agricultural success story in marathi, agrowon, tarapur, palghar | Agrowon

तीस एकरांहून अधिक क्षेत्रात बांबू शेडनेट शेती
भरत कुशारे
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतः मालक व्हा. सध्या हवामान बदलामुळे अडचणी येतात. त्यामुळे आपल्याला नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे शेतीत बदल करून उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.

-प्रसाद सावे

तारापूर मोठीवाडी (जि. पालघर) येथील अवघ्या २४ वर्षे वयाचा प्रसाद सावे वडील व काका यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू शेडनेटमधील विविध प्रकारच्या मिरच्यांची व काकडीची शेती यशस्वीपणे करतो आहे. शेतीचा व्यासंग वाढवत आधुनिक तंत्राचा वापर, बाजारपेठेचा अभ्यास यातून तीस एकरांहून अधिक एकरांवर (भाडेततत्त्वावरील) त्याने प्रयोगशील शेतीचा विस्तार केला आहे.

पालघर जिल्ह्यात वाणगाव रेल्वे स्टेशनपासून सुमारे नऊ किलोमीटरवरील तारापूर मोठीवाडी येथे
विष्णू मोरेश्वर सावे व बंधू दिलीप सावे यांची संयुक्त कुटुंबाची शेती आहे. कुटुंबातील नव्या पिढीतील व अवघ्या २४ वर्षे वयाचा प्रसाद (विष्णू यांचा मुलगा) शेतीची जबाबदारी वडील व काका यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे सांभाळतो आहे.

प्रसादने हाती घेतली सूत्रे
सुरवातीला चिकू, आंबा, नारळ, भाजीपाला, मिरची आदी पिके व्हायची. प्रसादला पहिल्यापासूनच शेतीची आवड होती. बारावीनंतर त्याने कृषी पदविका अभ्यासक्रम कोसबाड येथून पूर्ण केला. शिक्षण घेत असतानाच वडिलांना मिरची शेतीत मदत करायला सुरवात केली.
विविध ठिकाणी जाऊन शेती पाहण्याची आवड, व्यासंग यांचा प्रसादला नाद होता. याच भागातील प्रयोगशील शेडनेट शेतीधारक शेतकरी रामचंद्र सावे यांनी वडिलांना मार्गदर्शन केले होते. त्यांचीही शेती अभ्यासली. शिक्षण सुरू असतानाच २०११ च्या सुमारास सावे कुटुंबाने गवताळ पडीक जमीन भाडेकराराने (लीज) घेतली. जमिनीचे सपाटीकरण करून कंपांऊड केले. बोअरवेल, पाइपलाइन, ठिबक केले. शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवड केली. वडिलांना शेडनेट शेतीचा अनुभव पूर्वीचा असला तरी प्रसादनेही गेल्या चार वर्षांच्या काळात अनुभव, कुशलता व तंत्र आत्मसात करून शेडनेट शेतीत युवकांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

सावे कुटुंबाची शेती दृष्टिक्षेपात

 • सुमारे ३२ ते ३३ एकर- शेडनेटमध्ये हिरवी ढोबळी मिरची तसेच गुजरातमध्ये मागणी असलेली आचारी व अन्य प्रकारची मिरची
 • खुल्या सात एकरांत- लांबट मिरची
 • चार एकर शेडनेट- विशिष्ट वाणाची काकडी
 • जवळपास सर्व क्षेत्र- भाडेततत्त्वावर

