agricultural success story in marathi, agrowon,pilkhede, jalgaon | Agrowon

सुधारित केळी शेतीतून विकास साधणारे पिलखेडे
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 14 जून 2018

गावात शेती व ग्रामविकास हे एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. ग्रामस्थांची एकी, शिक्षणासंबंधीचा सकारात्मक दृष्टिकोन यातूनच या बाबी साध्य होत आहेत. ग्रामस्थ केळीची आधुनिक शेती करतात.
- दत्तात्रेय चौधरी, शेतकरी, पिलखेडे

जळगाव जिल्ह्यातील पिलखेडे गाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. सुधारित पद्धतीने केळीची शेती करून व्यापाऱ्यांनाही खरेदीसाठी आपल्या गावात आणणे येथील ग्रामस्थांनी भाग पाडले आहे. गावाने अनेक उच्चशिक्षित घडवले. अभियंते व डॉक्‍टर यांचे गाव म्हणून पिलखेडेची ओळख तयार झाली आहे. शिक्षणाची कास धरून प्रगतिपथावर असतानाच या मंडळींनी शेतीशी नाळ तोडलेली नाही. शेतीतून ग्रामविकास याच संकल्पनेवर गावाने विकास साधला आहे.

जळगाव जिल्हा म्हणजे केळीचे आगर. या तालुक्‍यातील पिलखेडे हेदेखील केळीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. गिरणा नदीकाठावर हे गाव वसले असून, तापी नदीदेखील गावापासून सुमारे साडेतीन किलोमीटरवर आहे. भूगर्भात मुबलक जलसाठे आहेत. कूपनलिका प्रत्येक शेतात दिसते.

 • पिलखेडे गावाविषयी
 • जळगाव शहरापासून सुमारे २५ किलोमीटरवर
 • लोकसंख्या सुमारे २४००
 • साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्‍क्‍यांवर
 • क्षेत्र सुमारे २०० हेक्‍टर.
 • जमीन काळी कसदार. गिरणाकाठी काही शेतकऱ्यांची जमीन पांढऱ्या मातीची व मध्यम प्रकारची
 • केळीसह पूर्वहंगामी कापूसही काही शेतकरी अनेक वर्षांपासून घेतात.

केळीची उत्पादकता वाढली
पिलखेडेत बागायती क्षेत्र सुमारे ८५ टक्के आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने कंदांचा वापर करून इथले अधिकाधिक शेतकरी केळीची लागवड करायचे. पुढे जमिनी जशा कडक होऊ लागल्या तसे उत्पादन कमी होऊ लागले. उत्पादकता प्रतिरास १४ किलोपर्यंत आली. करपा रोगाचे संकटही २०११-१२ मध्ये आले. प्रमुख पीक संकटात आल्याने शेतकरी एकवटले. त्यांनी आदर्श पीक व्यवस्थापनाचे सामूहिक प्रयत्न सुरू केले. रोगग्रस्त झाडांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यावर भर दिला.

सुधारणा केली, फरक दिसला
आज ठिबकचा वापर गावात जवळपास ९० ते १०० टक्के असावा. ऊतिसंवर्धित रोपांचा वापरही वाढला आहे. पीक फेरपालट कटाक्षाने केली जाते. केळीची उत्पादकता तीन- चार वर्षांत हळूहळू वाढली. ती प्रतिरास २० किलोपर्यंत आणण्यात शेतकऱ्यांनी यश मिळविले. केळीचे क्षेत्र घटू दिले नाही. केळीचे मार्केटिंगही शेतकरी व्यवस्थितपणे करतात. केळी दर्जेदार असल्याने व्यापारी थेट गावात येऊन मोठ्या वाहनातून केळीची वाहतूक करतात.

मार्चपर्यंत केळी उपलब्ध
किलोमागे दीड ते दोन रुपये जादा दर अनेक शेतकऱ्यांना मिळताे. एकरी २५ टन व काहीवेळा त्याहून अधिक उत्पादन पिलखेडेचे शेतकरी घेऊ लागले आहेत. सचोटीने व्यवहाराचे सूत्र शेतकऱ्यांनी बांधल्याने मंदीच्या काळातही व्यापारी पिलखेडे येथील केळीची खरेदी टाळत नाहीत. नोव्हेंबरपासून केळी कापणीसाठी उपलब्ध होऊ लागते. ती मार्चपर्यंत सुरू असते.

