agricultural success story in marathi, agrowon, riswad, karad, satara | Agrowon

अल्पभूधारक इंगवलेंनी केले रेशीम शेतीतून बळकट अर्थकारण
विकास जाधव
शुक्रवार, 29 जून 2018

किफायतशीर रेशीम शेती
विलास सांगतात, की आम्ही घरचे सहा सदस्य रेशीम शेतीत राबतो. त्यांना बंधूसह आई-वडील, पत्नी स्वाती यांची मोठी मदत मिळते. त्यामुळे मजुरांची मदत शक्यतो घ्यावी लागत नाही. त्यावरील खर्चात बचत होते. साहजिकच उसाच्या तुलनेत रेशीम शेतीतून अधिक फायदेशीर उत्पन्न मिळते.

विलास व विकास या इंगवले बंधूंची (रिसवड, जि. सातारा) एकूण केवळ अडीच एकर शेती आहे. मात्र रेशीमशेती व ऊस यांचा सुरेख मेळ साधून अल्प क्षेत्रातूनही त्यांनी कुटुंबाची आर्थिक घडी सक्षम केली आहे. व्यवसायात सातत्य, मजुरांपेक्षा घरच्याच सदस्यांची मेहनत व नेटके नियोजन यातून उसापेक्षाही रेशीम शेतीच त्यांनी अधिक किफायतशीर केली आहे. सुमारे दहा वर्षांचा या शेतीतील अनुभव त्यांना ‘मास्टर’ बनवून गेला आहे.
सातारा जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात रेशीम कार्यालयाच्या प्रयत्नांतून रेशीम शेतीस चालना दिली जात आहे. त्या माध्यमातून तरुण तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळण्याबरोबरच चांगले अर्थार्जनही होत आहे. त्यातूनच रिसवड (ता. कऱ्हाड) गावात ३५ हून अधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरली आहे.

इंगवले बंधूंची रेशीम शेती
गावात पंधरा वर्षांपूर्वी धनाजी इंगवले व कृष्णत इंगवले यांनी रेशीम शेतीस प्रारंभ केला. त्याचे अर्थकारण फायदेशीर ठरत अाहे असे वाटून धनाजी यांनी गावातील तरुण शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करण्यास सुरवात केली. त्यातूनच विलास व विकास हे इंगवले बंधू रेशीम शेतीकडे वळाले. त्यांची संयुक्त अडीच एकर शेती आहे. त्यामुळे उत्पन्नावर काहीशा मर्यादा येणे साहजिक होते. इंगवले बंधू गावातील अन्य शेतकऱ्यांप्रमाणे ऊसही घ्यायचे. पण त्याचे पैसे मिळायला अठरा महिने लागायचे. वडील महावितरण कंपनीत वायरमनपदी नोकरी असल्याने आर्थिक आधार होता.
मात्र उसाला पूरक व्यवसाय म्हणून विलास यांनी रेशीम शेतीचा पर्याय निवडला.

रेशीमशेती दृष्टिक्षेपात

 • सन २००८ मध्ये जून महिन्यात एक एकर क्षेत्रात तुती लागवडीपासून रेशीम शेतीचा श्रीगणेशा केला. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे दहा वर्षांत त्यात सातत्य ठेवले आहे.
 • सुरवातीला एकच एकर तुती क्षेत्र होते. आता ते दीड एकर आहे. व्ही-१ वाण घेतले जाते.
 • सुरवातीच्या काळात प्रति किलो १६० रुपये दराने १४ हजार रुपये प्रति बॅच दराने पैसे मिळाले.
 • ही रक्कम उसातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त होती. हळूहळू व्यवसायातील अंदाज येऊ लागल्याने उत्साह वाढला. रामनगर तसेच अन्य मार्केटचे अनुभव येऊ लागले.
 • तुती पाल्याची उपलब्धता वाढू लागली. उत्पादन आणि दरातील स्थिरता यामुळे व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेडची संख्या दोनपर्यंत नेली.
 • एक ४३ बाय ३० फूट तर दुसरे ४० बाय २२ फूट आकाराचे शेड आहे.
 • मोठ्या शेडमध्ये सुमारे ३०० अंडीपुंजांची तर छोट्या शेडमध्ये १५० ते २०० अंडीपुंजांची प्रति बॅच असते.
 • वर्षातून सुमारे सात ते आठ बॅचेस घेतल्या जातात.
 • तुतीच्या पाला दर्जात्मक मिळण्यासाठी प्रत्येक वर्षी शेणखत वापरले जाते. रासायनिक खतांचा नाममात्र वापर होतको. पाल्याच्या उलब्धततेनुसार बॅचेसचे नियोजन होते.

उत्पादन, मार्केट व विक्री
विलास सांगतात की प्रति १०० अंडीपुंजांमागे ७० ते ८० किलो कोष उत्पादन मिळते. रामनगर (कर्नाटक) व सांगली शहरापासून जवळ असलेले अथणी या दोन महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. प्रति किलो साधारण २५० रुपये, ३०० रुपये येथे दर मिळतो. गावातील पाच-सहा रेशीम उत्पादकांचा गट करून एकाचवेळी सर्वांचा माल विक्रीस नेला जातो. त्यामुळे वाहतुकीवरील खर्च विभागला जातो. विलास सांगतात, की आम्ही घरचे सहा सदस्य या शेतीत राबतो. त्यांना बंधूसह आई-वडील, पत्नी स्वाती यांची मोठी मदत मिळते. त्यामुळे मजुरांची मदत शक्यतो घ्यावी लागत नाही. त्यावरील खर्चात बचत होते. साहजिकच उसाच्या तुलनेत रेशीम शेतीतून अधिक फायदेशीर उत्पन्न मिळते.

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

 • चाॅकी व्यवस्थापनाची जबाबदारीही इंगवले कुटुंबच करतात. त्यामुळे अळ्यांचे संगोपन उत्तम दर्जाचे होते.
 • सकाळी साडेसात ते ११ व सांयकाळी साडेचार ते सात या कालावधीत तुतीपाला अळ्यांना दिला जातो.
 • उन्हाळ्यात शेडमध्ये गारवा राहण्यासाठी पाचटाचे अच्छादन केले जाते.
 • शेडमधील रॅकची रुंदी साडेसहा फूट असल्याने अळ्याची संख्या चांगली बसते. चंद्रिका उभ्या बसत असल्याने कोषांची प्रतवारी चांगली मिळते.
 • पाणीटंचाई असतेच. उन्हाळ्यातील तीन महिने ही समस्या जाणवतेच. विहीर व बोअरची सुविधा केली आहे.
 • मोठ्या शेडसाठी सुमारे दीड लाख रुपये, तर लहान शेडसाठी एक लाख ३५ हजार रुपये खर्च आला.
 • शासकीय अनुदान एकूण सुमारे सव्वादोन लाख रुपये मिळाले.

मार्गदर्शन
धनाजी आणि कृष्णत इंगवले या रेशीम उत्पादकांचे तसेच रेशीम अधिकारी सी. एस. पाटील यांचे
मार्गदर्शन मिळते. आता काही शेतीही इंगवले यांनी खरेदी केली आहे. शेती बागायत करण्यासाठी विहीर व पाइपलाइन केली आहे.

संपर्क- विलास इंगवले- ८००७२८२४७०
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...