पीक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये

 • सर्व मिरच्यांची रोपे घरीच तयार होतात. (कोकोपीट व पॅरालाईट ट्रे, गांडुळखताचा वापर)
 • बी पेरल्यानंतर ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग. जमीन तयार केल्यानंतर दोन फूट रुंदीचे गादीवाफे. दोन वाफ्यांमध्ये सहा फूट अंतर.
 • बेडमध्ये एकरी नीमकेक २१० किलो व ७-१०-५ खताचा १०० किलो असा वापर
 • शेडनेट उभारण्यासाठी १२ फूट उंच बांबू आणि तारांचा वापर. पॉलीहाऊसच्या तुलनेत बांबूचे शेडनेट अधिक किफायतशीर. अर्थात दरवर्षी शेडनेट उभारणी व प्रयोगानंतर उतरवणी असा एकरी एकूण २० हजार रुपये खर्च.
 • ढोबळीच्या रोपांची ४५ दिवसांनंतर दीड बाय दीड फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने पुनर्लागवड (ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत.)
 • सन २०१७ मध्ये अवकाळी व ओखी वादळी पावसामुळे क्षेत्र कमी करावे लागले.
 • पुनर्लागवडीनंतर ट्रायकोडर्मा व त्यानंतर कार्बेन्डाडाझीमचे ड्रेंचिंग. कीटकांना रोखण्यासाठी ‘इन्सेक्‍ट नेट’चा वापर.
 • ड्रीप अॅटोमेशन
 • पाणी व खतांच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी संपूर्ण ‘ड्रीप ऑटोमेशन’. महिन्यातील निश्चित दिवसांचे अन्नद्रव्यांचे वेळापत्रक तयार करून ती देण्याचा ‘प्रोग्रॅम’ या तंत्राद्वारे अंमलात आणला जातो.
 • हिवाळ्यात दररोज २० मिनिटे तर उहाळ्यात दररोज ३५ मिनिटे ते एक तासापर्यंत पाणी. पाण्याचा पीएचही नियंत्रित ठेवला जातो. शेततळेही घेतले आहे.

उत्पादन

 • ढोबळी मिरची- एकरी ३८ टनांपर्यंत
 • विशिष्ट लांबट मिरची- एकरी ४ ते ५ टन
 • काकडी- २५ टन

दर, मार्केट
ऑक्‍टोबरपासून मेपर्यंत म्हणजे आठ महिने पीक शेतात असते. ढोबळीला किलोला १० रुपयांपासून ते ३०, ३२ रुपयांपर्यंत तर विशिष्ट लांबट मिरचीला किलोला ५० रुपये दर मिळतो. ढोबळीत एकरी साडेपाच लाख रुपयांपर्यंत एकूण खर्च येतो. बॉक्स पॅकिंगच्या माध्यमातून स्थानिक व्यापारी माल घेऊन जातात व अन्य राज्यांत विक्री करतात. काकडीला किलोला १५,२० ते ३० रुपयांपर्यंत दर मिळतो.

अन्य वैशिष्ट्ये
भाडेतत्त्वावरील जमिनीत बांधावर आंबा, चिकू आदी फळांची लागवड केली जाते. जमिनीचा करार संपल्यानंतर जमीन मालकाला सुस्थितीत दिली जाते. त्याचबरोबर झाडांचाही लाभ संबंधित मालकाला मिळतो.
-बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून विविध जातींची लागवड. नेदरलॅंडमधील जातींचा वाप. मनुष्यबळाचा कुशलतेने वापर. जमाखर्चाची आणि उत्पादनाची नोंदवही ठेवली आहे.

व्यासंग कसा वाढवला?
अॅग्रोवनमधील यशकथांचा प्रभाव- प्रसाद अॅग्रोवनचा नियमित वाचक आहे. त्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा तो खास करून वाचतो. त्या प्रेरणेतूनच शेतीत नवे तंत्रज्ञान वापरण्याची उर्मी मिळते. यंदा तो बीएस्सी अॅग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे. नाशिक, पुणे, बारामती येथील कृषी प्रदर्शने आवर्जून पाहतो. कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड यांच्या नेहमी संपर्कात असतो. येथील विषय विशेषज्ञ भरत कुशारे यांचे वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन.

पुरस्कार

 • एल. एम. पटेल फार्मर ऑफ दि इयर-२०१६- अॅस्पी फाउंडेशन
 • युवा प्रगतीशील शेतकरी- कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड पालघर यांच्याकडून- २०१६
 • युवा प्रगतीशील शेतकरी पुरस्कार, ग्रामपंचायत तारापूर

सहकार्य
प्रसादला वडील व काका यांच्यासह आई सौ. रेखा सावे, तसेच घरातील सर्वांचेच मार्गदर्शन मिळते.
वडिलांनाही प्रगतिशील शेतकरी भानुदास सावे व धनंजय पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे.

संपर्क- प्रसाद सावे-९६३७८२२३३५
भरत कुशारे- ९८५०२६०३५५

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर येथे विषय विशेषज्ञ आहेत.)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...