agricultural success story in marathi, belwadi dist. jalna , Agrowon, Maharashtra | Agrowon

शेळीपालनाने कमी केले शेतीवरचे अवलंबित्व
संतोष मुंढे
रविवार, 25 मार्च 2018

शेतीला पूरक उद्योगाची जोड म्हणून संतोष बिल्हारे यांनी २०१६ मध्ये शेळीपालनाला सुरवात केली. अर्धबंदिस्त शेळीपालनातून त्यांना वर्षाला किमान ८० हजारांचा आर्थिक हातभार लागतो. चार शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता वीस शेळ्यांवर पोहचला आहे. पुढे शेळ्यांची संख्या किमान ५० पर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे.  

शेतीला पूरक उद्योगाची जोड म्हणून संतोष बिल्हारे यांनी २०१६ मध्ये शेळीपालनाला सुरवात केली. अर्धबंदिस्त शेळीपालनातून त्यांना वर्षाला किमान ८० हजारांचा आर्थिक हातभार लागतो. चार शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता वीस शेळ्यांवर पोहचला आहे. पुढे शेळ्यांची संख्या किमान ५० पर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे.  

असे वळले शेळीपालनाकडे
बिल्हारे यांची चार एकर कोरडवाहू शेती अाहे. शेतीतून कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अवघड जात होते. या आर्थिक विवंचनेतून कमी गुंतवणुकीत केला जाणारा शेळीपालन व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. नोव्हेंबर २०१६ मध्ये १९ हजारांमध्ये ४ उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. त्यांच्याकडे अाज २० शेळ्या अाहेत. त्यामध्ये करडं विकून घेतलेल्या सहा व घरच्याच शेळ्यांपासून मिळालेल्या दहा शेळ्यांचा समावेश आहे.

व्यवस्थापन

  • सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत शेळ्या बंदिस्त असतात. दुपारी दोन नंतर आसपासच्या परिसरात सर्व शेळ्या ते स्वत: चारण्यासाठी घेऊन जातात.
  • सायंकाळी शेळ्यांना ओला अाणि सुका चारा दिला जातो. अोल्या चाऱ्यासाठी अर्धा एकर क्षेत्रावर शेवरी, तूती अाणि दीनानाथ गवताची लागवड केली आहे. सोयाबीन, तूर, हरभरा अाणि ज्वारीचा कडबा सुका चारा म्हणून दिला जातो.  
  •  तुतीची पाने जाड अाणि मोठी असतात शिवाय शेळ्या ती अावडीने खातात. तुतीचा पाला शेळ्यांना हवा तेव्हा उपलब्ध होण्यासाठी गोठ्यामध्ये बांधून ठेवला जातो.  
  •  सकाळी शेळ्यांना सोयाबीन, गहू अाणि मक्याचा भरडा दिला जातो.
  • उस्मानाबादी शेळ्या काटक असल्यामुळे त्या प्रतिकूल हवामानातही तग धरून राहतात असा बिल्हारे यांचा अनुभव अाहे. खबरदारी म्हणून सर्दी, हगवण, ताप, जखमा इ. अाजारांवर पशुवैद्यकानी दिलेली अाैषधे गोठ्यामध्ये असतात.
  • तीन महिन्यांतून एकदा शेळ्यांना जंतनाशक देण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे शेळ्यांचे अारोग्य चांगले राहते.  
  • वीस शेळ्यांपासून त्यांना वर्षाकाठी तीन ट्रॉली लेंडी खत मिळते. त्यामुळे खतावरील खर्चात बचत झाली अाहे.
  • आजपर्यंत त्यांनी १६ ते १७ करडांची विक्री अाहे. साधारणपणे प्रति करडू साडेचार ते पाच हजार रु. दर मिळाला.

संपर्क : संतोष बिल्हारे, ८३२९६०१६२५

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...