भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील आशावादी किरण

किरण हरिमकर
किरण हरिमकर

भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून रोहडा (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील किरण हरिमकर या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतीचे अर्थकारण उंचावले आहे.   यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यात रोहडा येथे किरण हरिमकर यांची शेती आहे. हे गाव भाजीपाला शेतीसाठी प्रसिद्ध आहे. तसे पाहायला गेल्यास तसे पाहायला गेल्यास किरण यांचे वडील रामचंद्र यांनी साधारण १९८५-८६ या काळात भाजीपाला शेती सुरू केली. त्या वेळी टोमॅटो किंवा अन्य संकरीत पीक वाण ते घेऊ लागले. त्यानंतर हळूहळू गावातील अन्य शेतकरीही संकरीत भाजीपाला शेतीकडे वळाले. सिंचनाच्या सुविधा पुरेशा नव्हत्या. मात्र शेतकरी या पीकपद्धतीकडे आश्वासकपणे पाहात होता. हरिमकर यांची शेती हरिमकर यांची सुमारे सात एकर १५ गुंठे शेती आहे. सध्या ती युवा पिढीचे किरण सांभाळतात. कापूस आणि भाजीपाला अशी त्यांची मुख्य पीकपद्धती आहे. कपाशीचे ते बीजोत्पादन घेतात. सुमारे दोन एकरांवर भाजीपाला घेतला जातो. सिंचनासाठी विहिरीचा पर्याय अाहे. मात्र, फेब्रुवारीपर्यंतच या स्त्रोताद्वारे पाणी उपलब्ध असते. सध्या भाजीपाला घेण्यासाठी मल्चिंग आणि ठिबक सिंचनाचा वापर होतो. पाणी मार्चअखेरपर्यंत कसेबसे उपलब्ध होते. असे किरण सांगतात. भाजीपाला पिकांचे नियोजन सुमारे दोन एकरांवरील भाजीपाला पिकांत मिरची, कारले, दोडकी, टोमॅटो, काकडी, वांगी आदी विविध प्रकारचा भाजीपाला घेतला जातो. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भाजीपाला लागवड होते. मजुरांमार्फतच शेतीतील बहुतांश कामे केली जातात. हंगामात सुमारे दहा मजुरांची गरज भासते. बाजारपेठ पुसद, अमरावती, यवतमाळ आदी बाजारपेठेत भाजीपाला विक्री केली जाते. गावातील अन्य भाजीपाला उत्पादकांसह सर्वांचा माल एकतितपणे बाजारपेठेत पाठविला जातो. त्या माध्यमातून वाहतूक खर्चात बचत होते. दरांची समस्या भेडसावते

  • सन २००४ मध्ये बांबूचा आधार घेऊन भाजीपाला पिकांसाठी मंडप तयार केला. त्यावर कारली आणि दोडका यांचे वेल चढविले. बांबूची खरेदी आणि अन्य बाबींवर सुमारे ५५ हजार रुपये खर्च झाला.
  • अर्थात गुंतवणूक करूनही अनेकवेळा अपेक्षित दर मिळत नाहीत. काहीवेळा किलोला अवघ्या तीन, चार रुपये दरानेदेखील कारली विक्री करावी लागली. असे अनुभव आल्यानंतर खर्च कमी करण्याकडे अधिक लक्ष दिले. त्यातूनच नफ्याचे प्रमाण वाढवल्याचे किरण यांनी सांगितले.
  • सुमारे ४५० शेतकरी असलेल्या रोहडा गावात सुमारे १२५ ते १५० शेतकरी भाजीपाला घेतात.
  • उन्हाळ्यात भासणारी पाणीटंंचाई लक्षात घेता परिसरात लघुसिंचन प्रकल्प व्हावा, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात
  • शेतीचा विकास

  • पुण्यासह राज्यातील विविध भागांतील कृषी प्रदर्शनांना भेटी देण्याचा किरण यांचा प्रयत्न असतो.
  • कृषीविषयक साहित्य वाचनातूनही ते ज्ञानवृद्धी करतात. अशा प्रयत्नांतूनच शेती फायदेशीर करता
  • आल्याचे ते सांगतात. त्यांचे दरीचे शेत या नावाने अन्य एक शिवार आहे. अन्य शेतांपासून
  • तीन किलोमीटर पाइपलाइन उभारून तेथे पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा खर्च झाला. पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे भाजीपाला शेती करणे अधिक सोपे झाले.
  • कुंपणही केले उत्पन्नक्षम किरण यांची रस्त्यालगत शेती अाहे. तेथे जनावरांचा अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तीन एकर १० गुंठे शिवाराला कुंपण केले आहे. तारेच्या कुंपणावर एका बाजूस कारल्याचा तर दुसऱ्या बाजूला दोडक्‍याचा वेल चढविला आहे. हंगामात त्यापासून सरासरी दहा ते पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची संधी त्यातून असते. त्यासाठी वेगळे परिश्रम घ्यावे लागत नाहीत. तसेच वेगळा खर्चही फार करावा लागत नाही. भाजीपाला जोडीला कापूस बीजोत्पादन सुमारे तीन एकर क्षेत्रावर खासगी कंपनीसाठी कापूस बीजोत्पादन घेतले जाते. यात सुमारे १९९० पासून सातत्य ठेवले आहे. उत्पादन खर्च सुमारे ३५ हजार रुपयांपर्यंत होतो. दोन वर्षांपूर्वी सरासरी १० क्‍विंटल प्रति एकर उत्पादन मिळाले होते. बीजोत्पादनासाठी १७ ते १८ हजार रुपये प्रति क्‍विंटल असा सरासरी दर मिळतो. गेल्यावर्षी गुलाबी बोंड अळीमुळे उत्पादन घटले होते. यंदाचा हंगाम उत्पादनक्षम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. असे होते बीजोत्पादन

  • या गावात मोठ्या क्षेत्रावर बीजोत्पादन घेतले जाते. अनेक कंपन्यांनी आपले प्रतिनिधी या गावात नेमले आहेत. कंपनीकडून करण्यात येणाऱ्या या करारात शेती भाडेतत्त्वावर घेतल्याचा उल्लेख राहतो. त्यासाठी आता सातबारा उताऱ्याची देखील मागणी होऊ लागली आहे. काहीवेळा फसवणुकीचा अनुभवही आल्याचे किरण सांगतात. बीजोत्पादक शेतकऱ्यांना सुरवातीला बियाणे खरेदीसाठी पैसे द्यावे लागतात.
  • तीनशे ग्रॅम बियाण्यासाठी सुमारे १६०० रुपये मोजावे लागतात. कंपनी शेतकऱ्यांकडून बियाणे घेऊन जाते. चाचणीत ते ‘फेल’ आढळल्यास निघाल्यास बाजारपेठेतील दरानुसार कापसाला दर मिळतो.
  • शेतकऱ्याने मागणी केल्यास पुनर्चाचणी केली जाते. त्यासाठी होणाऱ्या खर्चाची वसुली शेतकऱ्यांकडून केली जाते.
  • किरण हरिमकर - ९८२३८७३१३३    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com