agricultural success story in marathi, bori, jintur, parbhani | Agrowon

मालाच्या मूल्यवर्धनातून नफा हेच ठेवले ध्येय
माणिक रासवे
बुधवार, 3 जानेवारी 2018

पाचशे शेतकरी कंपनीचे सभासद
आचार्य भास्करभट्ट अॅग्रो प्रोड्यूसर शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर वाटप सुरू आहे. बोरीसह कौसडी, वाघी बोबडे, करवली, चांदज, रिडज, कोक आदी गावांतील ५०० शेतकरी कंपनीचे सभासद आहेत.

परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) येथील सात गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत आचार्य भास्करभट्ट अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली आहे. सोयाबीन, हरभरा बीजोत्पादन, पॅकिंगमधून बियाणे विक्री, क्लीनिंग-ग्रेडिंग, डाळनिर्मिती आदी विविध उपक्रमांद्वारे मालाचे मूल्यवर्धन करण्यास कंपनीने सुरवात केली आहे. त्यातून कंपनीचा नफा वाढण्यास मदत होत आहे. समूहशक्तीच्या माध्यमातून बोरी परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न त्यातून होत आहेत.
 
परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) हे महत्त्वाचे बाजारपेठेच ठिकाण आहे. गावपरिसरात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. सोयाबीन, तूर, मूग, कापूस, हरभरा, गहू आदी पिकांवर येथील शेतकऱ्यांचा भर असतो. आधुनिक शेती तंत्रज्ञान वापराच्या मानसिकतेतून बोरी गावातील काही शेतकरी एकत्र आले. त्यांनी आपल्या गावासोबत परिसरातील कौसडी, वाघी बोबडे, करवली, चांदज या पाच गावांतील सुमारे १३ शेतकरी गटांनाही सोबत घेतले. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा इरादा त्यांना सांगितला. त्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २०१४ मध्ये बोरी येथे आचार्य भास्करभट्ट अॅग्रो प्रोड्यूसर ही शेतकरी उत्पादक कंपनी अस्तित्वात आली.

कंपनीचे सदस्य

 • महानुभाव पंथातील महान कवी भास्करभट्ट हे बोरी येथील होते. त्यामुळे त्यांचेच नाव कंपनीला देण्यात आले.
 • बोरीतील प्रगतिशील शेतकरी मधुकर थोरात - कंपनीचे अध्यक्ष
 • शिवलिंग भिसे - उपाध्यक्ष.
 • संचालक मंडळ - संतोष साखरे, अमृत चौधरी, बुवाजी जीवने, पंडितराव घोलप, किशनराव गोरे, तुकाराम मानवते, सुभाष घोलप, गणेश बुलबुले, विष्णू लोखंडे, शिवाजी बारबुंड, रामभाऊ अंभोरे

कंपनीची वैशिष्ट्ये व उपक्रम

 • प्रत्येक शेतकरी गटाला संचालक मंडळामध्ये प्रतिनिधित्व
 • बोरी येथील जिंतूर रस्त्यावरील दहा गुंठे जमीन करार पद्धतीने भाडेतत्त्वावर घेऊन कंपनी शेडची उभारणी
 • धान्य स्वच्छता, प्रतवारी करून विक्री केल्यास मूल्यवर्धन होते. नफा वाढतो. त्याअनुषंगाने कंपनीने
 • यंत्रसामग्री उभारली. प्रतितास २० क्विंटल धान्य स्वच्छ करणारी यंत्राची क्षमता आहे.
 • गेल्या दोन वर्षांत ज्वारी, गहू, हरभरा, सोयाबीन आदी सात हजार क्विंटल मालावर स्वच्छता व प्रतवारी. यासाठी प्रतिक्विंटल १०० रुपये दराने शुल्क घेतले. परिसरातील गावांतील शेतकरी तसेच हिंगोली जिल्ह्यातील काही व्यापारीही या ठिकाणाहून मालाचे क्लीनिंग, ग्रेडिंग करून नेतात. त्यातून उत्पन्नाचा स्रोत मिळाला.
 • शेतकऱ्यांना रास्त दरात बियाणे, खते, कीडनाशके आदी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने बोरी येथील बस थांब्यावर कंपनीने दिवाळी पाडव्याच्या मूहर्तावर मागील वर्षी कृषी सेवा केंद्र सुरू केले आहे.
 • कंपनीला थेट विक्री परवाना मिळाला आहे. लातूर येथील तेल उत्पादक कंपन्यांना कच्च्या मालाची थेट विक्री करता येणार आहे. येत्या काळात कंपनीची अडत सुरू करण्याचा मानस.
 • कंपनीचे शेअर वाटप सुरू. बोरीसह कौसडी, वाघी बोबडे, करवली, चांदज, रिडज, कोक आदी गावांतील ५०० शेतकरी कंपनीचे सभासद
 • सुधारित लागवड पद्धती, खते, कीड-रोग व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान आदी विषयांवर कंपनीतर्फे प्रशिक्षणे आयोजित केली जातात. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन

