उसाला निर्यातक्षम केळीची जोड

पैसे देणारे आणि ऊर्जा देणारे पीक म्हणून उसाकडे पाहतो. आमच्या परिसरात केळीची लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. उसाला पर्याय नव्हे; पण त्याला जोड म्हणून त्याकडे वळण्याचा निर्णय २०१२-१३ च्या दरम्यान घेतला. केळीची स्थानिक बाजारपेठेत विक्री करायची नव्हती. त्यामुळे पहिल्यापासूनच निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणे हेच उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने परिपूर्ण अभ्यास व शेतकऱ्यांच्या शेतांच्या भेटी घेतल्या. जमिनीची चांगली मशागत केल्यास व तिची निगा राखल्यास उन्हाळी हंगामातही केळीचे चांगले उत्पादन येऊ शकते. -तृषांत मगदूम
 केळीच्या घडाची स्वच्छता व फणी वेगळी केली जाते.
केळीच्या घडाची स्वच्छता व फणी वेगळी केली जाते.

सांगली जिल्ह्यातील तुंग हा उसाचा हुकमी पट्टा. या पिकाला पर्याय नव्हे; पण त्याला तेवढ्याच हुकमी पिकाची जोड द्यायला हवी. त्याशिवाय उत्पन्नस्रोत वाढणार नाही हे अोळखून येथील युवा शेतकरी तृषांत मगदूम यांनी अलीकडील वर्षांत केळीची शेती सुरू केली आहे. चांगल्या उत्पादनासोबत आश्वासक बाजारपेठ मिळवताना त्यातून अर्थकारण सुधारले आहे. त्यांच्या जोडीला असलेल्या अन्य केळी उत्पादक मित्रांनाही हे पीक फायदेशीर ठरते आहे. सांगली (जिल्ह्याचे ठिकाण) शहरापासून अवघ्या वीस मिनिटांवर असलेले तुंग (ता. मिरज) गाव ढोबळी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील तृषांत अण्णा मगदूम हे युवा शेतकरी. त्यांची शेती साडेचार एकर आहे. गावाचे बागायती क्षेत्र सुमारे ६०० हेक्‍टर आहे. ढोबळी व्यतिरिक्त झेंडू, हळद या पिकांसह ऊस मोठ्या प्रमाणात आहे. गावातील शेतीला कृष्णामाईची (नदी) कृपा आहे. मुबलक पाणी असल्याने भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. पारंपरिक शेती बदलतेय गावात युवक शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. साहजिकच नव्या विचारांसह नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याला प्राधान्य दिले जाते. तरुणांबरोबर जुने जाणते शेतकरीही शेतीतील बदल स्वीकारू लागले आहेत. केवळ विक्रमी उत्पादन न घेता बाजारपेठेचाही अभ्यास करून पिके घेण्यावर अनेकांचा भर आहे. कोणते पीक कधी घ्यायचे याचा अभ्यास झाल्याने प्रत्येकामध्ये निरोगी स्पर्धाच सुरू झाली आहे. नोकरी सोडून गावची शेती तृषांत सांगतात की मी बीए आणि आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. मला नोकरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे पुणे गाठले. तिथे २००२ ते २०१० पर्यंत नोकरी केली. दरम्यानच्या काळात वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पुन्हा गावी परतलो. पहिल्यापासूनच शेतीची आवड असल्याने शेतीचे धडे गिरवणे अवघड गेले नाही. भावाने दाखविली वाट शेती एकमेकांच्या साह्याने आणि सल्ल्याने केली तरच फायद्याची ठरते, पण केवळ एकच पीक न घेता त्यामध्ये विविधता असणे गरचेचे आहे हे तृषांत यांना बंधू अविनाश यांनी शिकवले. सन २००१ मध्ये पहिल्यांदा झेंडूची लागवड केली. त्यामधून उत्पादन अपेक्षित मिळाले. अन् उसाबरोबर अन्य पिके घेण्याचा मगदूम बंधूनी निर्णय घेतला. ताज्या उत्पन्नासाठी आंतरपिके मगदूम म्हणतात, की उसाला सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे पैसे लवकर हातात येत नाहीत. मग उसात आंतरपीक घेतले तर नक्कीच काहीतरी पैसा मिळू शकतो. मग उसात कोथिंबीर, मेथी, फ्लाॅवर यांसारखी पिके घेऊ लागलो; पण ती घेताना बाजारपेठेचा अभ्यास करतो. त्याचा नक्कीच फायदा होतो. दोन पैसे मिळत असल्याने उसातला मोठा खर्च कमी होण्यास मदत होते.

