लॉनसाठीच्या गवताची व्यावसायिक शेती

मौजे डिग्रज (जि. सांगली) येथील शीतल आवटी या तरुण शेतकऱ्याने ग्राहक व बाजारपेठ यांचा बारकाईने अभ्यास करून लॉनसाठीच्या गवताची वैशिष्ट्यपूर्ण शेती केली आहे. ‘लॅंडस्केप डिझाइन’ या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करून या शेतकऱ्याने शेतीतील वेगळ्या ‘करिअर’चा मार्ग शेतकऱ्यांना दाखवला आहे.
विक्रीसाठी लॉन गवताचे रोल किंवा शीट्‍स दुचाकीद्वारे नेताना शीतल आवटी.
विक्रीसाठी लॉन गवताचे रोल किंवा शीट्‍स दुचाकीद्वारे नेताना शीतल आवटी.

मौजे डिग्रज (जि. सांगली) येथील शीतल आवटी या तरुण शेतकऱ्याने ग्राहक व बाजारपेठ यांचा बारकाईने अभ्यास करून लॉनसाठीच्या गवताची वैशिष्ट्यपूर्ण शेती केली आहे. ‘लॅंडस्केप डिझाइन’ या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करून या शेतकऱ्याने शेतीतील वेगळ्या ‘करिअर’चा मार्ग शेतकऱ्यांना दाखवला आहे.

सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज गाव हळद, ऊस आणि भाजापीला पिकांसाठी अोळखले जाते. गावातील शीतल बाळासाहेब आवटी या तरुण शेतकऱ्याची पाच एकर शेती आहे. ऊस, हळद ही पिके त्यांच्या शेतात प्रामुख्याने घेतली जातात. शीतल सांगतात, की सन २०१० मध्ये परिसरातील नर्सरीमध्ये नोकरीचा अनुभव घेण्यास सुरवात केली. रोपे तयार करणे, कुंड्या भरणे यांसारखी कामे करू लागलो. त्यात आनंद वाटू लागला. त्यानंतर काही किलोमीटरवर असलेल्या कुपवाड येथे मामा सुनील पाटील यांच्या नर्सरीत काम करू लागलो. तिथे २०१३ पर्यंत म्हणजे तीन वर्षांत ‘गार्डन’ची कामे, लॉन तयार करणे आदी कामांत कुशल झालो.     लॉनच्या गवताची शेती नर्सरीची कामे सुरूच होती. त्यातून जिल्ह्यातील अनेक ग्राहकांशी ओळख झाली. त्यातून ‘गार्डनिंग’ची कामे मिळू लागली. पुणे, मुंबईहून गार्डनसाठी लागणारे लॉनचे गवत घेतले जायचे. आपण स्वतःच त्याच्या गवताचे उत्पादन केले तर नक्कीच याचा फायदा होईल, व्यवसायात टिकून राहणे शक्य होईल, असा विचार मनात आला. त्यादृष्टीने प्रवास सुरू  झाला.

शिक्षण घेतले मग शीतल यांनी पुढील शिक्षण घेण्याचे ठरले. सन २०१४ मध्ये पुणे येथे ‘लॅंडस्केप डिझायनिंग’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. यामध्ये ‘गार्डन’ची सजावट कशी करायची, याचा अभ्यास केला. हे शिक्षण घेत असताना ‘गार्डनिंग’ची कामेही तिथे मिळाली.  

घरच्यांचा विरोध शिक्षण संपवून गावी आल्यानंतर ‘लॉन’च्या गवताची शेती करायची आहे, अशी चर्चा शीतल यांनी वडिलांसोबत केली. आपण शेतातून गवत बाहेर काढतो. तू चक्क गवताची शेती करणार, असा प्रश्न वडिलांनी केला. यासाठी शेतीतील क्षेत्र मिळणार नाही, असा विरोध झाला; पण शीतल यांनी जिद्द सोडली नाही. अखेर चिकाटी पाहून वडिलांनी २०१६ मध्ये एक एकर शेती त्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यात ऊस पीक होते. मुंबई येथून लॉनच्या गवताचे बियाणे आणले. लागवड केली. त्यामध्ये तण भरपूर होते. तणनाशक मारून चालणार नव्हते. त्यामुळे पंधरा दिवसांनी भांगलण करावी लागायची. दरम्यानच्या काळात परिसरातील शेतकरीही शेतात गवत का लावता, असे प्रश्न विचारू लागले. उलट सुलट चर्चा केली; पण शीतल मागे हटले नाहीत.

ग्राहकांचा विश्‍वास मिळवला उद्दिष्टापासून न ढळता शीतल यांनी व्यवसायात पाय रोवण्यास सुरवात केली. रोपे देणे, लॉन तयार करणे किंवा लॅंडस्केपिंग करणे या कामांत प्रावीण्य येऊ लागले. आज त्यांनी आपले ग्राहक तयार केले आहेत. प्रामाणिकपणे काम केल्याचीच ही पावती असल्याचे शीतल सांगतात.

‘बोन्साय’ करण्याचे प्रशिक्षण ‘नर्सरी’ क्षेत्रातच काम करायचे ठरवले असल्याने यासाठी लागणाऱ्या शिक्षणापासून वंचीत राहायचे नाही असे ठरवले होते. त्यानुसार बोन्साय प्रकाराने झाड तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्ली येथे घेतले आहे, असे शीतल सांगतात. ऊस, हळद, भाजीपाला आदी मालाचे दर आपण ठरवू शकत नाही. मात्र, लॉन तयार करण्याच्या व्यवसायात आपण आपले दर निश्चित करू शकतो. हा व्यवसाय चांगली संधी मिळवून देणारा आहे. शेतकऱ्यांनी त्याचा अभ्यास, त्याचबरोबर बाजारपेठ आणि ‘गार्डनिंग’चे तंत्र शिकले पाहिजे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी घरच्यांचा विरोध झाला, अनेकांनी शंका व्यक्त केल्या; पण मी जिद्द सोडली नाही. ठरवलेले ध्येय गाठायचेच, असा निश्चय मनाशी बाळगला होता, तो अमलातही आणला.  

शीतल यांच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये

  • गवताचे प्रकार - कोरियन कारपेट - याची उंची वाढत नाही.
  • देखभालीचा खर्च कमी.
  • अमेरिकन ब्ल्यूग्रास - वाढ जास्त, देखभालीच्या खर्चात वाढ
  • लॉनच्या गवताची काढणी सात ते आठ महिन्यांत होते. या वेळी रोलिंग, काढणी केली जाते.  
  • विक्री व्यवस्था

  • ५० टक्के - लॉनच्या गवताची (शीट्‍स) सांगली,
  • कर्नाटकात विक्री
  • ५० टक्के - स्वतः कामे घेतली जातात
  • दर प्रति लॉनशीट प्रति चौरस फूट - सुमारे २५ ते ३० रुपये.
  • पहिल्यावर्षी लागवडीपासून ते पहिली काढणी होईपर्यंत एकरी सहा ते सात लाख रुपये खर्च
  • त्यानंतर तो दोन ते तीन लाख रुपये आला.
  • एका एकरात सुमारे ४० हजार चौरस फूट लॉन गवताचे उत्पादन होते.
  • काळ्या-तांबड्या जमिनीत नियोजन.
  • लागवड केव्हाही करता येते.
  • पाणी वेळेवर आणि भरपूर लागते.
  • एक ते दोन वेळाच युरिया आणि १०-२६-२६ खताचा वापर
  • तणनाशकाचा वापर केला जात नाही.
  • भांगलणी केली जाते.  
  • संपर्क : शीतल आवटी,९५५२२९११५६     

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com