agricultural success story in marathi, agrowon,gavrai,badnapur, jalna | Agrowon

बैलांसाठी गेवराईचा बाजार सर्वदूर प्रसिद्ध
संतोष मुंढे
शुक्रवार, 9 मार्च 2018

जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्‍यातील गेवराई येथील जनावरे बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहेत. पूर्वी त्याचे स्वरूप केवळ आठवडी बाजारापुरते मर्यादित होते. भाजीपाला, गृहपयोगी साहित्यासोबतच विविध जातींचे बैल, गायी, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या आदींचा बाजार सुरू झाला. आज मोठ्या प्रमाणात येथे विविध जातींच्या जनावरांची खरेदी-विक्री करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते. त्यातून मोठी उलाढालही घडते आहे.

जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्‍यातील गेवराई येथील जनावरे बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहेत. पूर्वी त्याचे स्वरूप केवळ आठवडी बाजारापुरते मर्यादित होते. भाजीपाला, गृहपयोगी साहित्यासोबतच विविध जातींचे बैल, गायी, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या आदींचा बाजार सुरू झाला. आज मोठ्या प्रमाणात येथे विविध जातींच्या जनावरांची खरेदी-विक्री करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते. त्यातून मोठी उलाढालही घडते आहे.

सन १९५२ मध्ये गेवराईला (ता. बदनापूर, जि. जालना) ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या बाजाराला निजामकालीन इतिहास असल्याचे गावकरी सांगतात. दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी भरणारा गेवराईचा बाजार विशेषतः कोकणी, लालकंधार व त्यातही बैलांसाठी प्रसिद्ध आहे.

गेवराईच्या बाजाराचे स्वरूप

 • दहा रुपयांची प्रत्येक जनावरांसाठी पावती फाडून बाजारात प्रवेश मिळतो.
 • बाजाराचे ठिकाण- आरोग्य उपकेंद्राला लागून असलेल्या जागेत. ग्रामपंचायतीचे नियंत्रण असलेली ही जागा ग्रामपंचायतीकडून कुंपणाद्वारे संरक्षित करण्यात आली आहे.
 • चिखल होऊ नये म्हणून बाजाराच्या जागेवर मोठ्या प्रमाणात मुरूम भरण्यात आला आहे.
 • खरेदी केलेले जनावर वाहनात चढविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने धक्‍के बनविण्यात आले आहेत.

जनावरांची आवक-जावक

 • एप्रिल ते जून यादरम्यान बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात, बुलडाणा जिल्ह्यातूनही शेतकरी खरेदीसाठी येतात.
 • कमीतकमी ३० हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंतची बैलजोडी विक्रीसाठी
 • आठवड्याला व्यापाऱ्यांचेच किमान दीड ते दोन हजार बैल. त्याव्यतिरिक्‍त शेतकऱ्यांचेही बैल.

बैलाच्या बदल्यात बैल
बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे थोडी रक्‍कम देऊन शेतकऱ्यांना उधारीवर बैलजोडी मिळण्याची सोय आहे. बैलात 'बट्‌टा' असल्यास ठरल्यानुसार बैलाच्या बदल्यात बैल देण्याची संधी मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी वर्षानुवर्षे या बाजाराला पसंती देतात.

उलाढाल

 • प्रति २५ हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत किमती असणाऱ्या शंभर ते दीडशे ते दोनशे म्हशी. साधारण ५० म्हशींची विक्री.
 • पाचशे ते दोन हजारांपर्यंत शेळ्या. चार हजारांपासून सात हजारांपर्यंत प्रतिशेळीला दर.
 • साधारणत: दीडशे बैलजोडींची सरासरी प्रत्येक आठवड्याला तर दुपारी एक वाजेपर्यंत एक हजारावर शेळ्यांची विक्री
 • गायी साधारणत: तीस ते चाळीसपर्यंत विकल्या जातात. संख्येने शंभरापासून हजारपर्यंत मेढ्यांची प्रत्येक आठवड्याला विक्री. प्रतिसरासरी चार हजारांपर्यंत दर. किमान सहाशे कोंबड्या सरासरी दोनशेप्रमाणे विकल्या जातात.
 • झुला, घुंगर, घंटा, विळे, पोळ्याचा साज, गाडीबैलांचे जू आदींच्या विक्रीचीही दुकाने असतात. बैलांची शिंगे साळणाऱ्या व्यक्‍तीचेही चालते फिरते दुकान पाहण्यास मिळते.

शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांनाही मागणी
मराठवाड्यातील विविध भागांतून शेळ्या, मेंढ्या आणल्या जातात. गावरान, उस्मानाबादी जातींचा समावेश अधिक असतो. सकाळी साडेसात ते साडेबारा एकपर्यंत हा बाजार भरतो. गिरिराज तसेच अलीकडे अनेकांकडून मागणी असलेल्या कडकनाथ कोंबड्यांचीही काही प्रमाणात आवक होते.

प्रतिक्रिया
अनेक वर्षांपासून या बाजाराशी नाळ जुळली आहे. शेतकऱ्यांकडून विविध जातींचे बैल विकत घेऊन ती शेतकऱ्यांनाचा विकण्याचा व्यवसाय करतो.
-शहानूर पठाण, बैलाचे व्यापारी

आमच्याकडे मोठ्या प्रमाणात चाऱ्याची कायम व्यवस्था असते. अनेक वर्षांपासून गेवराईच्या बाजारातून बैलांची खरेदी करतो.
-परशराम नवपुते.
शेतकरी चिकलठाणा, जि. औरंगाबाद

या बाजारात पूर्वीपासून येतो. अनेक वर्षांपासून त्याची सर्वदूर ख्याती आहे.
-रामेश्वर ढगे, खंडू वीर
खोडेगाव, ता. जि. औरंगाबाद.
-शेख रुस्तम, भाकरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना.
जनार्दन परांडे, गाढेजळगाव, जि. औरंगाबाद

बैलांच्या खरेदी-विक्रीच्या निमित्ताने अनेक बाजार गेल्या चाळीस वर्षांत फिरलो; परंतु गेवराई बाजारात
एकही तक्रार करण्याची वेळ इथल्या व्यवस्थापनाने येऊ दिलेली नाही.
-रामदास कदम
शेलू चाठा, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद.

एप्रिल ते जुलै या काळात शेतकऱ्यांची बाजारात बैल, गायी, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या आदींच्या खरेदीसाठी धूम असते. ऑक्‍टोबर ते डिसेंबर शेतकरी आपल्याकडील जनावरांची विक्री करण्याला पसंती देतात. सहा महिने चांगल्या चालणाऱ्या बाजारात सहा महिने संख्या बऱ्यापैकी घटलेली असते.
-सय्यद वसी जैदी.
बाजाराचे कंत्राटदार
गेवराई बाजार, जि. जालना.

व्याप्ती वाढल्याने आधीच्या ठिकाणाहून बाजार दुसऱ्या ठिकाणी जवळपास दहा वर्षांपूर्वी हलविण्यात आला. ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेच्या कामांसोबतच पाण्याची, धक्‍क्‍यांचीही व्यवस्था करण्यात आली अाहे. कंत्राटातून मिळणाऱ्या रकमेतून विकासकामे पूर्ण केली जातात.
-सुरेश लहाने-९५४५३९६८४१
ग्रामपंचायत सदस्य

पाच वर्षे सरपंच म्हणून काम पाहताना बाजाराच्या एकूणच व्यवस्थेशी जवळून संबंध आला. या बाजारात औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील शेतकरी व खरेदीदार मोठ्या प्रमाणात येतात.
-रुंजाजी होर्शीळ
माजी सरपंच, गेवराई

आमच्या गावासह आसपासच्या गावांतील वादाचे निवाडे आमच्याच गावात होत असत. आधी गुढीपाडव्याला गावात जत्राही भरायची. आता जत्रेचं स्वरूप छोटं झालयं. पणं पूर्वापार चालत आलेल्या व मोठ्या झालेल्या बाजारानं गावाचं नावही आता गेवराई बाजार असं झालं आहे.
-गणेश जोशी
प्रयोगशील युवा शेतकरी, गेवराई
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...