मार्गदर्शन माझे मित्र प्रताप खबाले आणि तुकाराम कापसे, आबासाहेब साळुंखे यांचे मार्गदर्शन केळीसाठी उपयुक्त ठरले. अडचणी येत राहिल्या. पण जिद्द सोडली नाही. मगदूम यांच्या केळी शेतीची वैशिष्ट्ये

  • जमिनीत कोणता घटक कमी, जास्त आहे हे माती परीक्षणातून पाहून त्यानुसार खतांची मात्रा ठरविली जाते. यामुळे जमिनीचा पोत आणि सुपीकता राहण्यास मदत होते.
  • केळीचा हंगाम संपल्यानंतर त्याचे खुंट जमिनीत गाडले जातात. त्यातून
  • सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत
  • जमिनीचा पोत सुधारला जातो
  • केळीच्या रानात उसाची लागवड केल्यास उसाचा उतारा वाढण्यास मदत
  • आडसाली उसाचे उत्पादन
  • पूर्वी - एकरी ६० टनांपर्यंत
  • आता ९० टनांपर्यंत
  • लागवड हंगाम कोणता फायदेशीर? लागवड हंगाम -जून-जुलैपेक्षा एप्रिल-मेचा फायदेशीर ठरतो. कारण  नैसर्गिक आपत्ती उदा. अवकाळी पाऊस या भागात  एप्रिल मेच्या दरम्यान येतो. तोपर्यंत विक्री हंगाम आटोपतो. घडांचे नुकसान होत नाही. निष्कर्ष-

  • मगदूम यांच्या अनुभवानुसार उन्हाळी लागवड पावसाळी हंगामापेक्षा थोडी फायदेशीर
  • त्यांच्या भागात एप्रिल-मेमध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता
  • लागवड हंगाम योग्य प्रकारे न साधल्याने सुमारे दीड लाख रुपयांचा फटका बसल्याचा त्यांच अनुभव
  • उत्पादन (एकरी)

  • पावसाळी हंगाम लागवडीत - ३० ते ३५ टन
  • उन्हाळी - २५ टन
  • सन २०१७ - ३७ टन - दर प्रतिकिलोस १४ रु.
  • यंदा - ३५ गुंठे क्षेत्र - आत्तापर्यंतचे उत्पादन १५ टन - प्लॉट अजून सुरू.
  • दर प्रतिकिलोस साडेतेरा रु.
  • बाजारपेठ मगदूम सांगतात की बांधावर येऊन व्यापारी केळी खरेदी करतात. मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी माल जातो. मागील वर्षापासून व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी माल देत आहे. अलीकडील वर्षांत सरासरी दर किलोला ८ रुपयांपासून १०, १४ रुपयांपर्यंत मिळाला आहे. किफायतशीर अर्थकारण मगदूम सांगतात की एकरी तीस टन उत्पादन व किलोला १० रुपये दर मिळाला, तरी तीन लाख रुपये मिळतात. एक लाख रुपये उत्पादन खर्च धरला तर दोन लाख रुपये हाती पडतात. निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्यासाठी एकरी १० हजार रुपये जादा खर्च होतो. निर्यातक्षम केळीला स्थानिक बाजारपेठेपेक्षा दरही अधिक मिळतो. संपर्क- तृषांत मगदूम - ९८२२५२५८२४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com