एकशेतीस जनावरे, विस्तारलेला दुग्धव्यवसाय

सन २००६ मध्ये दोन गायींपासून सुरू केलेला दुग्धव्यवसाय चितलवाडी (जि. अकोला) येथील संजय अात्माराम इंगळे यांनी शंभर जनावरांपर्यंत पोचवून नावारूपाला आणला आहे.
संजय इंगळे यांच्या गोठ्यातील मुऱ्हा म्हशी
संजय इंगळे यांच्या गोठ्यातील मुऱ्हा म्हशी

सन २००६ मध्ये दोन गायींपासून सुरू केलेला दुग्धव्यवसाय चितलवाडी (जि. अकोला) येथील संजय अात्माराम इंगळे यांनी शंभर जनावरांपर्यंत पोचवून नावारूपाला आणला आहे. उद्योगात उतरल्यानंतर तो यशस्वी करण्यासाठी चिकाटी, प्रचंड मेहनत, अडचणींवर मात करण्याचे कौशल्य आदी गुण त्यांनी जोपासले. स्वतःची तीन विक्री केंद्रे व पूरक उत्पादननिर्मिती यांतून व्यवसायाचा विस्तारही साधला आहे.

  • इंगळे कुटुंबातील चार बंधूंची शेती - एकूण ८० एकर.
  • ठिकाण - चितलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला
  • सातपुड्याच्या पायथ्याशी. कसदार, बागायती व भरघोस उत्पादन देणारी.
  • मुख्य पिके - केळी (मुख्य), कापूस,
  • पाण्याची शाश्वतता कमी झाली आहे.
  • प्रगतिशील शेतीसाठी अोळख

  • इंगळे कुटुंब प्रगतिशील शेतीसाठी पंचक्रोशीत अोळखले जाते. या भागात ७० एकरांत एकाचवेळी ठिबक सिंचन करून पाणी व्यवस्थापनाचा आदर्श तयार करून विदर्भात अोळख मिळविली होती.
  • जबाबदाऱ्या - शिवचरण, विजयराव, रामलाल - शेती
  •  दुग्धव्यवसाय - संजय
  • प्रगतीचे काही टप्पे

  • सुरवातीच्या काळात मिळणारे गायींचे ९० ते १०० लिटर दूध अकोट येथे विकायचे. नंतरच्या काळात गावात सहकारी संस्थेची उभारणी केली. त्यामार्फत स्वतःकडील व गावातील शेतकऱ्यांचे दूध जिल्हा दूध संघाला दिले जायचे. तेव्हा लिटरला अवघा सहा रुपये दर मिळायचा. दरम्यान जनावरांची संख्याही वाढली. दरही अत्यंत कमी मिळायचे. त्यातून स्वतःचेच थेट विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
  • ग्राहकांचा कल गायीच्या दुधाकडे कमी असल्याने दोन- तीन महिने तेथे कमीच प्रतिसाद मिळाला. हा काळ मोठ्या अडचणीचा होता. म्हशीच्या दुधाला ग्राहकांची अधिक पसंती असल्याचे निदर्शनास अाले. मग काही गायी विकल्या. नोव्हेंबर २००९ मध्ये म्हशी घेतल्या. 
  • काही चढ-उतारही पाहिले.  
  • ठळक बाबी

  • गोठ्यातील पैदास : १०० जनावरांपैकी म्हशी- १७, गायी- २२
  • सकाळ-संध्याकाळ ताजे, सकस, दर्जेदार दूध उपलब्ध करण्याबाबत ग्राहकांना विश्वास दिला.
  • एकूण रोजगारनिर्मिती : चितलवाडीसारख्या छोट्या गावात दुग्ध व्यवसाय सुरू केल्यामुळे वर्षभर १२ जणांना रोजगार उपलब्ध. २५ जनावरांमागे तीन मजूर काम करतात. कुणी चारा-पाणी व्यवस्थापन, कुणी स्वच्छता, तर कुणी दूध काढणी करतो.   
  • शेती तसेच दुग्धव्यवसायातील उत्पन्न व जिल्हा बॅंकेकडील १४ लाख रुपयांचे कर्ज काढून भांडवल उभारले.
  • संजय यांचा प्रयत्नवादी व्यवसाय जनावरांचा विस्तार (गायी, म्हशींसहित) सन २००६ - २ गायी----पुढे - ८------पुढे - २४---३५- आज-----१३० (लहान-मोठी धरून)

    म्हशी - ७० मुऱ्हा गायी - ३० एचएफ इतर - ३० रोजचे दूध संकलन - घरचे ३५० ते ४०० लिटर बाहेरचे - २५० लिटर - परिसरातील गावांतील २० ते २५ शेतकऱ्यांकडून

    स्वतःची विक्री केंद्रे

    चितलवाडी - २० किमी. तेल्हारा- २- येथे सहा जणांना रोजगार सहा किमी- हिवरखेड-१- एक ते दोघांना रोजगार

    एकूण विक्री-

  • दूध - ४०० लिटर
  • उत्पादने - (दररोजची अंदाजे विक्री)
  • दही - ५० ते ६० किलो, तूप - २ ते ३ किलो.सणासुदीला मोठी मागणी - ग्राहक प्रतीक्षेत)
  • ताक - ७० ते १०० लिटर, पनीर - १२ ते १५ किलो (महिन्याला)
  • खवा, श्रीखंड यांचे मागणीनुसार उत्पादन. हिवाळ्यात तुपाला सर्वाधिक मागणी राहते.
  • पदार्थ निर्मितीसाठी यंत्रसामग्री घेतली अाहे.
  • उलाढाल : महिना- सुमारे चार लाख रुपये.

    गोठा :

  • अर्धबंदिस्त
  • ६० बाय ४० फूट - प्रत्येकी २५ जनावरांची क्षमता
  • लहान-मोठ्या जनावरांप्रमाणे विभागणी
  • बायोगॅसचा टॅंक, चार भावांचे कुटुंब. ही गरज अोळखून पुरेशा बायोगॅसची निर्मिती.
  • व्यवसायाचा विस्तार :

  • प्रक्रियायुक्त पदार्थांचे उत्पादन अधिक शेळीपालन
  • येत्या काळात पोल्ट्री सुरू करणार
  • शेळीपालनात टाकले पाऊल :

    मे २०१७ मध्ये १७५ शेळ्या विकत अाणल्या. सिरोही, काठेवाडी धनगर, तोतापरी, जमनापरी जातींची विविधता. कोटा जातीचे बोकड. सुरवातीला अर्धबंदिस्त पद्धतीने सुरवात. नवी पिढी पूर्णतः बंदिस्त पद्धतीने वाढवली अाहे. या व्यवसायात उतरण्यापूर्वी संजय यांनी पश्चिम महाराष्ट्रात काही शेतकऱ्यांच्या फार्मला भेटी दिल्या. आज १३० बाय ६५ फूट अाकाराचे शेड आहे. सर्व सुविधायुक्त असे हे विदर्भातील पहिलेच शेड असावे, असा संजय यांचा दावा. आत्तापर्यंत २० बोकडांची (४ ते ५ पाच महिने वयाच्या) प्रति सहा हजार रुपयांप्रमाणे विक्री

    पशूवैद्यक भालचंद्र नेमाडे यांच्याकडून दुग्धव्यवसायातील महत्त्वाच्या गोष्टी शिकून घेतल्या.

    संजय इंगळे - ९६५७२७६६६५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com