सोयाबीन, हरभरा बीजोत्पादन
सोयाबीन आणि हरभरा या महत्त्वाच्या पिकांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी कंपनीतर्फे सभासद शेतकऱ्यांमार्फत विविध वाणांचे बीजोत्पादन घेण्यात येत आहे.

असे केले बीजोत्पादन 
 सोयाबीन -
२०१५-  ९० एकरांवर ७०० क्विंटल
२०१६ - १२० एकरांवर - ९०० क्विंटल
२०१७ - ६० एकरांवर- ७०० क्विंटल.

हरभरा
२०१५ - २० हेक्टरवर ४०० क्विंटल.
२०१६ ४२ हेक्टरवर ८०० क्विंटल.
२०१७ मध्ये ३१.६० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम. कंपनीचे क्लीनिंग, ग्रेडिंग युनिट आहे. बियाणे स्वच्छता, प्रतवारीनंतर ३० किलो वजनाच्या पिशव्यांमध्ये भरून बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. यंदा सात हजार रुपये प्रतिक्विंटल दराने बियाण्यांची विक्री झाली.

अन्य वैशिष्ट्ये

लागवड तंत्रज्ञानात बदल
पेरणीसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) या सुधारित तंत्राचा अवलंब कंपनीच्या शेतकरी सदस्यांकडून होत आहे. बीबीएफ तंत्राच्या वापरामुळे जमिनीची धूप कमी होते. अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा होतो. पावसाच्या खंड काळात पीक तग धरून राहते, असे या शेतकऱ्यांना आढळले.

हमीभावाने तूर खरेदी
गेल्या वर्षी तुरीचे भरघोस उत्पादन आले. दर कोसळल्यामुळे हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती. परंतु बोरी परिसरातील शेतकऱ्यांना जवळचे खरेदी केंद्र नव्हते. या परिस्थितीत आधारभूत किंमत दराने तूर खरेदी करण्यासाठी कंपनीला परवानगी मिळाली. त्यामुळे परिसरातील गावातील शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विक्री करण्यासाठी जवळचे केंद्र उपलब्ध झाले. गेल्या वर्षीच्या हंगामात ८१ शेतकऱ्यांच्या एक हजार ७५० क्विंटल तुरीची खरेदी कंपनीतर्फे करण्यात आली.

डाळमिलची उभारणी
कंपनीच्या वाढीव व्यवसाय आराखड्यानुसार डाळमिलची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. क्लीनिंग, ग्रेडिंग युनिटच्या शेजारी डाळमिल बसविण्यात येणार आहे. तूर, हरभरा यांसह मूग, उडीद आदी धान्यांची नेहमीच्या पद्धतीने विक्री करण्यापेक्षा डाळनिर्मिती करून विक्री केल्यामुळे मालाचे मूल्यवर्धन होऊन सभासद शेतकऱ्यांचा नफा वाढणार आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी कंपनीला भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक एम. एल. चपळे, उपसंचालक संतोष नादरे, श्री. सराफ, एमएसीपीचे पणनतज्ज्ञ शैलेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन कंपनीला मिळते.

संपर्क- मधुकर थोरात - ९१६८९०९०८६, 
(शेतकरी कंपनी अध्यक्ष)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...