agricultural success story in marathi, agrowon,javalaga budruk, latur | Agrowon

परस्परांची साथ लाभली,प्रगतीची दारे खुली झाली
रमेश चिल्ले
शनिवार, 24 मार्च 2018

लातूर जिल्ह्यातील जवळा (बु.) व्हाया बोरगाव येथील ब्याळे दांपत्याने केवळ अडीच एकर शेती असतानाही उत्पन्नाचे विविध मार्ग शोधून आपले जीवनमान व अर्थकारण उंचावले आहे. शेतीबरोबरच महिला बचत गटाच्या माध्यमातून पत्नीने तर जोडधंद्याच्या माध्यमातून पतीने मोठा हातभार लावला. त्यामुळेच प्रगतीची दारे त्यांच्यासाठी खुली झाली.

लातूर जिल्ह्यातील जवळा (बु.) व्हाया बोरगाव येथील ब्याळे दांपत्याने केवळ अडीच एकर शेती असतानाही उत्पन्नाचे विविध मार्ग शोधून आपले जीवनमान व अर्थकारण उंचावले आहे. शेतीबरोबरच महिला बचत गटाच्या माध्यमातून पत्नीने तर जोडधंद्याच्या माध्यमातून पतीने मोठा हातभार लावला. त्यामुळेच प्रगतीची दारे त्यांच्यासाठी खुली झाली.

परिस्थिती आणि नैसर्गिक समस्या व्यक्तीला प्रयत्नवादी बनवतात. त्यातूनच पारंपरिक पद्धतीला छेद देत नवे काही करून दाखवण्याची उभारी येते. लोक काय म्हणतील याचा विचार करत न बसता स्वतःमधील ऊर्जेला वाट मोकळी करून प्रयत्नांची शिकस्त केली की काहीतरी पदरात पडतेच. जवळा बुद्रुक (ता. जि. लातूर) येथील दैवशाला व शिवकुमार या ब्याळे दांपत्याचा हाच आदर्श घेण्याजोगा आहे.

शेतीतील प्रयत्नवाद
शिवकुमार यांची कोरडवाहू शेती. केवळ हंगामी पिके येत. त्यातून कुटुंबाचे जेमतेम दोनवेळचे भागायचे. पण एवढ्यावरच समाधान मानेल ती गृहलक्ष्मी कसली? तिने (दैवशाला) कंबर कसली म्हणून पतीला भरभक्कम साथ लाभली. मग दोघांनी लहान विहीर घेऊन पाण्याची व्यवस्था केली. पण शेतीतून फारसे हाती काही येत नव्हते. मग पतीने ‘स्पीकर’ भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. येणाऱ्या पैशांतून पुढे भुईमूग दोन एकर केला. दर चांगला मिळाला. त्यातून बरे पैसे शिल्लक राहिले. बॅंकेकडून वर्षभर चकरा मारून कर्ज घेऊन स्प्रिंकलर घेतले. पाइपलाइन केली.

बचत गटाच्या माध्यमातून सक्रिय
दैवशाला यांनीही २००६ च्या दरम्यान पुढाकार घेतला. त्यातून ऐश्‍वर्यादैवी महिला शेतकरी बचत गटाची स्थापना केली. दर महिना शंभर रुपये बचत करून गटातील बारा महिला अडचणीला मदत करीत. पुढे आणखी बऱ्याच जणी येऊन मिळाल्या. पुढे मन्मथमाऊली महिला बचत स्थापन झाला. इतर बंद गटही चालू झाले. त्यातून पिठाची गिरणी, डाळमील, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय भाजीपाला व अन्य पूरक व्यवसायांना चालना मिळाली. गटातील अनेक महिला आज घरासाठी आधार बनून मुलांच्या शिक्षणाला, घराच्या उभारणीला मदत करीत आहेत. एकेक करीत निर्माण झालेल्या गावातल्या पंचवीस गटांचा महासंघ एकता जिजाऊ महिला बचत गट या नावाने स्थापन झाला. तो नाबार्डकडे जोडला गेला. या गटांना ‘आत्मा’, स्वयंशिक्षण प्रयोग परिवाराने मोलाची मदत केली. आत्मविश्‍वास व कामांतील सातत्य यातून दैवशाला यांनीही स्वतःमधील उद्योजकत्व सिद्ध केले.

विविध प्रयोगांतून प्रगतीकडे
आज ब्याळे दांपत्य शेती व पूरक व्यवसायात एकमेकांचे कष्ट वाटून घेत प्रगतीचा एकेक टप्पा पुढे जात आहेत. पूर्वी सावकाराकडून कर्ज काढण्याची वेळ होती. आज हे दांपत्य आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले आहे. खरीप, रब्बी हंगामांतील पिकांची शेती सुरू आहेच. शिवाय दहा देशी गायी आहेत. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च करून चांगला गोठा बांधला. साधारण २० लिटरपर्यंत दूध दररोज डेअरीला घातले जाते. त्याची जबाबदारी शिवकुमार सांभाळतात.

