agricultural success story in marathi, gundegaon dist. nagar , Agrowon, Maharashtra | Agrowon

‘संपूर्ण’ गटाची उद्योगप्रधान शेती
सूर्यकांत नेटके
मंगळवार, 12 जून 2018

गुंडेगाव (ता. जि. नगर) येथील शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण शेतकरी गटा’ची स्थापना केली. गटाचे अध्यक्ष संतोष संभाजी भापकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कडधान्ये पिकवत गटाने पुणे, मुंबईची बाजारपेठ हस्तगत केली आहे. महिन्याला पाच लाख रुपयांची उलाढाल करीत दूरदृष्टी व संघटनकौशल्याच्या जोरावर शेतीला उद्योगाचे स्वरूप देत वाटचाल पुढे चालू ठेवली आहे.

गुंडेगाव नगरपासून पस्तीस-चाळीस किलोमीटरवर तालुक्यातील शेवटचे गाव. तीनही बाजूंनी डोंगर, शेती पूर्ण पावसावर अवलंबून. अलीकडेच जलयुक्त शिवार योजनेत सहभाग. त्यामुळे पाण्याची काही प्रमाणात सोय.

गुंडेगाव (ता. जि. नगर) येथील शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण शेतकरी गटा’ची स्थापना केली. गटाचे अध्यक्ष संतोष संभाजी भापकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कडधान्ये पिकवत गटाने पुणे, मुंबईची बाजारपेठ हस्तगत केली आहे. महिन्याला पाच लाख रुपयांची उलाढाल करीत दूरदृष्टी व संघटनकौशल्याच्या जोरावर शेतीला उद्योगाचे स्वरूप देत वाटचाल पुढे चालू ठेवली आहे.

गुंडेगाव नगरपासून पस्तीस-चाळीस किलोमीटरवर तालुक्यातील शेवटचे गाव. तीनही बाजूंनी डोंगर, शेती पूर्ण पावसावर अवलंबून. अलीकडेच जलयुक्त शिवार योजनेत सहभाग. त्यामुळे पाण्याची काही प्रमाणात सोय.

शेती
हुलगे, मटकी, कारळे, मूग, उडीद, तीळ, सोयाबीन, जवस, तूर, बाजरी, ज्वारी ही पिके घेताना रासायनिक पद्धतीचा वापर शक्‍यतो नसायचा. त्यामुळे शेतमाल शक्यतो सेंद्रियच असायचा. मात्र त्याला बाजारपेठ उपलब्ध नव्हती.  

सुमारे १३ वर्षांपूर्वी
संतोष भापकर
गावातील प्रगतिशील शेतकरी
मित्रांनो, आपण सामूहिक शेती करू. माल एकत्र विकू.
भविष्यात शेतीत टिकायचे तर या पद्धतीला पर्याय नाही.
शेती ८० एकर

सुरुवातीचे प्रयत्न
सुरुवातीला तीन गट तयार केले. तीनही मोडले.
गुंडेगाव भागात कडधान्य पिके घेतली जातात. दर्जेदार माल असून बाजारपेठ नाही. श्रीगोंदा, नगर ही गावे चाळीस किलोमीटरवर. गटाने शेती करताना बाजारपेठा तसेच पुणे, मुंबईत कशा प्रकारे धान्य विक्री करता येईल याचा अभ्यास केला.

रस्त्यावर विक्री

 • भापकर यांनी काहींना मार्केटिंगमध्ये प्रशिक्षित केले. रस्त्याच्या बाजूला सेंद्रिय मालाचे मार्केटिंग सुरू केले.   
 • व्हिझिटिंग कार्डस तयार केली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना ती देण्यात येऊ लागली. ग्राहक घरी गेल्यानंतर फोन करायचे व मालाची मागणी करायचे. ग्राहक पुण्याचा असेल तर तो आमच्या भागात कोठे मिळेल असे विचारायचा. याचे उत्तर गटाकडे नव्हते.
 • त्यामुळे शहरांच्या बाजारपेठा शोधण्यास सुरुवात केली.
 • सर्व प्रयत्नांतून उभारले ‘संपूर्ण शेतकरी मॉडेल’

सभासद १००
सेंद्रिय क्षेत्र १७०० एकर
शेतमाल- हुलगा, मटकी, मूग, तूर, जवस, वाटाणा, सोयाबीन, तीळ, धने, कारळे, नाचणी, मोहरी, शेंगदाणा, मसूर, चवळी, बाजरी, कांदा, कांदा, हरभरा, ज्वारी.

