agricultural success story in marathi, agrowon, shedshal, shirol, kolhapur | Agrowon

खरिपात वरणा, जानेवारीत ऊस- दोन एकरांतील फायदेशीर पीक पद्धती
राजकुमार चौगुले
बुधवार, 31 जानेवारी 2018

जमीन सुपीकतेला प्राधान्य
शिरोळ तालुक्‍यात क्षारपड जमिनीचा प्रश्‍न मोठा आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कायम राखणे महत्त्वाचे आहे. जमिनीला विश्रांती देण्याबरोबरच सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा शिरढोणे यांचे प्रयत्न सुरू असतात. रासायनिक खतांचा अतिवापर टाळला जातो. माती परीक्षण त्यांनी केले आहे. सेंद्रिय कर्ब ०.६ टक्के आढळला आहे.

शेतीचे क्षेत्र अत्यंत कमी असले, तर त्यातून उत्पन्नाच्या वाटा निर्माण करणे ही शेतकऱ्यासाठी खरी कसोटी असते. कोल्हापूर जिल्ह्यतील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील अशोक शिरढोणे यांनी आपल्या दोन एकरांत खरिपात वरणा व जानेवारीत ऊस असा मेळ घालून शेतीचा फायदेशीर आलेख तयार केला आहे. कायम मागणी असलेले वरणा पीक उसाला भांडवल देऊन जाते असा त्यांचा अनुभव आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका उसासह टोमॅटो, फ्लॉवर, कोबी या भाजीपाला पिकांच्या उत्पादनात पुढारलेला आहे. ऊस, भाजीपाला यांच्यासह वरणा हे पीकही कोल्हापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मात्र अनेक शेतकरी हे पीक उसात घेतात. तसेच पश्‍चिमेकडील डोंगराळ भागात त्याचे अधिक प्रस्थ आहे. शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील अशोक शिरढोणे यांनी मात्र या पिकात चांगली मास्टरी मिळवली आहे. केवळ दोन एकर शेती असूनही शेतीचे अर्थकारण त्यातून मजबूत करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल.

क्षेत्र कमी तरीही स्मार्ट पीक पद्धती

 • क्षेत्र - दोन एकर
 • सध्याचे नियोजन - वरणा व ऊस (एकाड-एक वर्ष)

 मिरचीची लागवड थांबवली
शिरढोणे यांना मिरची पिकातील मोठा अनुभव आहे. परंतु अलीकडील काळात पांढरी माशी व विषाणूजन्य रोगांमुळे प्लॉट वाचवणे त्यांना कठीण होऊ लागले. नुकसान व खर्च वाढू लागला.

 मिरचीला वरणा पिकातून पर्याय शोधला.

 • हंगाम - खरीप.
 • वरणाचे क्षेत्र - सुमारे दीड एकर  जून-जुलैच्या दरम्यान लागवड
 • पंधरा सप्टेंबरच्या सुमारास वरणा निघण्यास प्रारंभ होतो. तो नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत चालतो.
 • एवढ्या क्षेत्रातून मिळणारे उत्पादन - सुमारे दहा टन.
 • मिळणारे उत्पन्न - साडेतीन लाख रुपयांपर्यंत
 • मशागत, मजूर व अन्य खर्च वजा जाता दीड लाख रुपयांपर्यंतचा नफा
 • या पिकात दररोज पाच ते सात मजूर कायम

मार्केट

 • जयसिंगपूर व कुरुंदवाड या हक्काच्या बाजारपेठा.
 • या बाजारपेठांत दर कमी मिळण्याची शक्‍यता वाटू लागल्यास मुंबईला वरणा पाठवला जातो.
 • सुरवातीच्या काळात दर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळतो.
 • डिसेंबरनंतर आवक कमी होऊ लागल्यानंतर हा दर ५५ ते ६० रुपयांपर्यंत मिळतो.

पीक व हंगाम - सुरू ऊस

 • वरणा प्लॉट संपल्यानंतर एक महिना रान पूर्णपणे वाळविले जाते.
 • चार फुटी सरी पाडून को ८६०३२ उसाची लागवड केली जाते.
 • खात्रीच्या स्रोतांकडून बेणे आणले जाते.
 • कूपनलिका व नदी तसेच ठिबक व पाटपाणी यांचाही वापर

ऊस उत्पादन- एकरी ६८ टनांपर्यंत मिळते.

हंगाम - पुढील खरीप- सुरू ऊस किमान एक वर्ष तरी शेतात राहतो. तो काढणी केल्यानंतर पुढील खरिपात पुन्हा वरणा पिकाची लागवड

या पीक पद्धतीचा महत्त्वाचा फायदा
वरणा पिकातील उत्पन्न ऊस बेणे व उत्पादन खर्चासाठी उपलब्ध होते.

उसातील सुधारणा
पूर्वी खोडवा ठेवला तर एकरी ४२ टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) संस्थेकडून प्रशिक्षण घेतले आहे.
 पाचट जाळले जात नाही. कुट्टी करून पाला देण्याएेवजी जागेवरच कुजवण्याचा प्रयत्न असतो. या खोडवा व्यवस्थापनात मशागतीच्या खर्चात बचत होते. गांडुळांची जमिनीत संख्या वाढते. तणांचा प्रादुर्भावही फारसा होत नाही. गवताळ ऊसही होत नाही. यामुळे वर्षाला मशागतीचा जादा येणारा दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च वाचवणे शक्य होते.नत्र-स्फुरद-पालाश आवश्‍यकतेनुसार दिली जातात. तणनाशकाचा गरजेनुसार वापर होतो.

 सुधारणेनंतर मिळालेले उत्पादन 
 
खोडवा - एकरी ५५ टन. आता निडवाही ठेवला आहे.

उत्तम नियोजनातून टुमदार घर
शेतीत चांगले नियोजन केल्यानेच त्यातील उत्पन्नातून टुमदार घर बांधले आहे.

कुटुंबाची साथ मोलाची
शिरढोणे यांना आई चंद्राबाई, पत्नी जयश्री यांची साथ मोलाची ठरते. मुलगा निरंजन शिक्षण घेत आहे. तर बसवराज हा मुलगा शेतीत मदत करतो. घरी नऊ जनावरे आहेत. त्याआधारे गोठ्यातच वासरे तयार केली आहेत. शेती व दुग्ध व्यवसायाची जबाबदारी सांभाळत शिरढोणे काही संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही काम पाहतात. सुखी समाधानी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे निश्चित पाहता येते.

संपर्क- अशोक शिरढोणे - ९४२१११३९८४

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...