agricultural success story in marathi, agrowon,aurangabad | Agrowon

मराठवाड्यात अोवा
संतोष मुंढे
मंगळवार, 27 मार्च 2018

आपत्कालीन स्थितीत कमी खर्चात चांगले उत्पन्न देणाऱ्या अोव्याचे सुधारित लागवड तंत्र
तीन वर्षांपासून शेतकऱ्यांत प्रसारित करतो आहे. अोव्याचा ग्राहकदर क्विंटलला २० हजार रुपये आहे. शेतकऱ्यांनी पॅकिंग, ब्रॅंडिंगद्वारे थेट विक्री केल्यास नफा वाढवणे शक्य होईल.
-डॉ. किशोर झाडे-८२७५३८८०४९
विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद.

दुष्काळ वा आपत्कालीन स्थितीत साथ देणारे कमी खर्चिक व समाधानकारक अर्थप्राप्ती देणारे अोवा पीक मराठवाड्यासाठी पर्यायी हुकमी ठरू शकते. अौरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे ५० शेतकऱ्यांकडे मागील खरिपात या पिकाच्या सुधारित लागवड तंत्राची प्रात्यक्षिके झाली. उत्पादनाबरोबरच अोव्याला थेट हुकमी बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही येथील शेतकरी व संस्था एकजुटीने कामास लागल्या आहेत.
 
मराठवाडा- मुख्य खरीप पिके- कापूस, सोयाबीन
-या समस्या-बोंडअळी, सततचा दुष्काळ, पाणीटंचाई, दर

त्याला होऊ शकतो आश्वासक पर्याय- अोवा पीक

अोवा लागवड कोठे होते?
१))गुजरात, राजस्थानासह काही प्रमाणात अन्य राज्यांतही
२)विदर्भात अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्हा- खारपाणपट्टा

मराठवाड्यात रुजतेय अोवा पीक

 • काही वर्षांपासूनच अौरंगाबाद, परिसरातील जिल्ह्यांत पारंपरिक पद्धतीने शेतकरी विखुरलेल्या प्रमाणात अोव्याची शेती करतात.
 • उष्ण आणि कोरड्या हवामानात मध्यम ते खोल काळ्या जमिनीत कपाशीच्या शेतीतील तूट भरून काढण्यासाठी ओवा लावण्यास येथील शेतकऱ्यांनी सुरुवात केली. अवर्षणाचा सतत सामना करणाऱ्यांनी तर ओव्याला मुख्य पीक बनविले आहे.
 • तुटाळीसाठी लावलेले आंतरपीक एकरी ५० किलोपासून ते दीड क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ लागले. दर क्विंटलला कमाल १३ हजार ते १६ हजार मिळाला. मग हे पीक मुख्य का घेऊ नये? असा विचार करीत शेतकऱ्यांची लागवड १-२-३ एकरांपासून दहा एकरांपर्यंत पोचली.

अंदाजे क्षेत्र
अौरंगाबाद जिल्हा- १७५ एकर, परिसरातील जिल्हे मिळून- ३०० ते ४०० एकर. अधिकृत नोंद नाही. मध्यंतरीच्या पावसात यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने क्षेत्र घटल्याचा जाणकारांचा अंदाज.

अोवा लागवडीची गावे

 • जि. औरंगाबाद, ता. गंगापूर- वजनापूर, शंकरपूर, बुट्‌टेवडगाव, गोपाळवाडी, वाडगाव, शिरेसायगाव, सायगाव वाडी
 • ता. कन्नड- औराळी,
 • ता. पैठण- म्हारोळा, फारोळा, बीडकीन, शेकटा आदी

खरीप २०१७- अोवा सुधारित तंत्र- प्रात्यक्षिक प्रयोग

 • अौरंगाबाद कृषी विज्ञान केंद्रामार्फत (केव्हीके)- निक्रा प्रकल्प- ५० शेतकरी, ५० एकर क्षेत्र
 • यातील मुख्य गावे- गंगापूर तालुका-वजनापूर, शंकरपूर, गोपाळवाडी
 • पूर्वीचे वाण- देशी, आता वापरलेले- एए-०१- १९ (सुधारित)
 • सरासरी मिळाले उत्पादन- ४.५० ते ५ क्विं. एकरी

अोवाच का?

 • पावसाचा दीर्घ खंड पडल्यास आपत्कालीन परिस्थितीत पर्याय
 • लेट खरीप म्हणून १५ ते ३० ऑगस्टपर्यंत लागवड शक्य
 • साडेपाच महिन्यांचे पीक
 • पाण्याची गरज अत्यंत कमी
 • खते, कीडनाशके यांचा वापर अत्यंत कमी
 • उत्पादन खर्च एकरी सातहजार ते आठहजार रु.
 • सरळ वाण, त्यामुळे पुढील वर्षीही बियाणे वापर
 • मसाला म्हणून अन्नप्रक्रिया उद्योगाकडून कायम मागणी.
 • ४५० ते ५५० मिमी. पावसातही चांगला प्रतिसाद
 • काही शेतकरी संरक्षित सिंचनातही करतात लागवड

तंत्रज्ञानासाठी बळकटीकरण साह्य

 • लागवड तंत्रज्ञान प्रसार- केव्हीके, अौरंगाबाद
 • मार्गदर्शन- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, शास्त्रज्ञ डॉ. घावंडे
 • कृषी व आत्मा विभाग

थ्रेशरद्वारे काढणीचा प्रयोग
पारंपरिक मळणी-
अोव्याचे बियाणे लहान असते. काठीने बडवून मळणी केल्यास पाच ते सहा दिवस जातात. नुकसानही ४० टक्के होते.
यांत्रिक मळणी
केव्हीकेमार्फत यंदा विदर्भात वापरात थ्रेशरद्वारे ओवा मळणी प्रात्यक्षिक
ठिकाण- वजनापूर येथील दोन प्लॉट. त्यातून वेळ व नुकसान वाचविले.
-पुढील वर्षी थ्रेशर तंत्रात सुधारणा करून स्वच्छ ओवा काढण्याचे प्रयत्न

अोव्याची बाजारपेठ

 • लासूर स्टेशन(अौरंगाबाद)- येथून गुजरात, राजस्थान आदी मोठ्या बाजारपेठेत
 • जर- ५,००० ते कमाल १५, ००० रु.
 • हे पाच वर्षांतील (क्विंटल)
 • दर- ५००० रु- गेल्या दोन वर्षांतील
  ( क्विंटल)
 • ओव्याचा भुस्सा (प्रति क्‍विंटल-- ५०० ते २००० रू.

'मार्तंड ओवा' ब्रॅंड

 • वजनापूर येथे ओवा उत्पादकांचा शेतकरी गट तीन वर्षांपासून स.िक्रय
 • सुमारे २५ शेतकरी सहभागी.
 • दोन वर्षांपासून कृषी प्रदर्शन, मेळावे, प्रत्यक्ष व्यापाऱ्यांपर्यंत पोचून 'मार्तंड ओवा' या ब्रॅंडने ओव्याची विक्री

प्रतिक्रिया
सहा-सात वर्षांपासून अोवा घेत आहे. एकरी चार क्विंटलपर्यंत उत्पादन यंदा सुधारित तंत्र प्रात्यक्षिकाद्वारे पाच क्‍विंटल मिळाले. कपाशी, मक्याला या पिकाची जोड मिळाली. एकरी खर्च सात ते आठ हजार रुपयांपर्यंत येतो. दोन वर्षांपूर्वी क्विंटलला १६ हजार रुपये दर मिळाला. गेल्या दोन वर्षांत तो पाच हजारांपर्यंत घसरला आहे.
-साहेबराव पोटे-८३९०२९३५४६
शंकरपूर ता. गंगापूर

गेल्या वर्षी तेरा एकर, तर यंदा आठ एकर ओवा लागवड होती. अवर्षणात आधार देण्याचे काम हे पीक करते आहे.
-नारायण चव्हाण.
वजनापूर, ता. गंगापूर

खरिपात शेवटचा पर्याय म्हणून ओवा घेतला जातो. शिवना नदीच्या खोऱ्यात सव्वाचारशे मिमी पावसाच्या गावांमध्ये या पिकाचा काळ्या, भारी जमिनीत विस्तार झाला आहे.
-दिलीप मोटे-९८२२३४७७००
बीटीएम गंगापूर

यंदा दीड एकरांत पाच क्‍विंटल ओवा झाला. दोन वर्षांपासून दर समाधानकारक नाहीत. ते वाढण्याची वाट पाहतोय. त्यातून क्षेत्रात वाढ करता येईल.
-योगेश वारे
औराळी, ता. कन्नड

 
शेतकऱ्यांना आम्ही सुधारित वाण व तंत्रज्ञान पुरविले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत. बाजारपेठ, खरेदीदार मिळवून देण्याचाही प्रयत्न आहे.
-व्यंकट ठक्‍के-९४२२२४०००५
तालुका कृषी अधिकारी गंगापूर

 
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...