agricultural success story in marathi, belora dist.amravati , Agrowon, Maharashtra | Agrowon

अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हजार पक्ष्यांचे पोल्ट्री मॉडेल
विनोद इंगोले
सोमवार, 18 जून 2018

केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही, तर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड देण्याची जिगरबाज मनोवृत्ती असावी लागते. ती दाखवत बेलोरा (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथील डॉ. शरद भारसाकळे यांनी सुरवातीला पोल्ट्री खाद्य व्यवसाय, नंतर हॅचरीज व करार पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला. यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खास हजार पक्ष्यांचे पोल्ट्री मॉडेल ते रुजवू पाहत आहेत. लहान शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हे मॉडेल उपयुक्त ठरू शकते.

केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही, तर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड देण्याची जिगरबाज मनोवृत्ती असावी लागते. ती दाखवत बेलोरा (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथील डॉ. शरद भारसाकळे यांनी सुरवातीला पोल्ट्री खाद्य व्यवसाय, नंतर हॅचरीज व करार पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला. यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खास हजार पक्ष्यांचे पोल्ट्री मॉडेल ते रुजवू पाहत आहेत. लहान शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हे मॉडेल उपयुक्त ठरू शकते.

बेलोरा (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथील शरद नारायणराव भारसाकळे यांनी नागपूर येथून पशुवैद्यकीय पदवी १९९० मध्ये, तर पदव्युत्तर पदवी २००६ मध्ये घेतली. या काळात विदर्भात पोल्ट्री व्यवसायाला मोठा वाव असल्याचे लक्षात आले. मात्र शेतकरी कुटुंबातून आल्याने व्यावसायिक अनुभव पाठीशी नव्हता. तो मिळविण्यासाठी त्यांनी खोपोली येथील एका खासगी पोल्ट्री व्यवसायिकाकडे अवघ्या १५०० रुपयांवर दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर अन्य दोन कंपन्यामध्ये १९९७ पर्यंत नोकऱ्या केल्या. यातून अनुभवाची शिदोरी गोळा करत पशुखाद्य निर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

पोल्ट्री फिडच्या व्यवसाय

  • व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्याने राष्ट्रीयीकृत बॅंकातून कर्जाची उपलब्धता होत नव्हती. मग धाडस करून एका सहकारी बॅंकेकडून सुमारे १८ टक्के व्याजाने १५ लाखाची तजवीज केली. प्रकल्प उभारणीमध्ये आवश्यकता भासल्याने अन्य खासगी स्रोतातून पैसे मिळवावे लागले. एकूण धडपडीनंतर १९९८ मध्ये २० टन प्रति माह पशुखाद्यनिर्मिती क्षमतेचा प्रकल्प उभारला.
  • त्या वेळी विदर्भात पोल्ट्रीची संख्या अत्यल्प होती. पशुखाद्याकरिता ग्राहक शोधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. एकेक ग्राहक जोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. आज त्यांचे ग्राहक विदर्भासह छत्तीसगढ व मध्य प्रदेशापर्यंत पसरलेले आहेत.  
  • व्याजापोटी जाणारी मोठी रक्कम एकूण आर्थिक व्यवहारामध्ये अडचणीची ठरत होती. आता बाजारात पत निर्माण झाली होती. त्यामुळे २००२ मध्ये संपूर्ण कर्ज राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये वर्ग केले. व्याजाचा दर चार टक्क्यांनी कमी असल्याने मोठी रक्कम वाचली.
  • एका बाजूने मागणी वाढत असल्याने व्यवसाय प्रति वर्ष वाढत गेला. त्या प्रमाणे पशुखाद्य निर्मितीची क्षमता वाढवत गेले. २००९ मध्ये १५०० टन प्रति माह इथपर्यंत वाढविण्यात यश आले.

व्यवसायामध्ये वाढीसह अल्पभूधारकांसाठी खास मॉडेल

  • २००५ पर्यंत विदर्भामध्ये पोल्ट्री ही प्रामुख्याने मुक्त स्वरूपातील होती. यातून पशुखाद्याला चांगली मागणी होती. मात्र त्यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांनी करार पोल्ट्री सुरू करत स्वतःच पशुखाद्य व अन्य सुविधा पुरवण्यास सुरवात केली. परिणामी, ग्राहकांचे प्रमाण एकदम कमी झाले. ही शरद यांच्यासाठी धोक्याची घंटाच होती. ती वेळीच ओळखत २०१३ मध्ये शरद यांनी स्वतःच करार पोल्ट्री सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २.५ लाख प्रति माह क्षमतेची हॅचरी उभारली. या सर्व उद्योगातून सुमारे १६५ लोकांना रोजगार मिळाला आहे.
  • बहुतांश कंपन्या मोठ्या व आर्थिक सक्षम अशा शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करतात. मात्र डॉ. शरद भारसाकळे यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती महत्त्व दिले. त्यांनी एक हजार, अडीच हजार, पाच हजार पक्षी असे खास मॉडेल बनवले. त्यातून शेतकऱ्यांच्या घरात १५ ते ३० हजार रुपये प्रति माह कसे जातील, या अनुषंगाने रचना केली आहे. सध्या एक हजार पक्ष्यांचे संगोपन करणारे १५ शेतकरी आहेत. दरातील तेजीचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळतो.   

