. त्यांच्यासाठी मलबार तुतीचा निवारा
 • मधमाश्‍यांची एक-दोन पोळी. त्यांच्यासाठी स्वच्छ पाणी व फुलोरा, आग्या मधमाश्‍यांचाही वावर.
 • 'एपीस मेलिफेरा’ मधमाशीनेही ६० फूट उंचीवर पोळे बांधले होते.
 • पिकांमध्ये कृत्रिम परागीभवन करण्याची गरज नाही.
 • विविध भागांतून शेण आणून वापरले जाते. उद्देश म्हणजे तिथली जनावरे जे खाद्य घेतात ते पचवणारे जिवाणू इथे येतात.
 • कचरा खाणाऱ्या ब्लॅक सोल्जर फ्लायचेही कल्चर. इथले तापमान या अळीच्या वाढीस अनुकूल.
 • जमीन उकराल तेथे मोठ्या संख्येने गांडुळे
 • देवराईत आढळणाऱ्या महावेली प्रकारातील दोन प्रकारच्या लियाना. त्यांना भल्या मोठ्या शेंगा लगडतात. जैवविविधतेत त्यांचे मोठे महत्त्व.
 • ठिबकद्वारे पाणी. ‘टायमर’ लावून तेवढेच मोजके पाणी देणारी यंत्रणा.

वर्षाला साडेआठ टन जैविक कचरा
वर्षाला तब्बल साडेआठ टन जैविक कचऱ्याची भिडे यांना गरज भासते. त्यासाठी परिसरातील निवासी इमारती, बंगले, मंगल कार्यालये, भाजीपाला विक्रेते यांच्याकडून अोला, सुका कचरा, ‘हॉट चीप’ निर्मिती केंद्रांमधून केळ्यांची साले ते घेतात. यातून शहरातील कचरासमस्याही काही प्रमाणात कमी केली आहे. अशा कचऱ्यावर प्रक्रिया करण्याविषयीही मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. शहरातील प्रत्येकाने आपल्यासारखे हरित आच्छादन (ग्रीन रूफ) तयार केल्यास तापमानाच्या झळा कमी होण्यास मदत होईल, असे भिडे म्हणतात.

दाभोळकर तंत्राचा प्रभाव
प्रयोगशील परिवाराचे प्रवर्तक श्री. अ. दाभोळकर यांच्या विचारसरणीचा भिडे यांच्यावर प्रभाव आहे. पृथ्वीवर पडणारा सूर्याचा प्रत्येक किरण झाडांवर पडावा, याची दक्षता ते घेतात. दाभोळकर यांचीच तण कुजवून झाडाला देण्याची पद्धत ते वापरतात.

‘टेरा प्रेटा’वर जगभर संशोधन
मृदा व कृषी रसायने विषयातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे म्हणाले, की अॅमेझाॅनमधील ‘टेरा प्रेटा’ मातीत आढळणाऱ्या जैवकोळसा हा जगभरातील संशोधकांसाठी अभ्यासाचा विषय झाला आहे. त्याचा वापर जमीन सुधारणेसाठी कशाप्रकारे होऊ शकतो, यावर काम सुरू आहे. हा कर्ब स्थिर असतो. ज्या वेळी या मातीत काम करणे तेथील शेतकऱ्यांनी थांबवले त्या वेळी तो अधिक साठत गेल्याचे आढळले आहे. त्याच्या वापराने मातीचे जलधारण क्षमता, सुपीकता आदी विविध गुणधर्म वाढू शकतात, असे अभ्यासातून पुढे येत आहे.

कर्ब-नत्र गुणोत्तराचा विपरीत परिणाम नाही
डाॅ. देशपांडे म्हणाले, की जमिनीत केवळ सेंद्रिय कर्ब अधिक वाढून चालत नाही. तर, कर्ब-नत्र गुणोत्तर संतुलित असावे लागते. सेंद्रिय घटक कुजण्यास सुरुवात होते, त्या वेळी कर्बात रूपांतर होण्यासाठी सूक्ष्मजीवांसह ऊर्जा म्हणून नत्र जमिनीतून वापरला जातो. तो कमी झाल्यास पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र, अॅमेझाॅनच्या ‘टेरा प्रेटा’ मातीत जैवकोळशाच्या रूपाने ‘रेडी कार्बन’ उपलब्ध असतो. त्या ठिकाणी कुजवण्याच्या प्रक्रियेसाठी नत्र शोषून घेण्याची गरज भासत नाही. तिथे कर्बाचे प्रमाण वाढल्यास कर्ब-नत्र गुणोत्तर बदलू शकते. मात्र, थेट कर्बाचेच रूप असल्याने पिकावर त्याचा परिणाम दिसू शकणार नाही.

संपर्क- सुनील भिडे- ९४२०४८१७५१

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
कपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...
जिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशा?नगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...
भातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...
'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...
बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...
शेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...
दुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...
कर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...
सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...
चीनला पाच लाख टन साखर निर्यातीच्या...पुणे: राज्यातील अतिरिक्त साखरेची निर्यात चीनला...
ट्रॅक्टरला अनुदान सव्वा लाखच पुणे : देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी पाच...