स्पनेच्या या शेतीत मित्रकिटकांच्या आधारेच पीक संरक्षण

केवळ मित्रकिटकांचीच सत्ता मुर्सिया भागातील ग्रीनहाउसमधील लाल मिरची असो की अल्मेरियातील लोला यांचा टोमॅटो, मिरचीचा प्लॉट असो तेथे कोणत्या ना कोणत्या झाडाला लावलेले मित्रकीटक असलेले सॅशे, बॉक्सेस, बाजूला ठेवलेल्या बॉटल्स पाहायला मिळाल्या. मित्रकीटकांचा मुबलक वापर करून कीटकनाशकांची गरज जवळपास संपवली आहे.
स्पेनमधील शेतकऱ्यांच्या शेतात मित्रकीटकांचा समावेश असलेल्या बॉटल्स, सॅशे, त्यातून बाहेर पडलेले मित्रकीटक व त्यांनी नियंत्रणात आणलेले शत्रुकीटक हे दृश्य पाहण्यास मिळते.
स्पेनमधील शेतकऱ्यांच्या शेतात मित्रकीटकांचा समावेश असलेल्या बॉटल्स, सॅशे, त्यातून बाहेर पडलेले मित्रकीटक व त्यांनी नियंत्रणात आणलेले शत्रुकीटक हे दृश्य पाहण्यास मिळते.

स्पेनमधील ‘रेसीड्यू फ्री’ शेतीत मित्रकीटकांचा सर्वाधिक वाटा आहे. पीक संरक्षणात त्यांचेच अधिराज्य चालते म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अल्मेरियातील ७० हजार एकरांहून अधिक पॉलिहाउसेसमध्ये घेतली जाणारी विविध भाजीपाला पिके त्याचे साक्षीदार आहेत. स्पेनमधील ‘रेसीड्यू फ्री’ शेतीचे गमक

  • रसायनांचा वापर एक टक्का किंवा त्याहून कमीच. बुरशीनाशकांमध्येही सल्फर, बोर्डो मिश्रण या ‘मिनरल’ रसायनांचा वापर.
  • अल्मेरियातील काजामर व युरोपीय क्रॉप प्रोटेक्शन यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत याबाबत उपयुक्त माहिती दिली आहे. येथील फार्मस् पाहताना त्याचा तंतोतंत प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही.
  • कीड-रोग प्रतिबंधात्मक उपाय
  • ग्रीनहाऊस स्ट्रक्चरमध्ये सुधारणा, हवामान नियंत्रण यंत्रणा
  • दर्जेदार कीटक प्रतिबंधक नेट व मेश
  • रूटस्टाॅक, प्रतिकारक जाती (विशेषतः विषाणू प्रतिकारक)
  • ग्रीनहाउस व्हेंटीलेशन व्यवस्थापन
  • ‘मेकॅनिकल’ उपाय पिवळे, निळे रंगसापळे, फेरोमोन सापळे, नरांना ‘कन्फ्युजन’ करणारे ल्यूर सापळे, व्हर्टीसिलीयम लेकॅनी, बिव्हेरिया बॅसियाना, बॅसिलस थुरींनजेंसीस, जोजोबा तेल, स्थानिक वनस्पतींचे अर्क यांचा वापर. -सूत्रकृमींचेही मित्रजीवाणू व बुरशीद्वारे नियंत्रण. मित्रकीटकांचेच अधिराज्य

  • आपल्याकडे कीटकनाशके विकत आणून फवारली करतात. तर स्पेनमध्ये चक्क मित्रकीटक विकत आणून त्यांचे प्रसारण करतात.
  • प्रत्येक किडीसाठी वेगवेगळे कीटकनाशक आपण वापरतो. त्यात आंतरप्रवाही, स्पर्शजन्य, पोटविष असे प्रकार असतात.
  • स्पेनमध्ये थ्रीप्स, पांढरी माशी, तुडतुडे, मिलीबग, अळी अशा प्रत्येकासाठी वेगवेगळे मित्रकीटक, मित्रकोळी (प्रिडेटर माईट), मित्रसूत्रकृमी असे तब्बल २० ते २५ हून विविध पर्याय उपलब्ध
  • सॅशे, बॉटल, बॉक्स स्वरूपात प्रौढ, पिल्ले या स्वरूपात ते उपलब्ध
  • कीडनाशकांची गरज जवळपास नाही 

  • मित्रकीटकांच्या वापरामुळे कीटकनाशके वापरण्याची गरज जवळपास संपली.
  • शेतमालात रासायनिक अंश आढळण्याची समस्या कमी झाली.
  • पर्यावरण प्रदूषण नाहिसे झाले.
  • कीडनाशकांच्या फवारणीमुळे मानवी विषबाधा होण्याची शक्यताही संपली.
  • मुर्सिया भागातील ग्रीनहाउसमधील लाल मिरची असो की अल्मेरियातील लोला यांचा टोमॅटो, मिरचीचा प्लॉट असो तेथे कोणत्या ना कोणत्या झाडाला लावलेले मित्रकीटक असलेले सॅशे, बॉक्सेस, बाजूला ठेवलेल्या बॉटल्स पाहायला मिळाल्या. मित्रकीटकांचा मुबलक वापर करून कीटकनाशकांना जवळपास हद्दपारच केले आहे. त्याची प्रातिनिधिक उदाहरणे अशी.

