agricultural success story in marathi, agrowon,palghar | Agrowon

लाकडी घाण्यावर शुद्ध खाद्यतेलांची निर्मित, प्रक्रिया उद्यागोचा ‘स्टार्ट अप’
उत्तम सहाणे
शुक्रवार, 11 मे 2018

शेतकरी स्वतःच कच्चा माल उत्पा.िदत करतात. त्यामुळे तेलनिर्मिती करणे त्यांना कमी खर्चिक राहील.
घाण्यावर तयार केलेल्या खाद्यतेलांना बाजारात चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठा व ग्राहकांचा अधिक अभ्यास केला, तर त्यांना हा उद्योग फायदेशीर होऊ शकतो.
-हर्षदा टोणगावकर

ठाणे भागातील उपनगर डोंबिवली येथील सौ. हर्षदा टोणगावकर यांनी पालघर येथे लाकडी घाण्यावरील खाद्यतेलनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे सहा प्रकारच्या तेलांची निर्मिती त्या करतात. शुद्ध व नैसर्गिकरीत्या उत्पादित खाद्यतेलांची मागणी लक्षात घेऊन सध्या ‘स्टार्ट अप’ अवस्थेत असलेला हा व्यवसाय भविष्यात विस्तारण्याचे उ.िद्दष्ट ठेवून त्यांचे प्रयत्न सुरू झाले अाहेत.
 

सध्याच्या काळात आयुर्वेदिक, सें.िद्रय, नैसर्गिक अशा शब्दांचे महत्त्व वाढू लागले आहे. ग्राहक आरोग्याबाबत अत्यंत जागरूक झाल्यानेच तो अशा उत्पादनांची मागणी करू लागला आहे. काळाची हीच गरज अोळखली ती सौ. हर्षदा विवेक टोणगावकर यांनी. मुंबई-ठाणे भागातील प्रसिद्ध उपनगर असलेल्या डोंबिवली येथे त्या राहतात. शेतीची त्यांना तशी काहीच पार्श्वभूमी नाही. त्यांचे पती
इंटिरियर डेकोरेटिंगचा व्यवसाय करतात. मात्र, खाद्यतेलनिर्मितीच्या निमित्ताने हर्षदा यांचा आता शेतीप्रक्रिया उद्योगाशी संबंध येऊ लागला आहे.

प्रक्रिया उद्योगाची चालना
खाद्यतेल हा स्वयंपाकाचा पाया आहे. हा पायाच जर अधिक शुद्ध, सात्विक व नैसर्गिक असेल, तर तयार होणारे पदार्थही त्याच गुणवत्तेचे असतात. पण, हे करायचे कोणी? आपणच का सुरू करू नये? अशीच संकल्पना मनाशी बाळगून हर्षदा खाद्यतेल निर्मितीत उतरल्या. अर्थात, हा व्यवसाय म्हणजे आपली ‘सेकंड इनिंग’ अाहे. मात्र, त्यात खूप समाधान असल्याचे त्या सांगतात. त्यांचे सध्याचे वय पन्नाशीपर्यंतचे आहे. पतीसोबत त्या नायजेरिया (आफ्रिका) येथे दहा वर्षे राहिल्या. सन २००३ मध्ये भारतात परतल्या. त्यानंतर मुंबई व तीन वर्षे चेन्नई येथे त्यांनी ‘कॉस्ट अकाउंट’ म्हणून वाहनउद्योगातील आघाडीच्या कंपन्यांत नोकरीचा अनुभव घेतला. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनुभव घेतल्याने शिस्त, कार्यपद्धती, व्यावसायिक दृ.िष्टकोन तयार झाला होता.

...आणि उद्योग उभा केला
नोकरी सोडून खाद्यतेलनिर्मिती उद्योग सुरू करण्याबाबत पतीशी चर्चा केली. सुमारे वर्षभर तेलबिया, तेले, बाजारपेठ यांचा अभ्यास केला. नाशिक येथील खादी ग्रामोद्योग केंद्रात तेलघाणी उत्पादन प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रयोगशाळेतील आवश्यक चाचण्या शिकून घेतल्या. येत्या काही काळात बोरीवली येथे वास्तव्यास त्या जाणार असल्याने उद्योगाला सोयीस्कर अशी जागा त्यांना पालघर येथे मिळाली. लाकडी घाण्याचे यंत्र खरेदी केले. सुमारे सहाशे चौरस मीटर जागेत उत्पादन सुरू केले.

