agricultural success story in marathi, agrowon, raver, jalgaon | Agrowon

रावेरच्या केळींची देश परदेशात हुकूमत
चंद्रकांत जाधव
शनिवार, 5 मे 2018

केळीची उपलब्धता

 • रावेरात केळीची बारमाही लागवड.
 • फेब्रुवारीत तांदलवाडी, सिंगत, मांगलवाडी भागात केळी अधिक कापणीवर.
 • मार्च, एप्रिल व मे-सातपुडा पर्वतालगतच्या चिनावल, एेनपूर, रसलपूर, कुंभारखेडा आणि रावेरच्या दक्षिण भागातील निंबोल, एेनपुरात उपलब्ध.
 • जून व जुलै- दसनूर, वलवाडी, निंभोरा, खिर्डी, मस्कावद, वाघोदा.
 • ऑगस्ट- तापीकाठावरील उदळी, रणगाव, गहूखेडा, रायपूर.

रावेर तालुका (जि. जळगाव) केळीचे आगर मानला जातो. सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून येथील शेतकरी निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत आहेत. त्याचा उत्कृष्ट दर्जा लक्षात घेता अनेक निर्यातदार कंपन्या व व्यापाऱ्यांनी या भागात डेरा मांडला आहे. आखाती देशांबरोबर देशांतर्गत बाजारपेठेतही येथील केळ्यांना चांगली मागणी आहे.

केळी पिकात जळगाव जिल्हा

 •  देशाच्या एकूण उत्पादनात वाटा सुमारे १६ टक्के.
 • सुधारीत तंत्रज्ञान वापरामुळे हेक्‍टरी ७५ टन उत्पादनापर्यंत पोचणे शेतकऱ्यांना झाले शक्य.
 • राज्यात केळीखालील क्षेत्र- सुमारे ८३ हजार हेक्‍टर. यातील ४८ ते ५१ हजार हेक्‍टर क्षेत्र जळगाव जिल्ह्याचे. रावेर तालुक्याचा वाटा जवळपास ५० टक्के. दरवर्षी २१ हजार ते २३ हजार हेक्‍टरवर लागवड.

तंत्रज्ञानाभिमुख शेतकरी
करपा रोगामुळे केळी उत्पादक उद्ध्वस्त झाला. केळी उत्पादकांनी सामूहिक प्रयत्नातून रोगाला थोपविण्यात यश मिळवले. ‘फ्रूट केअर’ तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी सुरू केला. यात योग्य बुरशीनाशकांच्या योग्य फवारण्या, घडाचा दर्जा राखण्यासाठी स्कर्टिंग बॅग्ज, ड्रीप, फर्टिगेशन आदी व्यवस्थापनाचा अंतर्भाव अाहे. शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहेत. निर्यातक्षम घडासाठी नऊ फण्या ठेवल्या जातात.
पॉली मल्चिंग, गादीवाफा, उतीसंवर्धित रोपांचा वापर या नित्याच्या बाबी. सुमारे १८ महिन्यात दोन हंगाम घेणारे शेतकरी तांदलवाडी, केऱ्हाळे, निंबोल भागात आहेत. तांदलवाडीत दरवर्षी एकूण ११ लाख रोपांची लागवड सुधारीत तंत्राद्वारे.

केळीची निर्यात

 • सन २०१४ मध्ये तांदलवाडी, निंबोल, केऱ्हाळे रसलपूर, वाघोदा भागात निर्यातक्षम शेतीवर भर.
 • त्या वर्षी तांदलवाडीमधून एका कंपनीच्या मदतीने २० मे. टन निर्यात बहरीनला.
 • शेतकऱ्यांना २५० रुपये जादा दर क्विंटलमागे मिळाले. प्रेमानंद महाजन, सुनील पाटील व प्रशांत महाजन आदी निर्यातक्षम केळी उत्पादक.
 • सन २०१५ मध्ये रावेरमधून चार कंटनेर (८० टन) तर २०१६ मध्ये कंपनीच्या मदतीने १० कंटनेर निर्यात. सन २०१७ मध्ये सुमारे १२ निर्यातदार कंपन्यांनी रावेरात काम सुरू केले. यातून १०३ कंटेनर निर्यात. यातील ६० कंटनेर एकट्या तांदलवाडीतील. आखातात २०१६ मध्ये सुमारे ९० कंटेनर निर्यात. (बहरीन, इराण, सौदी अरेबिया, अफगणिस्तान आदी मुख्य आयातदार देश). यंदाचे नियार्तीचे दर प्रति क्विंटल पावणेएकरा रू.