  • थ्रिप्स नियंत्रणासाठी मित्रकीटक अोरीएस लेव्हीगॅटस- परभक्षी कीटक
  • थ्रिप्स, पांढरी माशीसाठी- अॅंब्लीसीयस स्वीरस्की (परभक्षी मित्रकोळी)
  • मावा- अॅफीडीयस कोलीमनी (परजीवी मित्रकीटक)
  • नागअळीसाठी(टुटा अबसोल्युटा)- नेसीडीअोकोरीस टेनियस (परभक्षी बग)
  • लाल कोळीसाठी अॅंब्लीसीयस कॅलिफोर्निकस
  • या पिकात मुख्य वापर- ग्रीनहाउसमधील मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कलिंगड, शोभिवंत फुले, फळपिके आदी

    स्पेनमधील ‘रेसीड्यू फ्री कल्चर’चे भागीदार

  • शेतकरी संघटना
  • स्वतः शेतकरी
  • कृषी विद्यापीठ
  • खासगी कंपन्या
  • भागीदार- खासगी कंपन्या

  • -मित्रकीटकांचे उत्पादन करणाऱ्या स्पेनमध्ये कंपन्या.
  • त्यांचे संशोधन आणि विकास विभाग. तेथे किडींच्या नव्या समस्या व नव्या मित्रकीटकांवर संशोधन.
  • वेगवेगळ्या पिकांत त्यांचा वापर एकरी किती व कसा करायचा याच्या शास्त्रीय चाचण्या. त्यामुळेच त्यांचे प्रभावी ‘रिझल्ट’ मिळतात.
  • मित्रकीटक वापरण्याचे शेतकऱ्यांना त्यांच्याकडून प्रशिक्षण.
  • तेथील कृषी विद्यापीठांतही दर्जेदार संशोधन व प्रसार कार्य.
  • भारतात रसायनांच्या अनियंत्रित वापराने मित्रकीटकांची विविधता नष्ट होत आहे. त्यांना शोधण्यासाठी प्रयास घ्यावे लागतात. स्पेनमध्ये मित्रकीटक जास्त आणि किडी कमी असे उलटे चित्र पाहायला मिळाले.
  • भागीदार-शेतकरी

  • मित्रकीटकांच्या वापराबाबत अत्यंत जागरूक. हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती.
  • केवळ पिकापुरता विचार न करता भोवतालच्या निसर्गाबाबतही जागरूक.
  • पॉलीहाउसबाहेर मित्रकीटकांसाठी झाडे लावून त्यांचे संवर्धन. पिवळ्या फुलांकडे थ्रिप्स धावतात. त्या वेळी फुलांतील पोलन खाण्यासाठी आलेले मित्रकीटक त्यांना खाऊन टाकतात.
  • बंबलबीचा परागीभवन व उत्पादनवाढीसाठी वापर. त्यांना इजा होऊ नये म्हणून फुलोरा अवस्थेत सल्फर किंवा तत्सम रसायनांचा वापर टाळतात.
  • भागीदार- शेतकरी संघटना संघटन, विक्री, मार्केटिंग, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संशोधन एवढ्या विविध घटकांमध्ये शेतकऱ्यांना एकसंध ठेवणारी शेतकऱ्यांची ‘कोएक्सफॅल’ ही अत्यंत कार्यक्षम संघटना म्हणजे जागतिकदृष्ट्या आदर्श ठरावी अशी आहे. दौऱ्यात तिथे भेट शक्य झाले नसले तरी संघटनेची क्षमता वाचकांना माहित होणे गरजेचे वाटते. कोएक्सफेल-

  • अल्मेरियातील फळे व भाजीपाला उत्पादकांची व निर्यातदारांची शिखर संघटना
  • संघटनेंतर्गत - ८३ कंपन्या
  • सुमारे ३९ विविध कृषी उत्पादनांची निर्मिती
  • निर्यात- ७० टक्के -मार्केट- युरोपीय देशांतील सुमारे ४०० ते ५०० दशलक्ष ग्राहक
  • सन २०१५-१६ ची प्रातिनिधिक आकडेवारी

  • एकूण विक्री- २२ लाख ५१ हजार १७६ टन
  • क्षेत्र- २३ हजार १०० हेक्टर
  • शेतकरी- ९,३००
  • त्यातून ४० हजार जणांना रोजगार मिळाला.
  • मिळणारे एकूण उत्पन्न- १६४३ दशलक्ष युरो. (एक युरो म्हणजे ८० भारतीय रुपये)
  • कोएक्सफॅलची अद्ययावत प्रयोगशाळा

  • 'हॅसेप’ प्रमाणपत्र पद्धती, मानके यांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन
  • सूक्ष्मजीव, फळांचे पोषणमूल्य या अनुषंगाने गुणवत्ता पृथ्थकरण,
  • विषाणू, जीवाणू व बुरशीजन्य रोगांचे निदान
  • संशोधन आणि विकास विभाग

