agricultural success story in marathi, agrowon, veni khurd, pusad, yavatmal | Agrowon

डाळप्रक्रियेतून शेतकरी गटाने मिळवली आर्थिक वृद्धी
विनोद इंगोले
शनिवार, 30 जून 2018

धान्य महोत्सवात विक्री
गेल्या वर्षी ५० क्‍विंटल तूर खरेदी करून प्रक्रिया करण्यात आली. यवतमाळ येथे यंदा १७ ते २१ मार्च या कालावधीत धान्य महोत्सवात या डाळीची विक्री केली. गटाने सुमारे ५० सेंद्रिय शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारले आहे. या सेंद्रिय डाळीला ७० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर मिळाला. गहू, ज्वारी, उडीद, मुगाचीही काही प्रमाणात विक्री झाली. गटाने सुमारे ४०० ग्राहकांचे नेटवर्कही उभारले आहे.

धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने दर महिन्याला एकत्र येणाऱ्या वेणी (खुर्द) (जि. यवतमाळ) येथील काही शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग उभारणीचा विचार मांडला. तो प्रत्यक्ष कृतीतही आणला. श्री सप्त खप्ती पुरुष शेतकरी गटाचे स्वरूप त्याला आले. त्या बळावर डाळमिलची उभारणी होत गटाने आर्थिक वृद्धीकडे वाटचाल सुरू केली. त्यातून उद्यमशील अशी ओळख मिळविली.

यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुका ठिकाणपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर वेणी (खुर्द) हे गाव आहे. पूस धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने सिंचनाच्या बळावर
भाजीपाला आणि उन्हाळ्यात भुईमूग घेण्यावर येथील शेतकऱ्यांचा भर राहतो. सुमारे २५० एकरांवर कापूस घेतल्यानंतर भुईमूग घेतला जातो. जानेवारीच्या पंधरवड्यात त्याच्या लागवडीला सुरवात होते. भुईमुगाच्या विक्रीनंतर हाच पैसा खरिप हंगामाच्या कामी येतो. असे व्यावसायिक नियोजन गावातील शेतकऱ्यांचे राहते.

उत्सवातून मिळाली दिशा
बागापूर येथील संत खप्ती महाराज हे वेणीचे ग्रामदैवत आहे. मारुती मंदिर परिसरात त्यांच्या पूजनासाठी ग्रामस्थ एकत्र येतात. गावात दर महिन्याला शिवरात्र साजरी होते. या निमित्ताने दर महिन्याला पूजा व ग्रंथवाचन केल्यानंतर दीडशे व्यक्‍तींना जेवण दिले जाते. प्रत्येक महिन्याला जेवण देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्‍तीवर जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे. अशाच एका महिन्यात एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्‍यात शेतीपूरक उद्योगाचा विचार आला. हळूहळू त्याचे रूपांतर कृतीत झाले.

समूहाची स्थापना
श्री सप्त खप्ती पुरुष शेतकरी समूह या नावाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्प व आत्माअंतर्गत
शेतकरी गटाची नोव्हेंबर २०११ मध्ये नोंदणी झाली. सध्या जगदेव टेमकर यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पूर्वी रवींद्र पुंड गटाचे सचिव होते. आज ते सदस्य असून, डाळमिल उद्योगाची मुख्य जबाबदारी सांभाळतात. गटात सचिव शाम कोंडबा अराडे, तर सदस्यांमध्ये संतोष नारायण वाशीमकर, सतीश सखाराम वाशीमकर, दत्ता कोंडबा अराडे, संदीप भोने यांच्यासह सुमारे १७ जणांचा समावेश आहे. समूहाचे खाते विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बॅंकेच्या हार्शी शाखेत आहे. महिन्याला शंभर रुपये बचतीचे उ.िद्दष्ट ठरविण्यात आले. समूहाची बचत, तसेच महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे अनुदान या निधीतून डाळमिल उद्योग उभारण्याचा निर्णय गटातर्फे घेण्यात आला.

