पाणलोट क्षेत्रानुसार जलसंधारण
पाणलोट क्षेत्रानुसार जलसंधारण

पाणलोट क्षेत्रानुसार जलसंधारण आवश्‍यक

जलसंधारण ही संकल्पना राबविताना प्रत्येक पाणलोट क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास करावा. पाणलोट क्षेत्रातील अपधाव, जमिनीची धूप इत्यादी बाबतींतील निरीक्षणांची नोंद ठेवणे आवश्‍यक आहेत. या नोंदीनुसार जलसंधारणाच्या कामात योग्य ते बदल करावेत.  

पाणलोट क्षेत्रावरील जलसंधारणासाठी करावयाच्या ओघळीवरील उपचारात सिमेंट नाला बांध, शेततळे, पुनर्भरण चर, शेततळे, वळण बंधारा या रचनाही उपयुक्त ठरतात. आपली जमीन, तिची रचना, शेतीची विभागणी याबाबींचा विचार करून जलसंधारण रचनांची निर्मिती करावी.

सिमेंट नाला बांध  जागेची निवड :

  •  पाणलोट क्षेत्र ४० ते १००० हेक्‍टरपर्यंत असावे.
  •  नाल्याच्या तळाचा उतार ३ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये.
  •   नाल्याच्या तळापर्यंत खोली कमीत कमी २ मीटर असावी.
  •  बांधाच्या व पाणीसाठ्याच्या भागामध्ये विजेचे खांब तसेच उच्च दाबाच्या तारा असू नयेत.
  •  सिमेंट नाला बांधामध्ये गाळ भरू नये, यासाठी वरील भागात प्रथम गाळ प्रतिबंधक कामे पूर्ण झालेली असावीत.
  • शेततळे   शेततळ्याचा उद्देश भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठविणे व त्याचा उपयोग जलसिंचनासाठी करण्यासाठी होतो. ज्या ठिकाणी सहजासहजी विहीर खोदणे शक्‍य नाही, त्या ठिकाणी शेततळे लाभदायक ठरते.

    जागेची निवड

  •  काळी व चिकणमातीचे प्रमाण जास्त असणारी जमीन निवडावी. मुरमाड, वालुकामय सच्छिद्र खडक अशी जमीन शेततळ्यास घेऊ नये.
  •  शेततळ्याभोवतालची जमीन दलदल होईल, अशा ठिकाणी शेततळे घेऊ नये.
  •  जमिनीचा उतार ३ टक्केपर्यंत असला तरीही चालू शकेल.
  • पुनर्भरण चर   पाणी अडवून जमिनीमध्ये पाणी पुनर्भरणाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी पुनर्भरण चर वापरण्यात येतात. पुनर्भरण चरामुळे पाण्याचे स्रोत कायम होण्यासाठी मदत होते.

  •  पुनर्भरण चर हा पाण्याच्या स्रोतापासून वरील बाजूस जास्तीत जास्त १०० मीटर अंतरावर असावा.
  •  नाल्याची रुंदी कमीत कमी १० मीटर असावी.
  •  पुनर्भरण चर हा नाला पात्रात खोदावयाचा असल्याने नाल्याच्या तळात  ४ ते ५ मीटरपर्यंत कच्चा मुरूम असावा.
  •  पुनर्भरण चराची लांबी आवश्‍यकतेनुसार २० ते ३० मीटरपर्यंत ठेवावी.
  • वळण बंधारा   नाल्यामधून वाहणारे पाणी पाटाद्वारे शेतात वळविण्यासाठी नाला पात्रामध्ये जो सिमेंट बांध घातला जातो, त्यास वळण बंधारा असे म्हणतात. नाला बांधामुळे पिकांना उपलब्ध असलेल्या पाण्यात वाढ झाल्यामुळे भीज क्षेत्रात वाढ होते, पर्यायाने उत्पादनात वाढ होते.

  •  ज्या नाल्याला नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत किमान १५० लिटर/ सेकंद एवढा पाणी प्रवाह आहे, अशा नाल्याची निवड करावी.
  •  नाल्याची खोली ३ मीटरपेक्षा जास्त नसावी.
  •  नाल्याची रुंदी ३० मीटरपेक्षा जास्त नसावी.
  •  पाणलोट क्षेत्र ५०० हेक्‍टरपेक्षा कमी असावे.
  •  : अतुल अत्रे, ९८६०५९३८३६ (डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि. नगर )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com