agricultural success story in marathi, agrowon,pathardi, nagar | Agrowon

शेतीत विविध प्रयोगांसह थेट विक्रीतून कमावला नफा
सूर्यकांत नेटके
शनिवार, 12 मे 2018


आम्ही दोघे बंधू नोकरी संभाळून शेतीत जीव ओतून काम करतो. सातत्याने वेगवेगळी पिके घेतल्याने अनुभवही विविध येतात. मार्गदर्शनासाठी ॲग्रोवनचे वाचन करतो.
-सुनील पानखडे

पाथर्डी (जि. नगर) येथील पानखडे बंधूंनी नोकरी सांभाळत कष्ट व अभ्यासपूर्वक आपली शेती प्रयोगशील केली आहे. चाराविक्रीचा जुना व्यवसाय जपताना विविध पीकप्रयोग केले. थेट ग्राहकांना विक्री करीत व्यापाऱ्यांपेक्षा दुप्पट दर कमावला. पाणीटंचाई असलेल्या भागात कुटुंबातील सर्वांनी मिळून शेतीत केलेले प्रयत्न त्यांना प्रगतिपथावर घेऊन गेले आहेत.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी हा दुष्काळी तालुका आहे. काही अपवाद वगळता येथील बहुतांश भाग जिरायती आहे. त्यातही विविध प्रयोग करणे शेतकऱ्यांसाठी आव्हानाचे असते. पाथर्डी शहराच्या दक्षिणेला संत वामनभाऊ नगर परिसरात राहणाऱ्या पानखडे बंधूनी हे आव्हान पेलत सर्व समस्यांवर मात करीत एकात्मीक शेतीचा आदर्श तयार केला. याचबरोबर आपल्या मालाचे स्वतःच मार्केटिंग करीत विक्री व्यवस्थाही चोख केली.

पानखडे बंधूंची पार्श्वभूमी

 • अनिल - मोठे बंधू - एमए बीएड. विद्यालयात माध्यमिक शिक्षक
 • सुनील - धाकटे बंधू - बीएस्सी ॲग्री - डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयात (तीसगाव) शिक्षक
 • पहाटे चार वाजता दिवस सुरू होतो. नोकरीला जाण्याच्या वेळेपर्यंत शेतीची कामे. नोकरीहून आल्यानंतरही शक्य ती कामे. रात्री १० ते ११ वाजता कामाचा दिवस संपतो.
 • वडील पांडुरंग यांच्या मार्गदर्शनाखाली सात एकर ते पाहतात.

वडिलांचा चाराविक्री व्यवसाय जोपासला

 • पानखडे बंधूंच्या वडिलांनी संसाराला हातभार लागावा यासाठी पन्नास वर्षांपूर्वी पाथर्डीत मका व अन्य चाराविक्रीचा व्यवसाय सुरू केला. तो दोघा बंधूंनी आजही जोपासला आहे.
 • दीड एकरात चारा पीकक्षेत्र. दोघांपैकी वेळेनुसार एकजण दररोज सकाळी तीनशे- चारशे जुड्या घेऊन शहरात जाऊन विक्री करतात. प्रति शंभर जुड्यांना शंभर रुपये दर मिळतो. या उत्पन्नावर घरखर्च भागतो. घास कापणीसाठी कुटुंबातील महिलांची मदत मिळते. घासाच्या लागवडीतून सलग चार वर्षे उत्पादन मिळते.

थेट विक्रीतून फायदा

 • गेल्या वर्षी दोन एकरांत लसूण. त्यातून चार टन उत्पादन. त्याआधी प्रत्येकी दीड एकरात आले तर गादी वाफ्यावर बटाटा घेतला.
 • लसूण विक्री-  पानखडे कुुंबातील सदस्यांनी शेवगाव, पाथर्डी येथे आठवडी बाजारात ४० रुपये प्रतिकिलो स्वतः हातविक्री केली. किलोला १५० ते १७० रुपयांपर्यंत दर मिळाला.
 • बटाटा हातविक्रीतून एक लाख ३५ हजार रुपये उत्पन्न मागील वर्षी मिळाले.

खरबूज असे परवडले

 • मागील डिसेंबरमध्ये प्रथमच हे पीक लावले.
 • ज्या वेळी इतरांची खरबुजे मार्केटमध्ये येऊ लागली त्या वेळी पानखडे यांच्याकडील खरबुजे संपू लागली होती. त्याचा मोठा फायदा मिळाला.
 • फळाचे वजन- ६५० ग्रॅम व त्यापुढेही
 • स्वतः विक्री- आठवडी बाजार- पाथर्डी, तीसगाव, कोरडगाव
 • व्यापारी दर- किलोला ३५ ते ४० रु. पुणे, नगर, मुंबई, नाशिक- किलोला १८, १२, १० रुपये
 • दोन एकर ३ गुंठ्यांत २० टनांपुढे उत्पादन मिळाले. बहुतांश सर्व मालाची हातविक्री

थेट विक्रीत राबले सारे कुटुंब
शेती, फळकाढणी, रानातून घरापर्यंत रोज दोन टनांपर्यंत माल पोचवणे, तेथून वेगवेगळ्या आठवडी बाजारांत माल घेऊन जाणे, तो विकणे या विविध कामांत घरातील विविध सदस्य राबले. यात बंधू अनिल व त्यांची पत्नी, वैशाली सुनील पानखडे, वडील पांडुरंग, आई जीजाबाई, बहीण सुरेखा राधाकिसन लागे आदींचा समावेश राहिला.

पानखडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

 • यंदा खरबुजासाठी पॉलिमल्चिंग आणि बेडचा वापर.
 • ठिबकच्या वापरामुळे कमी पाण्यात तसेच जैविक घटकांचा अधिक वापर. त्यामुळे उत्पादन दर्जेदार
 • दोन एकरांत २०१२ मध्ये भगव्या डाळिंबाची सहाशे झाडे लावली. मुख्य नाशिक तर उर्वरित राहाता, सोलापूर आदी ठिकाणी विक्री
 • शेताच्या बांधावर १६ वर्षांपूर्वी नारळाच्या सव्वाशे झाडांची लागवड. त्यातील ४५ झाडे जगली.
 • ती दहा वर्षांपासून उत्पादन देतात. प्रतिझाड ८० ते १०० नारळ देतात. ग्राहक शहाळ्यांसाठी घरी येऊन माल घेऊन जातात. त्यास पाच रुपयांपासून पंचवीस रुपयांपर्यंत दर मिळतो. वर्षाला त्यातून चांगले उत्पन्न मिळते.
 • पूर्वी पारंपरिक शेतीत पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. १९९४ मध्ये बोअर घेतले. २०१४ मध्ये वीस लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारले.
 • कुटुंब एकोप्याने वेगवेगळे प्रयोग शेतीत करते. त्यातूनच प्रगती साधत वडिलोपार्जित घरातून आता टूमदार देखण्या बंगल्यात ते लवकरच प्रवेश करणार आहेत.
 • जास्तीत जास्त जैविक खताचा वापर
 • उन्हाळ्यात शेततळ्याद्वारे पिके जगवतात.
 • नोकरी सांभाळूनही दोघा बंधूंचे शेतीत उत्तम लक्ष 

संपर्क-
अनिल पानखडे - ९४२३४४३९८१
सुनील पानखडे - ९८५०१७६७२२

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....