अनेक वर्षांपासून जोपासलेला दर्जेदार केशर आंबा

केशर आंबा शेतीत काही वर्षांचा अनुभव तयार केलेले बाळासाहेब चव्हाण.
केशर आंबा शेतीत काही वर्षांचा अनुभव तयार केलेले बाळासाहेब चव्हाण.

दांडगा अनुभव तयार करीत त्यात कौशल्य व नाव संपादन केले आहे. सेंद्रिय पद्धतीवर भर देत आंब्याचे उत्पादन घेतल्यास चार पैसे अधिक मिळतात, असा त्यांना विश्वास आहे. रोपवाटिका हेदेखील त्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. व्यवसाय म्हणून त्याकडे पाहताना सामाजिक बांधिलकीतूनही रोपे भेट म्हणून देण्यातील त्यांचे दातृत्व प्रशंसनीय आहे. सातारा जिल्ह्यातील अतित येथील बाळासाहेब माधवराव चव्हाण यांनी केशर आंबा शेतीत सातारा जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. दुष्काळी तालुक्यात डाळिंब, द्राक्ष तर पश्चिम भागात आंबा, केळी लागवड वाढत आहे. सातारा जिल्ह्यातील अतित गावालगत उरमोडी नदी वाहते. साहजिकच येथील बहुतांशी शेती बागायत आहे. ऊस हे गावातील प्रमुख पीक आहे.

चव्हाण यांची प्रयोगशील शेती गावातील बाळासाहेब माधव चव्हाण यांनी प्रगतिशील शेतकरी म्हणून नाव मिळवले आहे. (कै.) माधवराव चव्हाण यांचे तीन मुलांचे कुटुंब असून मोठा प्रकाश व लहान मारुती हे नोकरी करतात.  बाळासाहेब यांच्यावर शेतीची जबाबदारी आहे. बाळासाहेबांनी पदवी घेतल्यानंतर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेती करण्यास सुरवात केली. कुटुंबाची सुमारे आठ एकर अाहे. बहुतांशी शेती डोंगरालगत असल्याने पाण्याचा अभाव होता. विहिरी घेत काही शेती बागायत केली. सन १९९३ मध्ये पुनर्वसित झालेल्या जांभगावच्या नजीकच्या क्षेत्रात एक हेक्टरवर कृषी विभागाच्या योजनेतून आंबा लागवड करण्याचे नियोजन केले. मुरमाड क्षेत्रात खड्डे खोदणे अवघड जात असूनही प्रयत्न यशस्वी केले. त्यात केशर आंब्याची लागवड केली.

मेहनतीने जोपासला केशर आंबा त्या काळात आंब्याकडे उत्पादन देणारे फळपीक म्हणून कोणी फारसे पाहात नव्हते. तरीही चव्हाण यांनी धाडस केले. बागेत दोन झाडांतील अंतर अधिक असल्याने आंतरपीक म्हणून भूईमूग, गहू, शाळू, आले आदी हंगामी पिके ते घेऊ लागले. उन्हाळ्यात झाडे जगवण्यासाठी प्रसंगी डोक्यावरून पाणी आणले. साधारणपणे तीन वर्षांनी उत्पादनास सुरवात झाली. शेणखताचा व सेंद्रिय पद्धतीचा अधिक वापर असल्याने आंब्याचा आकार आणि स्वाद चांगला मिळत होता. त्यातून थेट विक्री करण्यावर भर दिला. यातून चांगली शिल्लक राहू लागल्याने उत्साह वाढत गेला. प्रत्येक वर्षी झाडाच्या वयानुसार उत्पादनात वाढ होऊ लागली. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महावीर जंगटे, विकास पाटील तसेच अन्य अधिकाऱ्यांनी बागेस वेळोवेळी भेट देत प्रयोगाची प्रसंशा केली.  

केशर आंबा शेती दृष्टिक्षेपात 

  • अडीच एकर जुनी बाग-(१९९३) त्यात प्रति गुंठा एक झाड यानुसार एकरी ४० झाडे.
  • सोळा गुंठे बाग (२०११)-गुंठ्याला सुमारे १० झाडे- सघन पद्धतीने लागवड
  • जुन्या बागेतून प्रति झाड ५०० पर्यंत तर नव्या बागेतून ५० ते १०० पर्यंत फळांचे उत्पादन.
  • आंब्याचे नफा देणारे अर्थकारण
  • चव्हाण सांगतात की, हेक्टरी एक हजार झाडे बसली व प्रत्येक झाड ५० फळांचे उत्पादन देऊ लागली तरी ५० हजार फळे मिळतात. प्रत्येक फळाचा दर १० रुपये मिळाला तरी पाच लाख रुपये हे पीक देऊ शकते. हाच आंबा थेट विकला व प्रति आंब्याचा दर २० रुपये धरला तर हेच उत्पन्न त्या पटीत वाढते. उसासारख्या नगदी पिकापेक्षा हे अर्थकारण निश्चित फायदेशीर होऊ शकते, असे चव्हाण सांगतात.

    रोपवाटिका व्यवसाय चव्हाण यांनी आंबा रोपवाटिकाही विकसित केली आहे. यात २५ गुंठे शेडनेट तर साडेसतरा गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउस उभारणी केली आहे. यात केशर, तोतापुरी, हापूस, पायरी, दूधपेढा, आम्रपाली आदी वाणांच्या रोपांची विक्री केली जाते.

    रोपांचा पुरवठा व्यवसाय म्हणून रोपांची विक्री करताना सामाजिक बांधिलकी म्हणून मातोश्री वृद्धाश्रम तसेच सातारा भागातील काही संस्थांना रोपे भेट देण्यातही चव्हाण पुढाकार घेतात. शाळेत पहिला व दुसरा क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना ते रोपांच्या रूपाने बक्षीस देतात. काही कार्यक्रमांमधूनही रोपे देण्यात त्यांना समाधान   मिळते.   अन्य पिकांची उत्तम शेती सध्या साडेचार एकरांवर ऊस असून एकरी सरासरी ६० टन उत्पादन मिळते. आले, भुईमूग, गहू, हरभरा आदी पिकेही केली जातात. बांधावर नारळाची ३८ तसेच चिकू, लिंबू, पेरू, आवळा देखील आहे. सन २००३ मध्ये गांडूळ खत युनिट उभारले आहे.  

    मार्गदर्शन, मदत बाळासाहेब यांच्या वडिलांनी आंबा बागेसाठी विशेष परिश्रम व मार्गदर्शन केले आहे. दोन्ही बंधू देखील पाठीशी ठामपणे उभे असतात. कृषी विभागातील अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळते.  

    व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

  • जून महिन्यात आंब्याच्या प्रत्येक झाडास आळे करून त्यामध्ये शेणखत किंवा गांडूळखत वापरले जाते.
  • सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर. गरजेनुसार रसायनांचा वापर
  •  झाडे अनेक वर्षे टिकत असल्याने दरवर्षी व्यवस्थित व्यवस्थापन ठेवल्यास खर्चावर नियंत्रण शक्य.
  • अलीकडील काळात व्यापाऱ्यांना बाग दिली जाते. यात प्रति फळ १० रुपये दर ठेवला जातो.
  • संपर्क : बाळासाहेब चव्हाण, ९८५०५१४६५१.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com