  • नव्या जाती, लागवडीच्या नव्या पद्धती
  • काढणीपश्‍चात तंत्रज्ञान
  • साठवणूक, पॅकेजिंग
  • मित्रकीटक, तसेच जैविक कीड-रोग नियंत्रण पद्धती
  • अन्न, पाणी व मातीतील कीडनाशक अवशेष पृथ्थकरण
  • उत्पादनांची गुणवत्ता व ‘लेबल क्लेम’ स्पेनमध्ये वापरली जाणारी उत्पादने लेबल क्लेमयुक्तच असतात. तज्ज्ञ, कन्सल्टंटकडून शिफारसीही त्या धर्तीवरच असतात. ‘बायोस्टिम्युलंट’ प्रकारात मोडणाऱ्या उत्पादनांचेही माहितीपूर्ण ‘लेबल’ ही कंपन्या उत्पादनासोबत शेतकऱ्यांना पुरवतात. उत्पादन विक्री करताना देशातील कायदेशीर नियमांचे पालन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अोमरी’ सारखे प्रमाणपत्र या बाबींची पूर्तता केली जाते. रासायनिक अवशेषमुक्त शेतीची जागतीक गरज अोळखून नवे सूक्ष्मजीव, वनस्पती अर्क यांवर संशोधन करून त्या आधारे नाविन्यपूर्ण जैविक उत्पादने या देशात उपलब्ध झाली आहेत. बनावट उत्पादनांना थारा नाही ह्मुमिक अॅसिडच्या निर्मितीत लिओनार्डिट हा मुख्य घटक असतो. त्याचे जगभरातील स्राेत तपासून त्यातील सर्वोत्तम म्हणजे ह्मुमिक अॅसिडचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या उत्तर अमेरिकेतील स्राेताची निवड केली जाते. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार उत्पादन बनवले जाते. तेथील एका कंपनीचे शास्त्रज्ञ म्हणाले की आशिया व आफ्रिकी देशांत ह्युमिक अॅसिडची अनेक बनावट उत्पादने असल्याचे आम्हाला आढळले. बाटलीवर ४० ते ५० टक्के ह्मुमिक अॅसिड लिहिले असेल तर त्यात पाच टक्केसुद्धा घटक मिळाला नाही. आम्ही मात्र लेबलवर जे प्रसिद्ध करतो तेच प्रयोगशाळेतील परिक्षणात आढळून येते. सागरी तणांतील अर्कावर आधारीत (सी वीड एक्सक्ट्रॅक्ट) उत्पादन बनवतानाही त्याचा मुख्य स्राेत (वनस्पती) आर्यलंडमधील समुद्रकिनाऱ्यावरून आणला जातो. त्यातील मुख्य घटक कमी होऊ नयेत म्हणून यांत्रिकी पद्धतीने काढणी न करता मानवी पद्धतीने व्यवस्थित संकलित करून प्रक्रिया केली जाते. दर्जेदार, कीड-रोगमुक्त रोपे स्पेनमधील खासगी कंपन्या कोकोपीट वा तत्सम मेडिया वापरून भाजीपाल्याची अत्यंत दर्जेदार व कीड-रोगमुक्त रोपे तयार करतात. शेतमालाची गुणवत्ता व उत्पादन यांचा हाच मुख्य पाया असतो. देशी रूटस्टॉक किंवा देशी वाणांतील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांचा वापर करून ‘ग्राफ्टेड’ रोपे तयार केली जातात.

    स्पेनची आहारशैली

  • दररोजच्या आहारात रेड, व्हाईट वाईन किंवा तत्सम पेये.
  • आपल्या डाळ-भाताशी साधर्म्य असलेला पाएल्ला राईस ही या देशातील लोकप्रिय डीश.
  • विविध फळांचे ताजे ज्यूस, फोडी, शुगरबीट, झुकिनी, आईसबर्ग, चायनीज कोबी यांचे ऑलीव्ह तेलमिश्रित सॅलड.
  • नाविन्यपूर्ण स्वीटस, केक्स, सॅंडवीच, पिझा, बर्गर आदी.
  • सौंदर्याने परिपूर्ण शहरे

  • आधुनिकता व पारंपरिकता यांचा सुरेख मिलाफ असलेली स्पेनमधील शहरे (उदा. मुर्सिया, अॅलिकॅंटे) परिपूर्ण सौंदर्याचा नमुनाच
  • ठिकठिकाणी डोळ्यांना सुखद फुलांची झाडे, हिरवी लाॅन्स, कारंजे, कॅनोपी नियंत्रित उंच झाडे. युरोपीय शैलीच्या अपार्टमेंटस, वाहनांचे हॉर्न नाहीत, गोंगाट नाही की प्रदूषण नाही.
  • राजकीय व्यक्तीचे वा पक्षाचे ‘पोस्टर’ कुठेही पाहावयास मिळाले नाही.
  • संपर्क- मंदार मुंडले- ९८८१३०७२९४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com