पीक फेरपालट + आंतरपीक पद्धती

सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील योगेश चौगुले या तरुणाने हळद व ऊस या पीकपद्धतीचा अवलंब करीत शेती फायदेशीर केली आहे. पीक फेरपालट व आंतरपीक पद्धती ही त्याच्या शेतीची अन्य वैशिष्ट्ये सांगता येतील. कायम सकारात्मक विचार, कष्ट करण्याची, हार न मानण्याची व पुढे जाण्याची वृत्तीच त्याला शेतीत नव्याने ऊर्जा देण्याचे काम करीत आहे.
हळदीत स्वीटकॉर्नचे आंतरपीक
हळदीत स्वीटकॉर्नचे आंतरपीक

सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील योगेश चौगुले या तरुणाने हळद व ऊस या पीकपद्धतीचा अवलंब करीत शेती फायदेशीर केली आहे. पीक फेरपालट व आंतरपीक पद्धती ही त्याच्या शेतीची अन्य वैशिष्ट्ये सांगता येतील. कायम सकारात्मक विचार, कष्ट करण्याची, हार न मानण्याची व पुढे जाण्याची वृत्तीच त्याला शेतीत नव्याने ऊर्जा देण्याचे काम करीत आहे.

सांगली जिल्ह्यातील आष्टा (ता. वाळवा) येथील चौगुले कुटुंब कित्येक पिढ्यांपासून शेतीत कार्यरत आहे. कुटुंबातील तरुण पिढीचा योगेश आज शेतीचे नेतृत्व करीत आहे. बाळासाहेब चौगुले हे योगेशचे अाजोबा. त्यांना शांतिकुमार, रावसाहेब व रवींद्र ही तीन मुले. एकत्रित कुटुंबाची सोळा एकर जमीन. थोरला मुलगा शांतिकुमार यांना मदतीला घेऊन ते पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. बरीचशी जमीन कोरडवाहू होती. रावसाहेब व रवींद्र साखर कारखान्यात नोकरी करतात.

शेतीतील सुरवातीच्या बाबी }शांतिकुमार यांनी शेती करण्यासह ३० म्हशी कर्जाऊ घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. चाराटंचाई व अन्य कारणांमुळे व्यवसाय तोट्यात आला. हा अनुभव जमेस धरून जोखीम न घेता पारंपरिक पद्धतीनेच शेती करण्यावर भर दिला.

शेतीची सूत्रे तिसऱ्या पिढीकडे शांतिकुमार यांचा मुलगा योगेश याला लहानपणापासून शेतीची आवड आहे. दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत तो वडिलांना मदत करू लागला. पारंपरिकतेचा बाज बाजूला ठेवत नावीन्याचा ध्यास घेऊ लागला. शेतीची व्याख्याने, परिसंवाद यांत सामील होऊ लागला. तेथूनच व्यावहारिक पिकांची शेती त्याला उमजू लागली. त्यादृष्टीने अभ्यास सुरू झाला. त्यातून मग योगेशने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आपली पीकपद्धती तयार केली. ती   अशी.  

शेती- निचऱ्याची व माळरानाची

  • एप्रिल- मे हळदीची लागवड
  • त्यानंतर शेतात फेरपालट पीक ऊस
  • योगेश यांच्या पीकपद्धतीची ठळक वैशिष्ट्ये

  • आडसाली पिकाचा दीर्घ कालावधी टाळला जातो.
  • दोन वर्षांत ऊस व हळद ही दोन नगदी पिके हाती लागतात.
  • आंतरपिकातून खर्च कमी होतो.
  • हळदीचा बेवड चांगला असल्याने उसाला फायदा होतो. पीक फेरपालट होते.  
  • आंतरपीक : हळदीत स्वीटकॉर्न १.५ टन प्रति एकरी

    आंतरपिकाचा फायदा

  • घरच्या जनावरांना ओला चारा
  • स्वीट कॉर्न विक्री- दर- ५ ते ११ रुपयांपर्यंत प्रतिकिलो
  • हळदीचा उत्पादन खर्च कमी केला
  • अनुभव

  • सन २०१५-१६  च्या दरम्यान पहिल्याच अनुभवात दोन एकरांत सेलम हळदीची लागवड   
  • त्यात केवळ ३४ क्विंटल उत्पादन मिळाले.
  • सन २०१६-१७

  • या वेळी पहिल्या वर्षी झालेल्या चुका अभ्यासल्या. व्यवस्थापन सुधारले.
  • उत्पादन - १०० गुंठे- ७६ क्विंटल (वाळवलेले)
  • सन २०१७-१८ - यंदा उत्पादन - ११३ गुंठे- ११७ क्विंटल   एकरी उत्पादन खर्च- सुमारे एक लाख ३५ हजार रु.  

    सांगली मार्केटमध्ये यंदा हळदीला ग्रेडनुसार मिळालेले दर (प्रतिक्विंटल)  

    ग्रेड १ : २८.५ क्विं.    १३,७०० रु.
    ग्रेड २ : ५७ क्विं.         ७५०० रु.
    ग्रेड ३ : १५.६० क्विं.     ६४०० रु.
    ग्रेड ४ : १५ क्विं.     ६१०० रु.
    सोरा गड्डा :   १.३४ क्विं.       २०,५०० रु.

         बहुतांश शेतकरी हळद निघाल्यानंतर जमिनीची मशागत करून खरिपात ऊस व अन्य पिकांसाठी तिचा वापर करतात. यात चार महिने जमीन मोकळी राहते. योगेश मात्र हळदीनंतर लगेच ऊस लागवड  करतात. यात आंतरपिकाचा मोह ते टाळतात. उसाचे एकरी ५५ ते ६० टन उत्पादन मिळते.

    व्हायचे होते कृषी पदवीधर कृषी पदवीधर व्हायचे असेच स्वप्न बाळगलेल्या योगेश यांनी बारावीनंतर अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रयत्न केले. खासगी कृषी महाविद्यालयात मोठ्या ‘डोनेशन’ची मागणी केली. ते परवडणारे नव्हते. तो नाद सोडला व कला शाखेतून पदवीधर झाले. आज त्यांचे वय केवळ २१ वर्षे आहे. मात्र शेतीतील जाण, अभ्यास वाखाणण्यासारखा आहे.

    शेतीतील महत्त्वाच्या बाबी

  • रासायनिक- सेंद्रिय अशी एकात्मिक पीकपद्धती
  • बेसल डोसवर अधिक भर
  • कंद वरंब्याच्या पोटात लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न, त्यामुळे हळदीची वाढ  चांगली होते.
  • हळद वाळवताना जमिनीवर न पसरता शेडनेटचा वापर, पर्यायाने मजूर कमी लागतात.
  • प्रतिक्रिया : मागे काय झाले हा विचार सोडून देऊन पुढे काय करायचे, हाती काय आहे याचा विचार करतो. हार झाली तरी थांबायचे नाही. खूप पल्ला गाठायचा आहे. मन लावून केलं तर शेतीत सकारात्मक खूप काही आहे. योगेश चौगुले, ८३७८८९७६७६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com