अशी होते तेलनिर्मिती

 • या पद्धतीत उच्च प्रतीच्या तेलबिया काळजीपूर्वक निवडून स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात त्या लाकडी घाण्यावर दळल्या जातात.
 • यात तेलबियांवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया किंवा रसायनांचा वापर केला जात नाही. असे तेल
 • उत्तम गुणवत्तेचे असते, असे हर्षदा सांगतात.
 • या प्रक्रियेत अग्नीचाही वापर केला जात नाही. ‘कोल्ड प्रेस’ पद्धतीने त्याचे उत्पादन होते.
 • अन्य प्रक्रियायुक्त तेल अनेक वेळा उष्ण होण्याच्या प्रक्रियेतून गेलेले असते. काही वेळा त्यापासून ॲसिडीटी होण्याची शक्यता असते. तसे या तेलाबाबत होत नसल्याचे हर्षदा सांगतात.

सहा प्रकारच्या तेलांचे उत्पादन

 • कच्च्या मालात शेंगदाणा नाशिकहून, तर तीळ, जवस, करडई, खोबरे वाशी येथून घेतले जाते. एकाच वेळी पुरेसा माल खरेदी केला, तर दरांमध्ये परवडते.
 • अदिती व्हर्जिन ऑईल या ब्रॅंडने पुढील सहा प्रकारच्या तेलांचे उत्पादन होते.
 • शेंगदाणा, तीळ, मोहरी, खोबरे, करडई, जवस.
 • पैकी करडई व जवस तेलाचे मागणीनुसार उत्पादन.
 • हर्षदा यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक तेलाचा विशिष्ट गुण आहे. त्यानुसार आपले आरोग्य ती निरोगी व शुद्ध ठेवायला मदत करतात. नारळाचे तेल स्फूर्ती, उत्साहासाठी, मोहरीचं तेल रोगप्रतिकार शक्तीसाठी, तिळाचं तेल रक्ताभिसरणासाठी, तर शेंगदाण्याचं तेल रक्तपेशींच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे.
 • कच्च्या मालापासून तेलाचा उतारा- सरासरी ३० ते ४५ किलो (मालाच्या प्रकारावर अवलंबून)
 • दररोज १२५ ते १५० किलो कच्च्या मालाची गरज.
 • महिन्याला सुमारे २५ दिवस तेलघाणी चालते.

विक्री व्यवस्था
सध्या बहुतांशी ग्राहक बाजारातील रिफाइंड तेलाचाच वापर करतात. घाणीचे तेल ही जुनी मात्र आरोग्यासाठी चांगली पद्धत काळानुरूप लुप्त होत आहे. त्याला हर्षदा पुनरुज्जीवीत करीत आहेत. सध्या आपले अोळखीचे लोक, नातेवाईक, हितचिंतक व प्रदर्शने याद्वारे त्या तेलांचे मार्केटिंग करीत आहेत. व्यवसायाला अलीकडेच सुरुवात केली आहे. त्याला ‘स्टार्ट अप’ असेच म्हणता येईल. आत्तापर्यंत सुमारे १००० ते १२०० लिटर तेलाची विक्री झाली आहे. मात्र, ‘रिपीट आॅर्डर्स’ येऊ लागल्याचे त्या सांगतात. येत्या काळात वितरक नेमून उद्योगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न आहे.

दर रु. (प्रति लिटरचे)
-मोहरी- २५०
-करडई- ३००
-शेंगदाणा- ३५०
-तीळ- ४००
जवस- ८००

बायप्रोडक्टचे पैसे
तेलनिर्मितीत पेंडीचेही उपउत्पादन मिळते. ही पेंड जनावरांना विशेषतः दुभत्या जनावरांसाठी अतिशय पौष्टिक आहार आहे. अशा पेंडीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने अर्थातच प्रथिने जास्त मिळाल्यामुळे गाई- म्हशी जास्त दूध देतात. त्यांचे आरोग्य चांगले राहते. प्रतिकारक शक्ती वाढून रोगराई कमी होते. सध्या पेंडीची विक्री पालघर परिसरातील शेतकऱ्यांना केली जाते.

भांडवल

 • यंत्रसामग्रीसाठी सुमारे अडीच लाख रुपये, तर प्रयोगशाळा उभारणीसाठी दीड लाख रुपये गुंतवले.
 • सध्या दोन कामगारांना रोजगार दिला आहे.

सासूने सुनेचे नाव दिले उद्योगाला
हर्षदा यांना दोन मुले आहेत. पैकी एकाचे लग्न ठरले आहे. आपल्या भावी सुनेचेच नाव तेलउद्योगाला देत सासूने वेगळाच पायंडा पाडल्याचे या उदाहरणावरून दिसून येते.

संपर्क- हर्षदा टोणगावकर- ९९३०१४१९९३
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील,
जि. पालघर येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...