agricultural success story in marathi, agrowon, sanjeev mane | Agrowon

अॅग्रोवनमुळे माझे प्रयोग राज्यभरात विस्तारले : माने
टीम अॅग्रोवन
रविवार, 31 डिसेंबर 2017

सन २०१० मध्ये मला अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत ऊस शेतीमधील प्रयोगाबाबत सात मिनिटे बोलण्याची संधी मिळाली होती. त्यांच्याच निमंत्रणावरून मी अमेरिकेचा दौरा केला. तेथील परिषदेत मी सतरा मिनिटांचे सादरीकरणदेखील केले. हे सर्व केवळ प्रयोगशील शेतीमुळे घडले. त्यामुळे अॅग्रोवन आमचे बळ असून मला मिळालेला हा घरचा पुरस्कार आहे.
- संजीव माने

पुणे : अॅग्रोवनचा मी पहिल्या दिवसापासून वाचक आहे. यातील माहिती वाचून प्रयोगशील शेतीला शास्त्रज्ञ आणि विद्यापीठांमधील तंत्राची जोड दिली. ॲग्रोवनमुळे माझे प्रयोग राज्यभरात विस्तारले आणि त्यामुळेच माझ्यासारखा सामान्य शेतकरी अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी ऊस शेतीच्या प्रयोगावर बोलू शकला, असे उद्गगार ऊस उत्पादक शेतकरी संजीव माने यांनी काढले. तसेच आता आम्हाला २०० टनांचे लक्ष्य गाठायचे असल्याचा संकल्पही व्यक्त केला.

सकाळ माध्यम समूहाकडून दिला जाणारा मानाचा 'अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार' यंदा सांगलीच्या वाळवा भागातील आष्टा गावचे प्रयोगशील शेतकरी संजीव माने यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊस शेतीत शास्त्रज्ञांच्या तोडीचे क्रांतिकारक प्रयोग करणाऱ्या संजीव माने यांनी हजारो सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ऊस उत्पादकता वाढीचे तंत्र पोचविले आहे. पुण्याच्या टिळक स्मारक सभागृहात त्यांना टाळ्यांच्या गजरात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

‘उसाचे माझे पूर्वी एकरी उत्पादन २० टनांचे होते. विविध शास्त्रज्ञांच्या मदतीमुळे मी १२० टनांपर्यंत पोचलो आहे. अॅग्रोवनमधील तंत्र, शास्त्रज्ञांकडून मिळणारी माहिती यामुळे माझी प्रयोगशीलता सतत फलदायी ठरत गेली. आता आम्हाला २०० टनांचे लक्ष्य गाठायचे आहे असे माने यांनाी सांगितले.
 

 

 

 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...