agricultural success story in marathi, agrowon,gavrai,badnapur, jalna | Agrowon

वर्षभर विविध हंगामांत चक्राकार पद्धतीने बीटरूट
गणेश कोरे
मंगळवार, 6 मार्च 2018

बीट रूट हे पीक म्हटले की मंचरचे (जि. पुणे) नीलेश बांगर हे जणू समीकरणच झाले आहे.
गेल्या आठ-नऊ वर्षांपासून त्यांनी या पिकात सातत्य ठेवत त्यात मास्टरी मिळवली आहे.
वर्षातील दोन ते तीन हंगामांत हे पीक चक्राकार पद्धतीने ते घेतात. उत्पादन एकरी १० टनांपासून २० टनांपर्यंत घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. बाजारपेठेतही आपल्या मालाची अोळख तयार करीत त्यातून अर्थकारण सक्षम केले आहे.

 

बीट रूट हे पीक म्हटले की मंचरचे (जि. पुणे) नीलेश बांगर हे जणू समीकरणच झाले आहे.
गेल्या आठ-नऊ वर्षांपासून त्यांनी या पिकात सातत्य ठेवत त्यात मास्टरी मिळवली आहे.
वर्षातील दोन ते तीन हंगामांत हे पीक चक्राकार पद्धतीने ते घेतात. उत्पादन एकरी १० टनांपासून २० टनांपर्यंत घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. बाजारपेठेतही आपल्या मालाची अोळख तयार करीत त्यातून अर्थकारण सक्षम केले आहे.

 
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील नीलेश बांगर कुटुंबाची सुमारे वीस एकर शेती आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेती करण्यास सुरू केली. पूर्वी ऊस, बटाटा, गहू पिके असायची. सद्यस्थितीत ऊस आहे. मात्र बटाट्याचे अर्थकारण परवडेनासे झाल्याने पर्याय म्हणून बीटरूट घेण्याचा निर्णय सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वी घेतला. त्यानंतर आजगायत या पिकात सातत्य ठेवले आहे.

नीलेश यांची बीट रूट शेती

 • दरवर्षी चार ते पाच एकर, यंदा साडे आठ एकर.
 • वर्षातील तीनही हंगामांत करतात
 • पावसाळी- उत्पादन- चांगले मिळण्याची शक्यता कमी.
 • हिवाळी- उत्पादन जास्त,  अनेकवेळा एकरी सुमारे १८ ते २० टनांपर्यंत.
 • उन्हाळी- एकरी १० ते १२ टनांपर्यंत
 •  दर (किलोचे)-हिवाळ्यात किलोला २ ते ३ रु.तर उन्हाळी हंगामात २५ ते ३० रु.. हिवाळी हंगामात बियाणे दोन किलो तर उन्हाळ्यात तीन किलोपर्यंत लागते. त्याचा खर्च वाढतो.

खर्च-तीनही हंगामात- एकरी- ५० हजार रुपयांपर्यंत
यात लागवडीपासून ते काढणी, बॅग काढणी खर्च, गाेणी भरणे, शिलाई, हमाली आदी धरून)

चक्राकार पद्धतीने लागवड
अडीच एकर १० दिवसांनी दीड एकर १० दिवसांनी दीड एकर. त्यामुळे जवळपास वर्षभर पीक विक्रीस उपलब्ध
 
नीलेश यांचे बीट पिकातील व्यवस्थापन

 • अडीच ते तीन महिन्यांचे पीक
  पाण्याची सक्षम व्यवस्था गरजेची. पिकाला पाणी भरपूर लागते.
 • गोलाई व एकरी उत्पादन या दोन बाबी लक्षात घेऊन वाणांची निवड
 • प्रवाही पद्धतीने पाणी देतात. स्प्रिंकलर पद्धतीने पाणी दिल्यास फायदेशीर
 • हिवाळ्यात आठ दिवसांनी. उन्हाळ्यात चार दिवसांनी.
 • काळ्या जमिनीतही चांगले येते. खतांचे व्यवस्थापन चांगले केल्यास उत्पादन चांगले येते.

हे पीक फायदेशीर का?
नीलेश सांगतात की एकरी उत्पादन चांगले म्हणजे एकरी १० टनांपर्यंत मिळते. उत्पादन खर्च अन्य पिकांच्या तुलनेने कमी असते. तसेच तीनही हंगामांत कमी कालावधीत हे पीक येते. त्यामुळे एखाद्या हंगामात दर कमी मिळाले तरी नुकसान होत नाही.

