agricultural success story in marathi, agrowon,ajani, amaravati | Agrowon

दुग्धव्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून समृद्धीकडे
विनोद इंगोले
गुरुवार, 29 मार्च 2018

महिला समूहांनी केली क्रांती
दुग्धव्यवसायात महिला समूहांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. गावातील चार महिला समूहांच्या
माध्यमातून २०० लिटर दूध संकलन होते. त्याचा पुरवठा कामधेनू डेअरीला होतो. धनश्री महिला गटाच्या सा.िरका आडे, अर्चना आडे, अहिल्या महिला गटाच्या स्मिता आडे, नीलिमा आडे, शेतकरी महिला समूहाच्या कल्पना आडे यांच्यासह रिध्दीसिध्दी महिला गटाच्या वैशाली आडे यांनी या व्यवसायाची प्रेरणा घेत त्याचा विस्तार केला.

दुग्धव्यवसायाचा आधार घेत सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्यात अमरावती जिल्ह्यातील अजनी गावाने आघाडी घेतली आहे. महिला स्वयंसाह्यता समूहाची चळवळ गावात गतिमान झाली. जनावरांच्या खरेदीपासून ते गोठा व्यवस्थापन व संकलनापर्यंत महिलांनी जबाबदारी घेतली. दूध संघाच्या माध्यमातून गावातील दुग्धचळवळ अधिक सक्षम झाली. ‘घर तेथे गाय’ या संकल्पनेतून आज गावचे एकत्रित दूध संकलन ७०० लिटरपेक्षा अधिक पुढे गेले आहे.

अजनीतील धवलक्रांती
अमरावती शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आडवळणावर अजनी गाव वसले आहे. सुमारे सहाशे लोकवस्तीच्या या गावात आज घरटी गाय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेती एवढाच पूरक व्यवसायासाठी पुढाकार घेणाऱ्या या गावाने दुग्धव्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल केली आहे. अर्जुन किसन बावळे, गंगाधर किसन शिंगणे, गणेश दादाराव आडे यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी गावात धवलक्रांतीची बिजे रोवली. त्या वेळी मुऱ्हा, गावरान म्हशी यांचे संगोपन ते करायचे. उत्पादित दुधाची विक्री राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लोणी येथील हॉटेल व्यावसायिकांना केली जायची. शिल्लक दुधापासून लोणी, पनीर असे प्रक्रियाजन्य पदार्थ तयार करून त्यांची विक्री साधली जायची.

केव्हीकेने दिले बळ
अजनी गावात दुग्धोत्पादनाला असलेले सकारात्मक वातावरण पाहता दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) गावातील इच्छुक शेतकऱ्यांना गाय खरेदीसाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. साधारण पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सुमारे ५० गायींसाठी हे अनुदान होते. गायींचे संगोपन शेतकऱ्यांकडून उत्तमरीत्या झाले. त्यामुळे केव्हीकेकडून पुन्हा अनुदानाचा लाभ देण्यात आला. या माध्यमातून गावातील दुधाचे संकलन २५० लिटरपर्यंत पोचले. गावातील लाभार्थ्यांकडून दूधसंकलन करून त्याचा शासकीय दुग्ध योजनेला पुरवठा व्हायचा.

महिलांकडे व्यवसायाची जबाबदारी
कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पांतर्गत गावातील चार स्वयंसाह्यता समूहांना कर्जपुरवठा करण्यात आला. यात अडीच लाखांपासून चार लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य होते. समूहांनी त्यांच्याकडील निधी जोडत गायींची खरेदी केली. यातील धनश्री महिला स्वयंसाह्यता समूहाकडे ११, अहिल्याबाई महिला स्वयंसाह्यता समूह ९, शेतकरी महिला स्वयंसाह्यता समूह १२, रिध्दीसिध्दी महिला स्वयंसाह्यता समूह ९ अशा प्रकारे जनावरांची संख्या आहे. कर्ज परतफेड पाहता धनश्री व अहिल्याबाई महिला समूहांना पुन्हा नव्याने कर्ज देण्यात आले. प्रत्येकी दोन लाख ४० हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ त्यांना मिळाला. अनुक्रमे ९ व ७ गायींची खरेदी त्यांनी केली. जनावरांचे व्यवस्थापन, दूध काढणे व अन्य व्यवस्थापन समूहातील महिला सदस्यांद्वारेच होते. दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कर्जाची परतफेड नियमितपणे करण्यावर भर राहतो.

दूध संघाची पायाभरणी
गावातील अर्जुन बावळे यांनी वीस वर्षांपूर्वी कामधेनू सहकारी डेअरी संघाची उभारणी केली. त्या माध्यमातून सायकलवरून तालुका किंवा अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हशीचे दूध पोचविले जात होते. आज बावळे हयात नाहीत. त्यांचा मुलगा प्रभुचंद यांच्याकडे संघाचे अध्यक्षपद आहे. पंकज शिंगणे सचिव आहेत. संघात गावातील अकरा जणांचा समावेश आहे. सद्या संघातील काही सदस्यांकडील दोन ते तीन, तर काही सदस्यांकडील १० याप्रमाणे प्रकल्पातून एकूण सुमारे ९९ गायींचे संगोपन होते. दोन्ही वेळचे मिळून सरासरी ५०० लिटर दूध उपलब्ध होते. त्यासोबतच गावातील महिला समूहांव्दारे संगोपन होणाऱ्या जनावरांपासून मिळणाऱ्या २०० लिटर दुधाचे संकलनही हा संघ करतो.

पायाभूत सुविधा
कामधेनू सहकारी दूध संघाचा ६० बाय ३० फूट क्षेत्रफळ आकाराचा गोठा आहे. सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचा खर्च त्यासाठी आला. चारा साठवणुकीसाठी ६० बाय ५० फूट क्षेत्रफळाची दोन गोदामे आहेत. ढेप साठवणुकीसाठीही एक गोदाम उभारले आहे. पाचशे लिटर क्षमतेचे दोन फ्रिजर आहेत. बावळे यांच्या जागेवरच हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. चार एकरांवर हिरव्या चाऱ्याची लागवड आहे. कुटार, तसेच ढेप बाजारातून गरजेनुसार विकत घेतले जाते.

दुधाला शोधली बाजारपेठ
सहकारी संघाव्दारे संकलित होणाऱ्या सुमारे ७०० लिटर दुधापैकी अमरावती येथील खासगी डेअरीला ३५० ते ४०० लिटर दुधाचा पुरवठा होतो. उर्वरित दूध ‘मदर डेअरी’ कंपनीला पुरवले जाते. पूर्वी शासकीय दुग्ध योजनेला हे दूध दिले जात होते. खासगी डेअरी व्यावसायिकांद्वारे फॅटनुसार २१ ते २२ रुपये प्रतिलिटर दराने दुधाची खरेदी होते. गावात वीजपुरवठा पूर्णवेळ राहत नाही. त्यामुळे शीतकरण उपकरणांसाठी ‘जनरेटर’ची सोय करावी लागते. त्यासाठी प्रतितासाला चार लिटर डिझेलची आवश्‍यकता राहते. विक्री केलेल्या दुधापोटी धनादेशाद्वारे संघाला पैसे मिळतात.

कृषी समृद्धी प्रकल्पाने दिले बळ
दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रात आघाडी घेतल्याने अजनी गावाची अोळख पंचक्रोशीत झाली. परिणामी, कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत गावाची निवड करण्यात आली. खासगी संस्थेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवड करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून धनश्री आणि अहिल्याबाई महिला समूहाने दुग्धोत्पादनात पुढाकार घेतला. गाईंचा विमा आणि टॅ.िगंगदेखील करण्यात आले. कर्जाची परतफेडदेखील महिलांनी नियमितपणे केली. या समूहांनी बडनेरा बाजारातून गायींची खरेदी केली होती. सुरवातीला जर्सी व आता गीर गायींच्या संगोपनाकडे हे समूह वळले आहेत. आजमितीस समूहातील अनेक सदस्यांकडे देशी गायी आहेत. एकोणीस ते वीस रुपये प्र.ितलिटर दराने दूध खरेदी होते. दर आठवड्याला दुधाचे पैसे ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून थेट समूहाच्या बॅंक खात्यात टाकले जातात.

शेणखताचा शेतीत वापर
समूहातील प्रत्येक सदस्य मिळणाऱ्या शेणाचा वापर आपल्या शेतात खत म्हणून करतो. त्यामुळे या भागातील जमिनींची सुपिकता वाढण्यास मदत होत आहे. काही शेतकऱ्यांनी कंपोस्ट खतही तयार केले आहे. त्या माध्यमातून सें.िद्रय भाजीपाला व अन्य शेतमालाचे उत्पादन होते.

संपर्क- पंकज शिंगणे-९७६७०५८३१३
सचिव, कामधेनू सहकारी दूग्ध उत्पादक संघ, अजनी

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...
प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...
पणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...
सावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...
शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...
शेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...
ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...
किमान तापमानात हळूहळू वाढपुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...
रोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...
सर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...