agricultural success story in marathi, antarwali dist. nagar , Agrowon, Maharashtra | Agrowon

उत्तम आर्थिक नियोजनातून व्यावसायिक पोल्ट्रीचा आदर्श
सूर्यकांत नेटके
सोमवार, 7 मे 2018

आंतरवाली (ता. नेवासा, जि. नगर) येथील अंकुश कानडे यांनी वीस वर्षांपूर्वी देशी कोंबडीपालन सुरू केले. शिक्षकी नोकरीचा राजीनामा देऊन मिळालेली रक्कम या व्यवसायात गुंतवली. कमी गुंतवणुकीत बावीस कोंबड्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता देशी कोंबड्यांची पैदास करणारा राज्यातील मोठा व्यवसाय ठरला आहे. नफ्यातून पुन्हा व्यवसायाचा विस्तार करीत वार्षिक उलाढाल पाच कोटींपर्यंत नेली आहे.

आंतरवाली (ता. नेवासा, जि. नगर) येथील अंकुश कानडे यांनी वीस वर्षांपूर्वी देशी कोंबडीपालन सुरू केले. शिक्षकी नोकरीचा राजीनामा देऊन मिळालेली रक्कम या व्यवसायात गुंतवली. कमी गुंतवणुकीत बावीस कोंबड्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता देशी कोंबड्यांची पैदास करणारा राज्यातील मोठा व्यवसाय ठरला आहे. नफ्यातून पुन्हा आर्थिक नियोजन करत ब्रिडींग फार्म, अंडी व चिकन अशा विविध अंगाने व्यवसायाचा विस्तार करीत वार्षिक उलाढाल पाच कोटींपर्यंत नेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

नगर जिल्ह्यामधील आंतरवाली (ता. नेवासा)
हा परिसर जायकवाडी मध्यम प्रकल्पाजवळ आहे. त्यामुळे या भागात ऊस, दुग्ध व्यवयासाला प्राधान्य दिले जाते. गावात अंकुश व जिजाबाई हे कानडे दांपत्य राहते. अंकुश जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करत असताना काहीतरी व्यवसाय करावा यासाठी धडपड करीत होते. सुरवातीला (१९९७) ब्रॉयलर कोंबडीपालन सुरू केले. मात्र आर्थिक गणित न जुळल्याने तो व्यवसाय थांबवला. त्यानंतर आंतरवालीपासून जवळ कुकाणा (ता. नेवासा) येथील बाजारातून सुमारे दोनहजार देशी कोंबड्यांचे पालन सुरू केले. चार महिन्यांचे संगोपन करण्यासाठी प्रति कोंबडीला ३५ रुपये खर्च आला. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू लागल्यानंतर व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला.

व्यवसायासाठी घेतले कर्ज
कानडे यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी सुरवातीला दोन लाख रुपये खर्च करून तीन हजार चौरस फुटांचे शेड उभे केले. त्यासाठी शिक्षक बॅंकेकडून एक लाख २० हजारांचे कर्ज काढले. त्या वेळी नगरमध्ये असलेल्या एका संस्थेच्या अंडी उबवणी केंद्राची मदत पिल्ले उपलब्ध होण्यासाठी केली जायची. पुढे मात्र अंडी उबवणारी यंत्रणा घेण्याचे कानडे यांनी ठरवले. त्यांनी धाडसाने नोकरीचा राजीनामा दिला. त्या वेळी दोन लाख रुपये खर्च करून या यंत्राची दिल्लीहून खरेदी केली. त्यानंतर जिल्हाभरातील बाजारातून देशी अंडी खरेदी केली. तीन हजार पिल्लांचे संगोपन सुरू केले. प्रतिपक्षी पन्नास रुपये याप्रमाणे दीड लाख रुपये खर्च झाला. मुंबईत कोंबड्यांची विक्री केली. प्रति पक्षाला ८१ रुपये मिळाले. त्यातून एक लाख रुपयाचा नफा मिळाला. वर्षभरात तीन वेळा प्रत्येकी तीन हजार कोंबड्यांचे पालन केले. त्यातून जवळपास
तीन लाख रुपये नफा मिळाला. मिळालेल्या नफ्यातून मिळत असलेल्या पैशाची नियोजनबद्ध गुंतवणूक करत कानडे यांनी व्यवसायाचा विस्तार केला.

