agricultural success story in marathi, agrowon, shekharwadi, walwa, sangli | Agrowon

दर्जेदार कांदा रोपे हवीत? चला शेखरवाडीला...
अभिजित डाके
बुधवार, 17 जानेवारी 2018

अशी करतो रोपनिर्मिती
आमच्या भागातील शेती केवळ पावसावर होते. विहीर हा आणखी एक स्राेत. फेब्रुवारी महिन्यापासून शेतीला पाणीच मिळत नाही. त्यामुळे या कालावधीच्या आत कांदा रोप निर्मिती उरकावी लागते. माझ्या आजोबांच्या काळापासून सुरू असलेली रोपनिर्मितीची परंपरा मी कायम ठेवली आहे. मार्केटमधील मागणीनुसार देशी, लोणंद कांदा वाण वापरले जाते. बियाणे आम्हीच तयार करतो.
-अजित शेखर
संपर्क- ९८२३४६९९७५

सांगली जिल्ह्यातील शेखरवाडी (ता. वाळवा) हे गाव कांदा रोपनिर्मितीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गावातील सुमारे ८० टक्के शेतकरी या व्यवसायात गुंतले आहेत. आजोबांच्या काळापासून अनेकांनी ही परंपरा जोपासली आहे. दोन टप्प्यांत रोपनिर्मिती, आठवडी बाजारात थेट विक्री आदींच्या प्रयत्नांतून केवळ कांदा रोपविक्रीतूनही अर्थकारण कसे उंचावता येते हेच या गावच्या शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे.
 

सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील शेखरवाडी हे तसं तीनशे कुटुंबाचं गाव. लोकसंख्या सुमारे चौदाशेपर्यंत आहे. इथली शेती जवळपास पावसावरच अवलंबून आहे. या भागात कोणतीही उपसा सिंचन योजना नाही. दुष्काळी भाग असं संबोधलं तरी वावगं ठरणार नाही.

अनेक वर्षांची परंपरा
शेखरवाडी गावाचं खास वैशिष्ट्य काय सांगाल? असं कुणी विचारलं तर ते आहे इथल्या गावचे शेतकरी कांदारोप शेतीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अगदी सुरवातीच्या काळात गावातील मोजक्याच शेतकऱ्यांनी या शेतीला सुरवात केली. मग हळूहळू इतरांना त्याचे अर्थकारण उमगू लागले. त्यानंतर मग सारं गावच या शेतीकडे वळलं. आज एक नाही, दोन नाही तब्बल ३० ते ४० वर्षांपासून किंवा फारच मागे जायचे तर अनेकांच्या घरी आजोबांच्या काळापासून कांदा रोप विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे नव्या पिढीने ही परंपरा कायम ठेवली आहे.

शेखरवाडी- रोपनिर्मिती दृष्टिक्षेपात

 • कुटुंब संख्या- २८०
 • लोकसंख्या- १४२०
 • गावाचे एकूण क्षेत्र-२८० हे.
 • कांदा रोप लागवडीखालील क्षेत्र- २०० एकर
 • गावातील सुमारे ८० टक्के शेतकरी कांदारोप लागवडीत

रोपनिर्मितीसाठी अनुकूल जमीन

 • मध्यम प्रतीची.
 • माळरान असेल तर उत्तम रोपनिर्मिती होते.

हंगाम कालावधी

 • ऑगस्ट ते फेब्रुवारी
 • पेरणी झाल्यापासून सुमारे दीड महिन्यात रोपे काढणीसाठी येतात.
 • यादरम्यान प्रत्येक शेतकरी पाच गुंठ्यापासून अर्धा ते एक एकर क्षेत्रावर रोप निर्मिती.
 • पाच ते दहा गुंठ्यापासून ते अगदी दोन एकरांपर्यंत सरासरी क्षेत्र.

दोन हंगामही साधतात

 •  आॅगस्टमध्ये पेरणी. सुमारे दीड महिन्याने काढणी
 • पुन्हा लगेचच पेरणी. दीड महिन्याने काढणी
 • मागणीनुसार टप्प्याटप्प्याने लागवडीस प्राधान्य
 • लागवडीत वाफा पद्धतीचा अवलंब

दहा गुंठ्यांतील अर्थकारण

 • सुमारे ७० ते७५ वाफे
 • त्यातील उत्पादन- आठ हजार ते नऊ हजार पेंडी
 • प्रति पेंडीत- ३० ते ४० रोपे
 • उत्पन्न २४ हजारांपर्यंत मिळाले तर त्यातील खर्च आठ ते नऊ हजार रुपयांपर्यंत

कोठे होते रोपविक्री?

 • शक्यतो आठवडी बाजारात शेतकरी थेट विक्री करतात. यामुळे दोन पैसे अधिक मिळतात.
 • सांगली जिल्हा
 • सांगली शहर, वाळवा, तासगाव, पलूस, शिराळा तालुका.

  कोल्हापूर जिल्हा

 • शाहूवाडी तालुका
 • कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी- सुमारे दररोज १५ हजार पेंड्यांची विक्री
 • येथे व्यापारी रोपे विकत घेतात. या ठिकाणी कर्नाटक भागातील व्यापारी देखील येतात. त्यामुळे मागणी चांगली राहते. अर्थात आठवडा बाजारात नफ्याचे मार्जीन निश्चितच चांगले राहते.

असे असतात दर (सरासरी)

 • प्रति पेंडी- अडीच ते तीन रुपये सरासरी दर.
 • बाजारपेठेत मागणी अधिक किंवा आगाप लागवड असल्यास -हेच दर ४ ते १० रुपयांपर्यंत.

देशी वाण हवेत का कुणाला?
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बहुतांश गावांत घरगुती खाण्यासाठी कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचे देशी वाण हवे असेल तर शेखरवाडीला जा असे सांगितले जाते. साहजिकच या रोपांना अधिक मागणी राहते.

प्रतिक्रिया
आमचे सारे कुटुंब शेतीत राबते. माझ्याकडे कांदा रोपे काढण्याची जबाबदारी असते. त्यामुळे बाजाराच्या दिवशी सकाळी लवकर शेतात येऊन काढणी केली जाते. तरू विक्रीला गेल्यानंतर येताना माझा दादला चार पैसे घेऊन येतो. हे पैसे मिळाल्याचा आनंदच काही वेगळाच मिळतो.
-सौ. सुमन शेखर

पाणी कमी. यामुळे विविध पिके घेण्याला मर्यादा येतात. आमच्याकडे वडिलांच्या काळात कांदा तरूंची लागवड दरवर्षी श्रावणात २५ ते ३० गुंठ्यावर करतो. यात पाच किंवा दहा गुंठे याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बियाणे वाफ्यात टाकण्याची पद्धत वापरली जाते.
-पांडुरंग शेखर

गावात कांदानिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचे २१ गट तयार केले आहेत. त्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने रोपनिर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कृषी विभागातर्फे त्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. सेंद्रिय असल्याचे रोपांना अधिक दर मिळेल अशी आशा आहे.
-शीतल निंबाळकर
कृषी सहायक, शेखरवाडी
संपर्क- ९४२२२१८७९४

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...