विक्रीसाठी पॅकिंग
१०० ग्रॅम ते पाच किलो

  रिटेल दुकाने होम डिलिव्हरी
पुणे ५२ २००
मुंबई ५० ३२

व्यवस्थापन :

 • बहुतांश उत्पादन सेंद्रिय पद्धतीने.
 • गटातील प्रत्येकाकडे किमान दोन देशी गायी असणे गरजेचे. गोमूत्र व शेणखत वापरावर भर.
 • सध्या शंभर कुटुंबांकडे प्रत्येकी दोन देशी गायी. वर्षभराचे गोमूत्र बाटल्यांत साठवले जाते.
 • प्रत्येक शेतकरी जवळपास एक हजार लिटरपेक्षा अधिक गोमूत्राचा व दशपर्णी अर्काचाही वापर

जास्त दर, जागेवरच खरेदी

 • गटातील शेतकरी भापकर- २८ टक्के जास्त दराने मालाची जागेवरच खरेदी.
 • हमाली, तोलाई, वाहतूक खर्च नाही. जागेवरच जास्त पैसे मिळत असल्याने शेतकरी समाधानी.
 • खरेदी धान्य स्वच्छ करण्याची जबाबदारी त्याच शेतकऱ्यांच्या घरातील महिलांकडे. त्यातूनही त्यांना रोजगार.
 • मिनीडाळ-गटातील एकाकडे- त्यासाठी त्याला कर्ज त्याच्याकडून सेंद्रिय डाळीचा पुरवठा. त्यासाठी प्रति किलो दहा रुपये किलोप्रमाणे मोबदला.

 
माल नोंदणीसाठी ॲप 

 • संपूर्ण शेतकरी गट नावाने (sampurnashetkary) ॲप.
 • गुगल प्ले स्टोअरवरून तीन हजारांपेक्षा अधिकांकडून ते डाऊनलोड केले आहे.

ॲपचे फायदे 

 • उपलब्ध माल, वजन, त्याची किंमत कळते.
 • घरपोच धान्य मागणी नोंदवता येते. त्याचे ठिकाण कळते. त्वरीत मागणी करणाऱ्यांना माल कधी पोच होईल याची माहिती होते. नियमित ग्राहकांना दरात काही टक्के सवलत. काहीवेळा शंभर रुपये किमतीचा भाजीपालाही धान्यासोबत मोफत.

विक्री साह्य 

 • तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, श्रीकांत जावळे, उमेश डोईफोडे यांच्या मदतीने कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासनकडून प्रमाणपत्र.
 • नगरला भरणाऱ्या साईज्योती स्वंयसहायता बचत गट, कृषी विभागाच्या कृषी महोत्सवातून सेंद्रिय धान्याची विक्री.
 • पुण्यात भरणाऱ्या भीमथडी प्रदर्शनातूनही विक्री.

ज्योती यांनी नाकारली नोकरी
गटाचे अध्यक्ष संतोष यांच्या पत्नी ज्योती यांचे माहेर श्रीगोंदा आहे. त्या एमएसस्सी ऑरगॅनिक आहेत. सन २०१३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन रायगड जिल्ह्यात नायब तहसीलदारपदी नियुक्तीची निश्‍चित झाली. मात्र गटासाठीच काम करण्याचे ध्येय ठेवत त्यांनी नोकरी नाकारली. सध्या विक्री व्यवस्थेची जबाबदारी त्या पाहतात.

भविष्यातील नियोजन 

 • देशी तुपाची निर्मिती व विक्री
 • शेतीला उद्योगाचे स्वरूप देऊन तसाच प्रसार
 • रासायनिक अवशेषमुक्त अन्न निर्यातीपेक्षा भारतीयांनाच खाऊ घालणार

प्रतिक्रिया 
पूर्वी कडधान्याला सक्षम बाजारपेठ नव्हती. ती त्रुटी भरून निघाली आहे. ग्राहकांना दर्जेदार, सेंद्रिय मालाचा पुरवठा केला व विक्री व्यवस्था उभी केली तर उत्पन्न वाढते हे अनुभवण्यास येत आहे.
बाळासाहेब चौधरी, उत्तम भापकर, अशोक कुताळ

संपर्क : संतोष भापकर, ९४०४३८८००८
 : ज्योती भापकर, ९४२३००४०३९

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...
प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...
पणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...
सावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...
शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...
शेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...
ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...
किमान तापमानात हळूहळू वाढपुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...
रोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...
सर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...