जमीन सुपीकतेचे महत्त्व जाणले
जमीन सुपीकतेचे महत्त्व गावातील अनेकांना पटले आहे. केळीचे अवशेष अगदी जाड खांबही शेतात कुजविण्यावर त्यांनी भर दिला आहे. जमिनीत सूक्ष्मजीव वाढावेत, केळीच्या शेतीला अन्नद्रव्ये जमिनीत सहज मिळावेत, यासाठी केळी लागवडीच्या शेतात उडीद, मुगाची खरिपात पेरणी केली जाते. मळणीनंतर काड शेतातच आच्छादन म्हणून पसरविले जाते. शेत नांगरून १५ ते २० दिवस पडू दिले जाते. मग जमीन भुसभुशीत करून ऑक्‍टोबरच्या अखेरीस कांदेबहार किंवा कांदेबाग केळीची लागवड केली जाते.

कपाशीची थेट खरेदी
दर्जेदार कापूस पिकविला जात असल्याने व्यापारी थेट गावात येऊन खरेदी करतात. जिनिंग किंवा शासकीय खरेदी केंद्रात कापूस नेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर मागील पाच- सहा वर्षांत अपवादानेच आली असावी.

गावात उच्चशिक्षितांची संख्या चांगली
एमबीबीएस, एमडी डॉक्‍टरही या गावात घडले अाहेत. संगणक, स्थापत्य या विषयातील अभियंत्यांची संख्याही कमी नाही. व्यवसाय, नोकरीनिमित्त त्यांना शहरात राहावे लागते; परंतु शेतीशी असलेली नाळ त्यांनी तोडलेली नाही. रविवारच्या सुटीला गावी येऊन ते आपल्या शेतीचे व्यवस्थापन करतात.

गावातील विकासकामे

 • मुख्य चौकांमध्ये हायमास्ट दिवे, पेव्हर ब्लॉक्स.
 • चोवीस तास पिण्याचे पाणी
 • पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय कूपनलिकांचे पंप नादुरुस्त झाले तर साई मंदिरापासून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी घेऊन पाण्याची पर्यायी व्यवस्था
 • अंतर्गत रस्त्यांचे १०० टक्के काँक्रिटीकरण
 • प्राथमिक शाळा गावात असून स्वच्छतेवर भर
 • भांडण, तंटे यांच्यापासून दूर राहण्याचा ग्रामस्थांचा भर
 • मूळ गावचे मात्र सध्या पुण्यात राहणाऱ्या जीवन व किरण चौधरी या बंधूंनी गावात साई मंदिराची स्थापना केली. दारूबंदीबाबतही काटेकोर अंमलबजावणी. मंदिराची पाच वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासूनच ही कार्यवाही प्रभावीपणे होऊ लागल्याचे ग्रामस्थ म्हणतात. दिवाळीच्या वेळेस वार्षिक साई पालखी सोहळा. चौधरी बंधूंनी गावातील होतकरू युवकांना पुण्यात रोजगार मिळवून दिला आहे.
 • विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यरत. सन २०१६ पर्यंत वसुली १०० टक्के. सुमारे दोन कोटींवर वित्तपुरवठा सोसायटी प्रत्येक खरिपात करते.
 • शेतशिवारातील रस्ते उत्तम असावेत, यासाठी ग्रामस्थ मागील ८ ते १० वर्षांपासून निधी संकलित करतात. खडी व वाळूचे उत्तम रस्ते तयार. आत्तापर्यंत पाच रस्त्यांचे सुमारे २० किलोमीटर अंतरात खडीकरण
 • काही ठिकाणी वाळू टाकून शेतरस्ते तयार
 • -गिरणा नदीत वाळूचोरीचे प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत लिलावासाठी सकारात्मक ठराव देत नाही.
 • ही चोरी थांबविण्यासाठी ग्रामस्थही विरोध करतात. अनेकदा वाळूचोरी करणारी वाहने ग्रामस्थांनी पकडली आहेत.

प्रतिक्रिय़ा
गावातील मुले, मुली शिकूनसवरून मोठी झाली. त्यांची गाव, शेतीशी नाळ कायम आहे. यामुळे समृद्धी टिकून आहे. शेतीमुळे गावाचा विकास झाला आहे.
-उमानंद चौधरी, शेतकरी

अक्षय नरेंद्र चौधरी- ७०५८५८५८९८

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पीकेव्ही २ बीटी वाणामुळे कापूस...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे...
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मिळणार...चिपळूण, जि. रत्नागिरी ः अलिबागच्या पांढऱ्या...
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...