उद्योगाबाबत ठळक बाबी

  • सन २०१५-१६ मध्ये सुमारे एक लाख एक हजार ६२५ रुपयांना डाळमिलची खरेदी अकोला येथील खासगी उद्योगाकडून करण्यात आली. सुमारे ४० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. उर्वरित रक्कम
  • गटाने गुंतवली. आता पॉलीशरचीदेखील लवकरच खरेदी करण्याचे प्रस्तावित अाहे. त्याची
  • किंमत सुमारे ६५ हजार रुपये आहे.
  • डाळमिलची क्षमता दिवसाला सरासरी १२ क्‍विंटल तूरीवर प्र.िक्रयेची आहे.
  • दर वर्षी जानेवारीच्या सुमारास प्रक्रियेस सुरुवात होते. ती ३१ मेपर्यंत सुरू राहते.
  • त्यानंतर पावसाळ्यात ओलाव्यामुळे उद्योग बंद ठेवावा लागतो.
  • एका क्‍विंटल तुरीपासून सरासरी ६५ ते ७० किलोपर्यंत डाळ मिळते.
  • सन २०१६-१७ मध्ये एकूण सुमारे २५० क्‍विंटल तुरीवर, तर १५० क्विंटल गव्हावर प्र.िक्रया करण्यात आली. त्याचबरोबर ३५ क्विंटल एवढी उडीद आणि मुगावर प्रक्रिया झाली.
  • या वर्षीचा प्रक्रिया हंगाम फेब्रुवारीत सुरू झाला. आत्तापर्यंत सुमारे १७५ क्‍विंटलपर्यंत तुरीवर, तर
  • १०० क्‍विंटलपर्यंत गव्हावर प्रक्रिया झाली आहे.

भांडवल व ताळेबंद
गटाच्या उद्योगाला गेल्या वर्षी सुमारे साडे ५५ हजार रुपयांचा नफा झाला. त्यासोबतच महिन्याची बचत मिळून बॅंक खात्यात आज एक लाख ६१ हजार रुपयांचे भांडवल आहे. आवश्‍यक त्या वेळी समूहातील सदस्यांना तीन रुपये व्याजदराने पैशांची उपलब्धता करून दिली जाते. डाळमिल सद्या भाडेतत्त्वावरील जागेवर उभी अाहे. तुरीसाठी किलोला चार रुपये म्हणजेच ४०० रुपये, तर गव्हासाठी १५० रुपये प्रतिक्विंटल दराने प्रक्रियेसाठी शुल्क आकारले जाते. मजुरी, वीज व अन्य असा खर्च अपेक्षित धरता सुमारे ४० टक्के नफा मिळतो. राईच्या तेलाचा वापर डाळप्रक्रियेवेळी करावी लागते. हे तेल ९५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळते. त्यामुळे मजुरी खर्च वाढतो.

बीबीएफ यंत्रासाठी घेतला पुढाकार
गटातील शेतकऱ्यांचे व्यवसायातील सातत्य पाहता कृषी विभागाकडून अनुदानावर बीबीएफ (रुंद सरी वरंबा) यंत्राचा पुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षी भुईमूग पेरणीसाठी त्याचा वापर करण्यात आला. गटाकडे त्या वेळी ट्रॅक्टर नसल्याने केवळ यंत्र भाडेतत्त्वावर देण्यात आले. त्या माध्यमातून दीडशे एकरावर पेरणी पहिल्या वर्षी झाली. प्रतिएकर १०० रुपयांप्रमाणे भाडे शुल्क आकारण्यात आले. गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला ट्रॅक्‍टरची खरेदी दीड लाख रुपये रोख, तर उर्वरित कर्ज रकमेतून करण्यात आली. स्थानिक बॅंकेकडून पाच लाख रुपयांच्या कर्जाला संमती मिळाली आहे. या पैशाचा विनियोग वेणी बसस्थानक परिसरात जागा खरेदीतून करण्याचा मानस असल्याचे गटाचे सदस्य रवींद्र पुंड यांनी सांगितले.

संपर्क- -रवींद्र पुंड-९७६७१७१०६६
सदस्य, श्री संत खप्ती पुरुष शेतकरी स्वयंसहाय्यता गट

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...