यंदाची स्थिती

 • जानेवारी ते आत्तापर्यंत प्रतिदिन २० टन निर्यात आखातात.
 • अमेरिकी कंपनीने तांदलवाडी परिसरातून ८० टन निर्यात आखातात केली.
 • पंजाब, जम्मू व काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान येथेही रावेरातून केळी पाठविली जातात.
 • छत्तीसगड, राजस्थान आणि नागपुरात कमी दर्जाच्या केळीची खरेदी अधिक (क्रेटमधून).
 • काश्मिरातील व्यापारी पाकिस्तानात केळी पाठवितात. यंदा जानेवारी व फेब्रुवारीत प्रति महिना १३५० निर्यात पाकिस्तान व पुढे अफगाणिस्तानात. (सोळा किलो बॉक्स पॅकिंग).

पॅकहाऊसचा फायदा

 • सावदा (ता. रावेर) येथे ३२ पॅकहाऊसेस.
 • जम्मू- काश्मीर, दिल्ली येथील व्यापाऱ्यांची येथे कार्यालये.
 • खरेदीसाठी चिनावल (ता.रावेर) येथे अनेक वर्षांपासून सहकारी फ्रूटसेल सोसायटी शेतकरी चालवित आहेत.
 • सावदासह रावेर, निंभोरा, खिर्डी, निंबोल, वाघोदा आदी ३० ठिकाणी सुमारे ७० खरेदीदारांची कार्यालये.

‘एसएमएस’द्वारे दर

 • दर रावेर बाजार समितीमधील दर नियंत्रण समिती रोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर करते.
 • हे दर दुसऱ्या दिवसाचे असतात. जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये रावेर बाजार समितीच्या दरानुसारच केळीची खरेदी व्यापारी व संस्था करतात. शेतकऱ्यांना रावेर बाजार समितीने एसएमएसद्वारे दर कळवण्याची सुविधा सुरू केली अाहे.

कूलिंग चेंबर
केळीची आवक रावेर बाजार समितीत होत नाही. कारण व्यापारी थेट शेतातून खरेदी करतात. निर्यातीसाठीची केळी शेतातच स्वच्छ धुवून १३ किलोच्या बॉक्समध्ये भरली जाते. तांदलवाडी येथे केळी शीतकरणासाठी खानदेशातील पहिले प्री कूलिंग केंद्र प्रशांत महाजन व प्रेमानंद महाजन या केळी उत्पादकांनी मागील वर्षी सुरू केले. यात ८० टन क्षमतेचे चेंबर आहेत. अत्याधुनिक पॅक हाऊसही उभारले आहे.

केळीचे दर (सरासरी रूपये- प्रति क्विंटल)

 

 • सन २०१६- ८०० रु.
 • सन २०१७- १००० रु.
 • सन २०१८- ९५० रु.
 • फेब्रुवारीत प्रतिदिन १५० ट्रक (प्रति ट्रक १५ टन) केळी रावेरात
 • मार्च ते जूनदरम्यान प्रतिदिन २५० ट्रक. जुलै- ऑगस्टदरम्यान हंगामाची सांगता. या काळात प्रतिदिन सुमारे १९० ट्रक केळी बाजारात उपलब्ध. रावेर तालुक्यातील खरेदीदार मुक्ताईनगर, यावल व चोपडामधूनही खरेदी करतात.

  संपर्क- प्रशांत महाजन-९८९०८१०३५७

 • महाजन बनाना एक्सपोर्ट, तांदलवाडी (जि. जळगाव)

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
अविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...