हायड्रोपोनिक्स चारा, मूरघास
मांजरा कृषी विज्ञान केंद्राची मदत घेऊन यंदा एक पिशवीभर मूरघास तयार केले आहे. कडबाकुट्टी यंत्र घेतले आहे. हिरव्या चाऱ्यासाठी ल्युसर्न, जयवंत गवत प्रत्येक पाच गुंठ्यावर लावले आहे. अझोला खाद्य तयार केले जाते. चौदा ट्रेच्या आधारे हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा उत्पादित केला जातो. एस-९ कल्चर वापरून बायोडायनॅमिक पद्धतीने खत बनवले जात आहे. साधारण तील किलो निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यंदाच्या वर्षीपासून सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. पुढील काळात सेंद्रिय चारा व त्यावर आधारित देशी गायींचे सेंद्रिय दूध पॅकिंग करून लातुरात विक्री करण्याचे नियोजन आहे. मुलगा शशीशेखरही आता शेतीत उतरलाय. त्याने कृषी पदविका घेतली आहे. नव्या विचारांनी तो प्रयोग करतो आहे. कर्ज काढून मोठा ट्रॅक्‍टर, मळणी यंत्र, रोटावेटर यंत्रे घेतली आहेत.

शेळीपालन, ऊस रोपवाटिका
शेती, दुग्ध व्यवसायाच्या जोडीला उस्मानाबादी, सिरोही, बोअर जातींच्या शेळ्यांचे पालन सुरू केले आहे. एका शेळीच्या संख्येपासून आज १५ पर्यंत संख्या झाली आहे. यंदाच्या वर्षी पाच बोकडांचीही विक्री केली आहे. सेंद्रिय पद्धतीचा गहू, ज्वारी, हरभरा, मूग, तूर, कांदा, लसूण किमान घरच्यापुरता तरी पिकवण्याचा प्रयत्न आहे. ऊस रोपवाटिकाही सुरू केली आहे. काही प्रमाणात भाजीपालाही पिकवतात. दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत यांचा उपयोग केला जातो. यासाठीची प्रशिक्षणे सर्व महिलांसाठी ब्याळे यांच्या शेतात घेतली जातात. त्यामुळे रसायनांवर होणारा अतिरिक्त खर्च वाचून येणारा उत्पादन खर्च कमी झाला.

प्रगतीच्या वाटा
मातीत राबून दैवशाला यांनी बचत गटाच्या माध्यमातून पैशाला पैसा जोडला. दांपत्याने शेती सिंचनाखाली आणली. बांधावर पंचवीस नारळाची झाडे लावली आहेत. त्यातून वीसेक हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
एका मुलाला कृषी पदविकेचे तर दुसऱ्याला (पवन) इंजिनिअरिंगचे शिक्षण देणे शक्य झाले. मुलगीही चांगल्या घरात दिली, याचे दांपत्याला समाधान आहे. जुने पडके घर भूकंपानंतर बांधून घेतले.
घराची मालकीही पत्नीच्या नावे, शेतीचा तुकडाही त्यांच्याच नावे करण्याचा सुज्ञपणा शिवकुमार यांनी दाखवला. ते ॲग्रोवनचे नियमित वाचकही आहेत. त्यांच्या वाचनातूनच भाजीपाला शेतीत सुधारित तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला.

बचत गटाचे झाले फायदे
देवशाला बचत गटातही सक्रिय असल्याचे काही फायदे झाले. गटातील बऱ्याच जणी गावी पाटोदा (जि. बीड) येथे बोअर पुनर्भरण, पाणलोट प्रयोग पाहण्यासाठी सहलीचा अनुभव घेऊन आल्या. मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर, उस्मानाबाद येथे सोयाबीनपासून उपपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण पन्नास महिलांनी घेतले. त्यात सोया दूध, दही, सोयाशेव, चकली, पनीर, चिवडा, खाकरा असे उपपदार्थ बनवून गटातल्या महिला कृषी प्रदर्शनात विक्री करतात. दैवशाला यांच्यासारख्या हिरकण्या पुढे आल्याने अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे. साहजिकच त्यांची समर्थ साथ लाभून प्रत्येकीच्या घरातील शेतीलाही मोठी चालना मिळाली आहे.

संपर्क- सौ. देवशाला शिवकुमार ब्याळे - ९७६६३५४६३१
शिवकुमार ब्याळे - ९५०३४९८४३३

(लेखक लातूर कृषी विभागांतर्गत मंडळ कृषी अधिकारी आहेत.)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...
प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...
पणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...
सावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...
शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...
शेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...
ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...
किमान तापमानात हळूहळू वाढपुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...
रोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...
सर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...