सातत्य ठेवल्याचा फायदा
नीलेश सांगतात की, उन्हाळी हंगामात तापमान, पाणी व किडींचा प्रादुर्भाव या बाबींमुळे उत्पादनावर परिणाम होतो. मात्र उन्हाळ्यात आवक कमी असल्याचा फायदा दरांमध्ये होतो. मागील पावसाळी हंगामातील बीटला किलोला ५० रुपये दर मिळाला होता. तर मध्यंतरी शेतकरी आंदोलनाच्या काळात घटलेल्या आवकेवेळीही असाच चढा दर मिळाला. दिल्ली येथेही किलोला हिवाळी हंगामातील बीटला किलोला सहा ते सात रुपये दर सध्या सुरू आहे. मात्र तिकडे माल पाठवणे वाहतुकीच्या दृष्टीने परवडत नाही.

नीलेश यांच्यासाठी बिटाचे मार्केट

 • स्थानिक मंचर, पुणे व मुंबई
 • बांधावरही थेट खरेदीचे प्रमाण मंचर परिसरात वाढले अाहे. परिसरातील एकूण उत्पादनाच्या ५० टक्क्यांपर्यंत खरेदी बांधावरच हाेते. मार्केट दरापेक्षा २० ते ३० टक्के कमी दराने ही खरेदी हाेते.
 • मात्र वाहतूक, बाजार समितीमधील खर्च आणि जाेखीम या बाबी कमी हाेतात.

मागणी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून विविध राज्यांतील हॉटेल व्यावसायिकांसह रंग उत्पादक उद्याेगांकडून बिटाची खरेदी हाेते. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, रायपूर, गुजरात आदी ठिकाणांवरून मागणी असते.

शीतगृहे येतात उपयोगाला
थोरांदळे- शीतगृह - मंचरपासून सुमारे १० किलाेमीटरवर.  परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा हाेतो.
ज्यावेळी  बीटाचा बाजारातील दर किलोला २ ते ३ रुपये
असतो त्यावेळी शीतगृहात साठवणूक करतात. तीही तीन महिन्यांसाठी. बाजारातील दर किलोला १० रुपयांवर गेल्यानंतर  विक्री केली जाते.

असा राहतो त्याचा ताळेबंद

 • एकरी १० टन उत्पादन
 • दर- २ रुपये किलोप्रमाणे- २० हजार रुपये उत्पन्न
 • दर- १० रुपये किलोप्रमाणे- एक लाख रुपये उत्पन्न
 • शीतगृहात माल ठेवल्याचा खर्च - २५ हजार रुपये.
 • ते वजा केले तरी आर्थिक दृष्ट्या परवडते.

पुणे बाजार समिती मधील बीट आवक, उलाढाल

          वर्ष --- आवक (क्विंटल) --- उलाढाल (रुपये)

२०१२-१३      २७,९८० १, ८१,८७,०००
२०१४-१५        २१,५०२ १,९३,५१,८००
२०१५-१६      १ ८,३९९ १,६४,५९,१००
२०१६-१७ -- २५,५५३ - १,७८,९७,१००

स्त्रोत- कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

 संपर्क- नीलेश बांगर - ९४०५७४३०००, 

 

इतर अॅग्रो विशेष
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सिंचन विहिरी, फळबागांचा निधी थेट बँक...मुंबई: मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन...
वनामकृविचे कुलगुरू मराठी भाषिक असावेतपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
मराठवाड्यात आठ लाख ७५ हजार टन रासायनिक...औरंगाबाद: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रासायनिक...
‘डिमोशन’ रोखण्यासाठी अनेकांची पळापळ;...अकोला ः राज्याच्या कुठल्याही विभागात नसेल असा...
देशात खरीप पेरणीला प्रारंभनवी दिल्ली ः देशात खरीप हंगाम २०१८-१९ च्या...
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर,...पुणे : विदर्भात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची...
सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानीजळगाव : कापूस गाठींच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या...
कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित;...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने...
शेतीतील नव तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा...अकोला :  भारतीय शेतकरी जागतिक बाजारात...
उपाय आहेत, इच्छाशक्ती हवी ! पुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर...
शालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा :...राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे....
दूधधंदा मोडून पडल्यास शेतीतील समस्या...शेतकऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता त्यांच्या...
दूधदर प्रश्‍नी हवी ठोस उपाययोजना : संघदूध भुकटीला मागणीला नसल्याने अतिरिक्त दूध बाजारात...
दूधकोंडी फोडण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी...दूध उत्पादक शेतकरी दर मिळत नसल्याने अडचणीत आले...
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यकपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी...
दूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य...सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज...