सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्ली

अकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची उत्पादकता व दर्जा वाढवण्यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्र व ‘आत्मा’ यांनी पुढाकार घेतला. तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सुधारित लागवड तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यातून एकरी ८० ते ९० क्विंटल मिळणारे उत्पादन दीडपट ते दुपटीपर्यंत म्हणजे १५० ते १७० क्विंटलपर्यंत पोचवण्यात त्यांना यश मिळाले आहे. तंत्रज्ञानाची गुरुकिल्ली सापडलेले शेतकरी आता यापुढेही अशीच प्रगती करीत राहणार आहेत.
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्ली

अकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची उत्पादकता व दर्जा वाढवण्यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्र व ‘आत्मा’ यांनी पुढाकार घेतला. तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सुधारित लागवड तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यातून एकरी ८० ते ९० क्विंटल मिळणारे उत्पादन दीडपट ते दुपटीपर्यंत म्हणजे १५० ते १७० क्विंटलपर्यंत पोचवण्यात त्यांना यश मिळाले आहे. तंत्रज्ञानाची गुरुकिल्ली सापडलेले शेतकरी आता यापुढेही अशीच प्रगती करीत राहणार आहेत.  

  कांदा सुधारित लागवड तंत्र - पार्श्वभूमी

  • कांदा - अकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी भाजीपाला पीक
  • क्षेत्र - सुमारे २५०० हेक्टरहून अधिक  
  • बाळापूर, पातूर, अकोट या भागांत लागवड अधिक राहते.
  • पारंपरिक कांदा शेतीतील त्रुटी

  • उत्पादन कमी - हेक्टरी २१ टनांपर्यंत
  • उत्पादन खर्चात भरमसाट वाढ होत असताना उत्पन्नाची मर्यादा सातत्याने घटणारी
  • अनेक शेतकरी बीजप्रक्रिया करीत नसत.
  • अतिरिक्त व अवेळी नत्राचा अधिक वापर. त्यामुळे कीड तसेच साठवणुकीत ३० ते ४० टक्के कांदा सडायचा.
  • पाण्याचा व्हायचा गरजेपेक्षा जादा वापर
  • काढणीपूर्व काळजीचा अभाव
  • परिस्थितीत बदल घडवण्यासाठी पुढाकार कृषी विज्ञान केंद्र, अकोला  आत्मा- कृषी विभाग  शेतकरी त्यासाठी घेतली सुधारित लागवड तंत्राची प्रात्यक्षिके

    तालुके     अकोट      तेल्हारा     बाळापूर
    शेतकरी     २६    २६    २६   

    घेतलेल्या शेतीशाळा : ६      त्यातील सत्रे : ६  

    काय झाला तंत्रज्ञानाचा बदल ? (ठळक बाबी)

  • वाणबदल
  • रोपांची लागवड करण्यापूर्वी कार्बोसल्फान व कार्बेन्डाझीम द्रावणाची प्रक्रिया - यामुळे थ्रीप्स, बुरशीला पायबंद
  • बेसल डोसवर लक्ष
  • माती परीक्षण अहवालानुसार खते (एकरी)
  • युरिया ४२ किलो
  • सुपर फॉस्फेट - १२५ किलो
  • पोटॅश - ३५ किलो
  • गंधक - १० किलो
  • युरिया - ४२ किलो - ४५ ते ५० दिवसांनी
  • कांद्याची मुळे अवघी १२ ते१५ सेंटिमीटर वाढतात. परंतु शेतकरी पाटसरी पद्धतीने वाफा भरेपर्यंत तुडुंब पाणी देत. ही पद्धत बदलून तुषार सिंचनाचा वापर सुरू केल्याने दर्जा चांगला वाढला. अार्द्रता कमी राहल्याने करपा, थ्रिप्सवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले.
  • काढणीपूर्वी २० दिवस अाधी काजळी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी. कांदा साठवणुकीच्या जागी बुरशीनाशक फवारून निर्जंतुकीकरण
  • विद्राव्य खते- १९-१९-१९,  १२-६१-०, १३-०-४५, ०-५२-३४, ०-०- ५०
  • तुषार सिंचन, निंबोळी ढेप यांचा वापर
  • रुंद वरंबा पद्धत
  • कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क अधिक स्टिकरचा वापर
  • थ्रिप्ससाठी चिकट सापळे
  • वाण

  • काहींकडून स्थानिक देशी वाणाचा वापर
  • प्रात्यक्षिक - बंगळूर येथील आयआयएचआर संस्थेचा अर्का भीम, राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन संचालनायचा भीमा शक्ती
  • झालेले फायदे पाण्याची ३० ते ४० टक्के बचत कारण

  • खुल्या पद्धतीने पाणी देणे बंद झाले.
  • तुषार सिंचनाचा वापर वाढवला.
  • पिकाच्या संवेदनशील अवस्थेतच वापर
  • खत वापरातील बारकावे समजले.
  • गोण्यांचा वापर

    पूर्वी     आता
    ८        

    खतांच्या वापरात तसेच पैशांतही बचत   मुख्य फायदा उत्पादन

    पूर्वी       आता  
    ८० ते ९०  १५० ते १७०

    (क्विंटल - एकरी)

  • सुमारे ७० टक्के कांदा - ए ग्रेडचा
  • शेतकरी प्रतिक्रिया शेतीशाळेतून नवे तंत्र मिळाले. त्यातून गरजेइतकेच खत व्यवस्थापन केले. पाण्याच्या मुख्य तीनच पाळ्या दिल्या. पूर्वी एकरी ४० हजारांपर्यंत होणारा खर्च यंदा १२ ते १५ हजार रुपयांनी कमी झाला. नव्वद ते १०० क्विंटल उत्पादन आता १५० क्विंटलवर पोचले. चार एकरांत सहाशे ते साडेसहाशे क्विंटल कांदा झाला अाहे. संतोष घनमोडे, मांडवा ता. बाळापूर (९४२२१६३६९२)

    यंदा पावणे सहा एकरात कांदा होता. एकरी १७० ते २०० क्विंटलपर्यंत उत्पादन अाले. गावातील शेतीशाळेतील प्रत्येक सत्राला उपस्थित राहल्याने सुधारित तंत्रज्ञान शिकलो. एकरी झाडांची संख्या वाढवत पावणेदोन लाखांपर्यंत नेली. खर्च कमी झाला. गजानन धनभर, बेलखेड, ता. तेल्हारा (९८९००४७४१९)

    यंदा सहा एकरच लागवड होती. लागवडीवेळी पाच बॅग एवढेच रासायनिक खत द्यायचो. यंदा सुपरफॉस्फेट, गंधक, पोटॅश यांचा वापर केला. रोपप्रक्रिया केल्याने फुलकिडे अाले नाहीत. पूर्वी सातव्या दिवशी पाणी द्यायचो. यंदा तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार वाफसा अवस्थेत पाणी दिले. एकरी दीडशे क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन अाले.   भाऊराव रामराव हिवराळे,मांडवा बुद्रुक, ता. बाळापूर (९६६५१२८९९९)

    अकोला जिल्ह्यात कांद्याखाली अडीच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. अजूनही पारंपरिक पद्धतीनेच काही जण कांदा पिकवतात. परतुं काळानुसार बदलताना अनेक सुधारित तंत्रांचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. यात नर्सरीपासून ते काढणीपश्चात तंत्रातील प्रत्येक बाब समजावून दिली.   गजानन तुपकर, विषय विशेषज्ज्ञ,कृषी विज्ञान केंद्र अकोला (८७८८८५६९२७)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com