नैसर्गिक उत्पादन, प्रक्रिया अन सक्षम बाजारपेठ

अभिजीत देशमुख यांनी नैसर्गिर्क पध्दतीने घेतलेला गहू, अमरावतीत नैसर्गिर्क मालाला मिळवलेली बाजारपेठ
अभिजीत देशमुख यांनी नैसर्गिर्क पध्दतीने घेतलेला गहू, अमरावतीत नैसर्गिर्क मालाला मिळवलेली बाजारपेठ

टाकरखेडा (संभू, ता. भातकुली, जि. अमरावती) येथील अभिजित देशमुख यांनी तीन वर्षांपूर्वी २४ एकरांत नैसर्गिक शेती सुरू केली. आज विविध पिकांचे प्रयोग करीत त्यांनी स्वउत्पादनांना विविध स्त्रोतांच्या माध्यमातून बाजारपेठ तयार केली आहे. राज्यातील अन्य शेतकऱ्यांचा माल खरेदी करूनही त्यांना बाजारपेठ मिळवून दिली आहे.   नैसर्गिक शेतीची सुरवात अमरावती जिल्ह्यात टाकरखेडा (संभू, ता. भातकुली) येथे अभिजित देशमुख यांची शेती आहे. टेक्‍सटाईल इंजिनियर तसेच मार्केटिंग विषयात पदविका घेतलेल्या अभिजीत यांनी १४ वर्षे खासगी नोकरी केली. रासायनिक अवशेषमुक्त शेतीच करायचे असेच मनात पक्के केल्याने नोकरीचा राजीनामा दिला.  वडील शिक्षकी पेशा सांभाळून शेतीही पाहायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेतीची सूत्रे अभिजित यांनी हाती घेतली आहेत. पत्नी वृषाली दर्यापूर येथील खासगी शाळेत शिक्षिका आहेत.   देशमुख यांची शेती २४ एकर- तीन वर्षांपासून नैसर्गिक शेती. सहा लाख रुपये गुंतवून डाळमिळची उभारणी खारपाणट्ट्यात सहा एकर क्षेत्र, त्यात उत्पादन उडीद- २४ क्विंटल, मूग- १७ क्विंटल तयार केलेल्या डाळीची विक्री- उडीद-  ९० रुपयांनी तर मूग- ८५ रुपयांनी (प्रति किलो)

 पाऊण एकर क्षेत्र हळद बेडवर- त्यात खरिपात उडीद व तूर उडीद उत्पादन-४ क्विं तर तूर २ क्विं. उडीद काढणीनंतर गहू--त्यात मेथी व कोथिंबीर गव्हाचे उत्पादन येणे बाकी- मेथीचे २० किलो व कोथिंबीरीचे सहा किलो   मार्केटिंगची केलेली व्यवस्था

  • अमरावती भागात तयार केलेले ग्राहक- सुमारे ६५०
  • व्हॉटस ॲप ग्रूपच्या माध्यमाचाही ग्राहकवाढीचा प्रयत्न
  • विक्री - उदा. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर
  • नैसर्गिक तूर डाळ- विक्री
  • २०१६- १२० क्विंटल
  • २०१७-१९६ क्विं.
  • यंदा- २०० क्विं. अपेक्षित
  • कृषी प्रदर्शनात ग्राहकांना एक किलो नमुना दिला.  शिजवून गंध व क्वाालिटीची खात्री करा असे सांगितले. त्यानंतर चौथ्या दिवशी ग्राहकांनी तीस किलोप्रमाणे खरेदी केली.
  • यापूर्वी सर्जीकल वस्त्रेविषयक कंपनीसाठी मार्केटिंग केल्याने अनेक डॉक्टरांशी संपर्क आला. त्यामुळे नैसर्गिक मालाला ग्राहक मिळवणे अजून सोपे झाले.  
  • अमरावतीत आउटलेट
  • ग्राहक सर्वप्रकारच्या मालाची मागणी करतात. त्यादृष्टीवने अमरावती नॅचरल' नावाने आउटलेट.
  • राज्यातील विविध शेतकऱ्यांची मिळून सुमारे ५५ उत्पादने
  • यात अन्नधान्ये, डाळी, साखर, गूळ
  • स्थापनेपासून (डिसेंबर, २०१७) - आत्तापर्यंत विक्री
  • गूळ - ४ टन, साखर- २० क्विंटल, शेंगदाणे- ५ क्विंटल
  • सुमारे सात लाख रुपयांची विक्री
  • नैसर्गिक मालाबाबत खात्री नैसर्गिक शेतीतील व्हॉटस ॲप ग्रूपमध्ये सहभागी. त्यातून एकमेकांच्या शेतात शिवारफेऱ्या होतात. त्यातून खातरजमा झाल्यानंतर माल विक्रीसाठी घेतला जातो. नैसर्गिक शेतीतील ठळक बाबी

  • तीन देशी गायी, त्यावर आधारीत जीवामृत, गोमुत्राचा वापर
  • उत्पादनखर्चात सुमारे ५० टक्के झाली बचत.
  • नैसर्गिक शेतीपद्धतीत मित्रकिटकांचा वावर वाढावा यासाठी थोड्या प्रमाणावर पूरक पिके मुख्य पिकात घेण्यावर भर. उदा. गव्हाला लागणारा नत्र पुरविण्याचे काम हरभऱ्याच्या माध्यमातून होते. तर मोहरी मित्रकिटकांना आकर्षित करते.
  • या शेती पद्धतीत वाफसा महत्त्वाचा ठरतो.
  • तूरडाळीचा "श्री' ब्रॅण्ड

  • स्वतःच्या मालावर प्रक्रिया करण्याबरोबर शेतकऱ्यांकडील नैसर्गिक धान्याचीही डाळ तयार करून दिली जाते. मागील वर्षी ३६ शेतकऱ्यांना ३१० क्‍विंटल डाळ तयार करून दिली.
  • "श्री' ब्रॅण्डने विक्री.
  • अन्य शेतकऱ्यांकडील तूर घेऊनही त्याची विक्री. त्यांना योग्य दर दिला जातो.
  • संपर्क- अभिजित देशमुख - ९९६०६३७५२३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com