खत व्यवस्थापनातून वाढविली ऊस उत्पादकता

उसाची लागवड करण्याआधीपासून आणि नंतरही योग्य खत व्यवस्थापन करीत देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील नितीन ढूस यांनी उत्पादकता वाढवली आहे. वातावरण आणि पिकाची गरज ओळखून ते खताचे नियोजन करतात. खत व्यवस्थापनामुळे नितीन ढूस यांनी उसात कांदा रोपे, हरभरा या आंतरपिकांतूनही चांगले उत्पादन घेतले आहे.
ऊसाच्या शेतात उभे नितीन ढूस.
ऊसाच्या शेतात उभे नितीन ढूस.

उसाची लागवड करण्याआधीपासून आणि नंतरही योग्य खत व्यवस्थापन करीत देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील नितीन ढूस यांनी उत्पादकता वाढवली आहे. वातावरण आणि पिकाची गरज ओळखून ते खताचे नियोजन करतात. खत व्यवस्थापनामुळे नितीन ढूस यांनी उसात कांदा रोपे, हरभरा या आंतरपिकांतूनही चांगले उत्पादन घेतले आहे. नितीन ढूस यांची ३२ एकर शेती आहे. ते व त्यांचे दोघे भाऊ शेतीचे व्यवस्थापन करतात. त्यांच्याकडे पंधरा एकर खोडवा ऊस असून, नव्याने पाच एकरावर साडेचार फूट अंतराच्या सरीवर लागवड केलेली आहे.

एकात्मिक खत व्यवस्थापन : एकात्मिक खत व्यवस्थापनाला ते प्राधान्य देतात. लागवडीआधी शेतात सोयाबीन किंवा ताग हे हिरवळीचे खत घेतात. बेसल डोस देण्यासाठी लागवडीआधी पंधरा दिवस सूक्ष्म अन्नद्रव्य खत शेणखतात भिजवून ठेवतात. त्यासाठी एकरी झिंक सल्फेट १० किलो अधिक फेरस सल्फेट ५ किलो अधिक गंधक १५ ते २० किलो अधिक मॅग्नेशिअम सल्फेट २० किलो हे सर्व १०० किलो शेणखतात मिश्रण केले जाते. मिश्रण १५ दिवस मुरवून ठेवले जाते. शेणखतात सूक्ष्मअन्नद्रव्ये मिश्रण करून दिल्याने सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात पिकांना लवकर उपलब्ध होतात; तसेच वाया जाण्याचे प्रमाणही कमी राहते असा त्यांचा अनुभव आहे. लागवडीआधी १०ः२६ः२६ हे दाणेदार खत एकरी दीड क्विंटल या प्रमाणात टाकतात. लागवडीनंतर ४५ दिवसांनी ठिबक संचातून २ ते ३ किलो युरिया व अर्धा किलो फॉस्फरिक अॅसिड एकत्र करून दिवसाआड सुमारे तीन महिने देतात. दरम्यानच्या काळात जर पावसाचा खंड पडला आणि उन्हाची तीव्रता वाढल्यास एकरी ५ किलो नत्राची मात्रा देतात. आवश्‍यकता वाटल्यास फवारणीच्या माध्यमातून २ टक्के युरिया व पोटॅशची फवारणी केली (२० ग्रॅम प्रतिलिटर) जाते. खताचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना यंदा (२०१७-१८) एकरी ६८ ते ७३ टन उत्पादन मिळाले आहे.

प्रतिक्रिया : ऊस पिकाला खताची जास्त मात्रा दिल्यास पिकावर परिणाम होतो. प्रसंगानुरूप खत दिले तर चांगले उत्पादन निघते, असा माझा अनुभव आहे. नितीन ढूस, ऊस उत्पादन शेतकरी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. नगर संपर्क : नितीन ढूस, ९०११०१३१०९  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com