व्यवसायवृद्धी केली
आंतरवाली येथे अंडी उबवणी आणि देशी कोंबडी पालनातून दोन वर्षांत बऱ्यापैकी भरभराट झाली. स्वतःच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या पिल्लांसह इतरांसाठीही अंडी उबवून पिले तयार करून देण्याचे काम सुरू केले. महिन्याला साधारण बारा हजार पिल्लांचे उत्पादन व महिन्याला पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळू लागले. देशी पक्षांना मागणी वाढली. प्रती पिलासाठी ४ रुपये खर्च येत असताना ८ रुपये मिळू लागले. देशी पिलांना मागणी वाढू लागली.  

परदेशी कंपनीसोबत कामाला सुरवात
सन २००६ मध्ये थायलंडच्या एका या परदेशी कंपनीमुळे व्यवसायाला बळकटी मिळाली. त्या कंपनीला दर महिन्याला साधारण चार लाख अंडी उबवून हवी होती. तशी क्षमता असलेले यंत्र खरेदी करण्यासाठी कंपनीने १० लाखांची अागाऊ रक्कम दिली. मग कानडे यांनी अंडी उबवणीचे १६ लाख रुपयांचे तिसरे युनिट खरेदी केले. चार वर्षे संबंधित कंपनीसोबत काम केल्याने व्यवसायाला चांगली बळकटी मिळाली.

उलाढाल वाढली
आजअखेर कानडे यांच्या व्यवसायाची उलाढाल पाच कोटींवर पोचली आहे. सुमारे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक आजची आहे. सातत्याने बॅंकेचे घेतलेले कर्ज चिकाटीने केलेल्या व्यवसायातून आणि आर्थिक नियोजनातून फेडत व्यवसायात टप्प्याटप्प्याने वाढ करणे त्यांना शक्य झाले.

देशी पिल्‍लांच्या उत्पादनाचा सर्वात मोठा उद्योग
देशी कोंबडीला मोठी मागणी आहे. मिळणारा दर आणि
त्यासाठी लागणारा खर्च यांचा विचार केला तर या पक्षांतून पैसे अधिक मिळतात असे कानडे सांगतात. देशी पिल्लांची पैदास करणारा त्यांचा राज्यातील मोठा उद्योग आहे. दक्षिणेकडील व महाराष्ट्रातील कोंबडीचा संकर करून चैतन्य हा कोंबडीचा वाण त्यांनी विकसित केला आहे. ही कोंबडी कधीच तोट्यात विकावी लागली नाही हा वीस वर्षांतील अनुभव असल्याचे कानडे ठासून सांगतात.

हॉटेल विकून व्यवसायात गुंतवणूक
व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर नगर
‘एमआयडीसी’ येथे कानडे यांनी २००९ मध्ये हॉटेल सुरू केले,
मात्र काही दिवसांतच त्याची विक्री करून त्यातून काही जमीन
खरेदी केली. आपल्याकडील रकमेची रांजणगाव (ता. नेवासा) येथील शेतीतही काही गुंतवणूक केली. आता शेतीही बहरत
आहे.

हॅचरीतून विस्तार
सन २००२ च्या दरम्यान नगरच्या ‘एमआयडीसी’ येथे जागा खरेदी केली. महिन्याला सात लाख पिल्लांचे उत्पादन करण्याची क्षमता असलेली यंत्रसामग्री खरेदी केली. जागा, अंडी उबवणी यंत्र, खाद्य तयार करण्याचे यंत्र आदी खरेदीसाठी ३७ लाख रुपयांचे बॅंकेकडून कर्ज घेतले. आत्तापर्यंतच्या नफ्यातून आलेले सात लाख रुपये गुंतवून जवळपास ४४ लाख रुपये उभे केले. त्यानंतर पुन्हा १६ लाख रुपयांचे अंडी उबवणी यंत्र खरेदी केले. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्याने बॅंकेत पत तयार झाली. बॅंकेने पुन्हा कर्ज दिले.

कानडे यांचा पोल्ट्री व्यवसाय

  • नऊ ब्रिडींग फार्मस - त्यात साडेतीन ते चार लाख अंडी उत्पादन - प्रति महिना
  • कोंबडी पालन : ६ हजार
  • व्यावसायिक पोल्ट्रीचे सात शेडस
  • पक्षांची संख्या सुमारे ४० हजार
  • दररोज अंडी उत्पादन सुमारे २० हजार
  • वार्षिक उलाढाल - सुमारे पाच कोटी रु.
  • अंडी व चिकन असा व्यवसायाचा दुहेरी हेतू
  • मुलगा संतोष यांनीही व्यवसायाची जबाबदारी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली उचलली आहे.

संपर्क : अंकुश कानडे : ९४२२२२६०२८
संतोष अंकुश कानडे : ९३७०३१४०६५

फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....
जनावरांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वेजीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य...
तापमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात...उन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत...
जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे,...वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...
जनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना...महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते...
कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी...कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत...