agricultural success story in marathi, agrowon, satmane, malegaon, nasik | Agrowon

संघर्षातून उजळल्या प्रगतीच्या वाटा
दीपक खैरनार
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

नेट व नायलॉन वस्त्राचा वापर
प्रखर उन्हापासून वाचविण्यासाठी थोडक्यात सनबर्निंगची समस्या टाळण्यासाठी रवींद्र पवार यांनी संपूर्ण ४० एकर डाळिंबात व २० एकर द्राक्षात मागील वर्षी बागेवरून नेट आच्छादनाचा यशस्वी प्रयोग केला. मात्र खर्च काही लाख रुपयांवर गेला. मात्र तो कमी करण्यासाठी मुलींच्या ड्रेसवर परिधान केल्या जाणाऱ्या नायलाॅनच्या अोढणी वस्त्राचा वापर कमी खर्चात केला.

एकेकाळी ऊसतोडणी कामगार असलेले रवींद्र धनसिंग पवार यांनी आज प्रगतिशील, अभ्यासू व यशस्वी फळ बागायतदार म्हणून पंचक्रोशीत नाव कमावले आहे. कष्ट, जिद्द, चिकाटी, ज्ञानी वृत्ती, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सहवास आदी गुणांच्या जोरावर त्यांनी चार एकरांवरून आपली शेती ७० एकरांवर नेली आहे. त्यांच्या बागेतील उत्कृष्ट, निर्यातक्षम डाळिंब, द्राक्षांना चढ्या दराने मागणी येत आहे.
 
प्रगतीचा पहिला टप्पा
नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यापासून अवघ्या १८ किलोमीटरवरील सातमाणे येथील रवींद्र धनसिंग पवार यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झालेले. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे चार किलोमीटरवरील रावळगाव साखर कारखान्यात ते ऊस तोडणीसाठी जायचे. त्यावेळी कारखान्यातील व्यवस्थापक संपतराव मोरे फावल्या वेळेत शेतीविषयक कीर्तन करीत. त्यांना पवार हार्मोनियमवर साथ करीत. त्यातूनच मोरे यांच्यासोबत त्यांचे नाते दृढ झाले. मोरे यांनी डाळिंबाच्या लागवडीची प्रेरणा दिली.

दुसरा टप्पा- उभारलेले भांडवल
आपल्या वडिलोपार्जित तीन एकरांत डाळिंबाचे नियोजन केले. सासऱ्यांनी जावयाची जिद्द पाहून पाच एचपी क्षमतेची विद्युत मोटर बसवून देण्यासाठी मदत केली. पवार यांनीही आपल्या मुलाच्या कानातील बाळ्या विकून त्यातील पैशांतून तीस गुंठ्यात डाळिंब लागवडीसाठी खड्डे खोदले.

तिसरा टप्पा
त्याच वर्षी दुष्काळ पडला. अशा परिस्थितीत पवार यांनी परिसरात सुमारे २८ विहिरींचे खोदकाम करून पै पै जमविले. त्यातून घरगाडा आणि डाळिंब शेतीकडे लक्ष दिले. पण खचले नाहीत. दोन वर्षांनी चांगला पाऊस झाला. मेहनतीला फळ मिळाले. त्या काळात मिळालेले अकरा हजार रुपयांचे उत्पन्न आत्मविश्वास वाढवणारे ठरले. सन १९९६ मध्ये तीन एकरांत डाळिंब लावले.

चौथा टप्पा
सन २००४ मधे डाळिंबावर तेलकट डाग रोगाने थैमान घातले होते. पवार यांनी त्यावेळी राज्यातील विविध भागांतील डाळिंब उत्पादकांकडे प्रत्यक्ष भेटी देत रोगासंबंधी बारकावे समजावून घेतले. बाग तेलकट डाग रोगमुक्त होण्यासाठी डाळिंबाचा बहार बदलला. रासायनिक खतांच्या मात्रा कमी केल्या. सेंद्रिय व रासायनिक अशा एकात्मिक पद्धतीचा वापर सुरू केला.

पाचवा टप्पा
दरम्यान, मुलेही जाणती झाल्याने त्यांनीही शेतीत लक्ष घालायला सुरवात केली. शेतीला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी परिसरातील बंधाऱ्यातून पाइपलाइनद्वारे पाणी आणले.

आजची पवार यांची प्रगतिशील शेती

  • शेती- सुरूरवातीच्या चार एकरांवरून आज ७० एकर
  • डाळिंब- ४० एकर, द्राक्षे- २० एकर, सीताफळ व पेरू- प्रत्येकी पाच एकर
  • कीडनाशकांचे पीएचआय पाहून अवशेषमुक्त शेती करतात.
  • उत्पादन- एकरी- डाळिंब- ८ ते १० टन, द्राक्षे- १० ते १२ टन
  • प्रत्येकी तीन कोटी लिटरची दोन शेततळी. विहिरी, ठिबक सिंचनाचा वापर
  • दोन अत्याधुनिक फवारणी यंत्रे
  • वरंब्यावरील निंदणीसाठी तसेच तणनाशक फवारणीसाठी गरजेनुसार यंत्र तयार करून घेतले.
  • आठ गीर गायी. शेणस्लरीचा वापर. ती झाडांना देण्यासाठीही गरजेनुसार यंत्र तयार करून घेतले.
  • कायम शेतातच काम करण्याची, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सातत्याने सानिध्यात राहात नवे शिकण्याची वृत्ती
  • राज्य डाळिंब बागायतदार संघाच्या वैज्ञानिक समितीचे पवार सदस्य आहेत.

सर्वोच्च भाव खाणारी फळे
पवार यांनी पिकवलेल्या डाळिंब, द्राक्षांची विक्री स्थानिक भागातीलच निर्यातदार कंपनीला केली जाते. डाळिंबाचे दर सध्या पडलेले आहेत. तरीही यंदा पवार त्यांच्या डाळिंबाला एका व्यापाऱ्याकडून किलोला १०५ रुपये तर दुसऱ्या व्यापाऱ्याकडून ८५ रुपये दर मिळाला. अर्ली छाटणीच्या जंबो सीडलेस या कलर द्राक्षांना किलोला १५५ रुपये व ९५ रुपये असा दर मिळाला. द्राक्षाला दरवर्षी साधारण हेच दर मिळतात. यावरूनच त्यांच्या मालाची गुणवत्ता लक्षात यायला वेळ लागत नाही. परदेशात हा माल निर्यात होतो.

झोपडीतून बंगल्यात
एका ऊसतोड मजुराचा प्रवास प्रगतिशील शेतकरी होण्यापर्यंत झाला. सुमारे बारा वर्षे या कुटुंबाने आपले आयुष्य झोपडीत काढले. आज बंगला बांधण्यापर्यंत यशस्वी मजल मारली. पवार यांना शेतीत सदाभाऊ शेळके यांचे मोठे मार्गदर्शन तर द्राक्षशेतीतील भागीदार प्रमोद मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभते. नीलेश व ज्ञानेश्वर ही मुलेही शेतीत वडिलांचा वारसा चालवतात. महाराष्ट्रातून अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेटी देतात.

नेट व नायलॉन वस्त्राचा वापर
प्रखर उन्हापासून वाचविण्यासाठी थोडक्यात सनबर्निंगची समस्या टाळण्यासाठी संपूर्ण ४० एकर डाळिंबात व २० एकर द्राक्षात मागील वर्षी बागेवरून नेट आच्छादनाचा यशस्वी प्रयोग केला. मात्र खर्च काही लाख रुपयांवर गेला. मात्र तो कमी करण्यासाठी मुलींच्या ड्रेसवर परिधान केल्या जाणाऱ्या नायलाॅनच्या अोढणी वस्त्राचा वापर केला. त्यासाठी गुजरात राज्यातील वापी येथील कंपनीच्या प्रकल्पाला भेट देऊन तेथून मटेरियल आणले. यंदा संपूर्ण डाळिंब व द्राक्षबागेत आच्छादन केले आहे. एकरी केवळ साडे १६ हजार रुपयांमध्ये हे काम झाले. या वस्त्राचा वापर पुढील हंगामातही करणे शक्य असल्याचे पवार म्हणाले. या आच्छादनामुळे सनबर्निंगची समस्या दूर होते. फळांना चांगले शायनिंग येते, थ्रिप्स नियंत्रणात येतो, दोन फवारण्यांमधील अंतर वाढते, फळाची गुणवत्ता सुधारते असे पवार यांनी सांगितले.

संपर्क- रवींद्र धनसिंग पवार - ९८२३०३३६००

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...
`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरूमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही...कोल्हापूर : उर्वरित एफआरपीबाबत साखरेची मागणी...
उसाला प्रतिटन २०० ते २२५ अनुदान मिळणार...नवी दिल्ली : साखर कारखान्यांन्या साखरेच्या...
संत्रा, मोसंबी नुकसानीचा अहवाल द्या ः...नागपूर ः संत्रा, मोसंबी पिकांचा बहुवार्षिक पिकात...
शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर...सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
साखरेच्या विक्री दरात क्विंटलला २००...नवी दिल्ली : साखर विक्रीचा दर २९०० वरून ३१००...
काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात 'सीआरपीएफ'...श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "...
एक रुपयाची लाच घेतल्यास भ्रष्ट...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुण नियंत्रण विभागात...
सांगलीत दुष्काळाच्या तीव्रतेत वाढसांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
शेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...
फूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...
`पॉलिहाउस, शेडनेटधारकांना कर्जमुक्ती...नगर : सरकारची धरसोडीची धोरणे, दुष्काळ,...