कार्यक्षम शेतकऱ्यांना मिळतो बोनस  
पशुखाद्य वाचविल्यास २० टक्‍के बोनस :

  • पक्ष्याचे दीड महिन्यात २ किलोपेक्षा अधिक वजन मिळण्यासाठी सामान्यतः ३.५ किलो खाद्य लागते. या निर्धारित पशुखाद्यामध्ये बचत करत वजन मिळविल्यास, शेतकऱ्यांना वाचविलेल्या पशुखाद्याला प्रति किलो २० रुपये बोनस दिला जात असल्याचे  डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले.
  • मरतूक रोखल्यास मिळतो इन्सेटिव्ह : सामान्यतः पाच टक्क्यांपर्यंत मरतूक माफ असते. मात्र मरतूक त्यापेक्षा कमी ठेवल्यास शेतकऱ्यांना ३५ रुपये प्रति नग असा बोनस दिला जातो.  

व्यवहारामध्ये पारदर्शकता  
शेतकऱ्याला पक्षी दिल्याच्या तारखेपासून सर्व बाबींची नोंद घेणारे संगणकीकृत रेकॉर्ड ठेवतात. त्यामध्ये बॅच क्रमांक, पक्षीपुरवठा, मरतूक, पक्षी विक्री, वजन, पशुखाद्य किती लागले, प्रति पक्षी लागलेले पशुखाद्य, सरासरी पक्ष्याचे वजन अशी सर्व माहिती नोंदविलेली असते. दीड महिन्याचा बॅच कालावधी संपल्यानंतर हिशेबावेळी शेतकऱ्याला संपूर्ण ताळेबंद दिला जातो. त्यात खर्चासह बोनस व कपात झाल्याच्या सर्व नोंदी असतात. अशा प्रकारे पारदर्शी प्रक्रिया व्यवहारात राबविली जाते.  

शेतकरी सांगतात....
माझ्याकडे तीन एकर शेती असून, संत्रा फळबागेसर कपाशी पीक असते. दोन लाख रुपये खर्चून उभारलेल्या शेडला अचलपूर पंचायत समितीकडून १ लाख १२ हजार रुपयांचे अनुदानही मिळाले. २०१७ मध्ये डॉ. भारसाकळे यांच्याशी संपर्क साधून एक हजार पक्ष्यांचे करारव्यवस्थापनास सुरवात केली. १३ ते १९ हजार रुपयांपर्यंत रक्कम यातून मिळते. दर दीड ते दोन महिन्यांत ठराविक रक्कम मिळत असल्याने छोट्या शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग एटीएम सारखा ठरतो.  
चंदर येवले, ९०११५७८३९२
(परसापूर, ता. अचलपूर, जि. अमरावती)

तिघा भावंडाची मिळून तीन एकर शेती आहे. २५ वर्षांपूर्वी अतिरिक्‍त उत्पन्नासाठी एक हजार पक्ष्यांची पोल्ट्री सुरू केली. मात्र बर्ड फ्लूच्या काळात दरातील घसरणीमुळे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा व्यवसाय बंद करावा लागला. डॉ. भारसाकळे यांचे एक हजार पक्ष्यांचे मॉडेल समजले. त्यानुसार एक हजार पक्ष्यांचे व्यवस्थापन सुरू केले. गेल्या वेळी ३१८० किलो वजन मिळाले, त्यातून ३१ हजार २५० रुपये मिळाले. ३८ दिवसांत २ किलोपेक्षा अधिक वजन मिळाले. वातावरणानुरूप वजन वाढण्याचा कालावधी कमी जास्त होतो. सामान्यतः १० ते १५ हजार रुपये यातून हमखास मिळत असल्याने एकत्रित कुटुंबाला हातभार लागतो.
सलिम शेख, ९७३०२३६६७८
(पोल्ट्री व्यावसायिक, तळेगाव, जि. अमरावती)

संपर्क : डॉ. शरद भारसाकळे, ९३७०१५४५५४

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कौशल्य विकास कार्यक्रमातून मिळतोय एकीचा...राज्यात गेल्या दीड दशकामध्ये गटशेतीचे मूळ...
कौशल्य विकासातून गटशेतीसाठी शेतकरी...मुंबई ः शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर...
पोषणमूल्यावर आधारित कृषी प्रकल्पास...पुणे : राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने...
हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने...सोलापूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी...
खानदेशात कापूस लागवड वाढण्याचा अंदाजजळगाव : खानदेशात आगामी खरिपात कापूस लागवड किंचित...
अाॅनलाइन नोंदणी न झाल्यास शेतकरीच...अकोला ः शासनाच्या आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी...
संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावापुणे ः राज्य सरकारने संपूर्ण शेतीमाल...
कोरडवाहू फळ संशोधन कार्याला गती...परभणी: पोषण मूल्यांच्या सुरक्षिततेसाठी...
राज्यातील सत्तावीस कृषी महाविद्यालयांचे...पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेची आदर्श...
दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांसाठी दोन...मुंबई : राज्यातील खरीप हंगाम २०१८ मध्ये...
विदर्भात उद्यापर्यंत पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन...रासायनिक कीडनाशकांना किटक प्रतिकारक होत असून,...
परागकणांचा मागोवा घेण्याची कार्यक्षम...दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील...
खानदेशात पाणीटंचाईच्या प्रस्तावात वाढजळगाव : खानदेशात पाणीटंचाईचे प्रस्ताव वाढत आहेत....
कडाक्याच्या थंडीने गव्हाच्या विविध...सातारा ः येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरलापुणे: राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कणेरी मठावर देशातील पहिले डिव्हाइन...कोल्हापूर : हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची...
आंध्र प्रदेशातील एका कंपनीचा परवाना `...नागपूर ः आंध्र प्रदेशातील एका बियाणे कंपनीच्या...
आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी...मुंबई : खरीप हंगाम २०१८ मध्ये राज्यातील ५०...
मराठवाड्यात आज पावसाचा अंदाजपुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात...