agricultural success story in marathi, improved implements of Ashtosh Deshmukh, Chandurbazar, Dist. amravati | Agrowon

पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा पुरेपूर वापर
विनोद इंगोले
सोमवार, 10 डिसेंबर 2018

हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध पीक पद्धतीसाठी बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी विविध यंत्रांचा खुबीने वापर करीत यांत्रिकी शेतीचा नमुना पेश केला आहे. मशागत, आंतरमशागतीपासून ते स्वयंचलित पेरणी, टोकणी, मातीला भर देणे, फवारणी, खुडणी आदी विविध कामांसाठी त्यांनी यंत्रांचा आधार घेताना गरजेनुसार काही यंत्रांमध्ये बदलही करून घेतले आहेत.

हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध पीक पद्धतीसाठी बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी विविध यंत्रांचा खुबीने वापर करीत यांत्रिकी शेतीचा नमुना पेश केला आहे. मशागत, आंतरमशागतीपासून ते स्वयंचलित पेरणी, टोकणी, मातीला भर देणे, फवारणी, खुडणी आदी विविध कामांसाठी त्यांनी यंत्रांचा आधार घेताना गरजेनुसार काही यंत्रांमध्ये बदलही करून घेतले आहेत.

बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांची संयुक्त ३० एकर शेती आहे. ही शेती बहुविध पिकांची आहे. यात कापूस, तूर, हळद, संत्रा, केळी आदी हंगामी, वार्षिक पिकांचा समावेश आहे. साहजिकच मोठे क्षेत्र व पीक विविधतेमुळे व्यवस्थापन करताना प्रत्येक वेळी मजूरबळाचा वापर करावा लागे. त्यामुळे खर्च तर वाढायचाच. शिवाय वेळही खूप जायचा. त्यामुळे मजुरी, वेळ, पैसा यात बचत करण्याच्या दृष्टीने त्यांनी यांत्रिकीकरणाची वाट धरली. त्यासाठी शोधक, अभ्यासू व धडपड करण्याची वृत्तीच त्यांना उपयोगी पडली. त्यातून त्यांनी विकसित केलेल्या यांत्रिक शेतीची ठळक वैशिष्ट्ये पाहूया.

आंतरमशागतीसाठी छोटा ट्रॅक्‍टर

मशागतीसाठी ट्रॅक्‍टरच्या वापरावर देशमुख यांनी भर दिला आहे. एके दिवशी बसमधून प्रवास करीत असताना त्यांना एका शेतात मिनीट्रॅक्टर चालू असल्याचे दृश्य पाहण्यास मिळाले. त्यांनी शोधकवृत्तीने त्याची माहिती काढली. पटेल नामक एका गुजराती व्यक्तीने हे शेत करारापोटी घेतल्याचे कळाले.
त्याच्यासोबत चर्चा केल्यानंतर देशमुख राजकोट येथे गेले. तेथे या ट्रॅक्टरने होणारी सारी कामे मुक्काम करून पाहिली. सन २०१० च्या दरम्यानची ही गोष्ट. आज याच ट्रॅक्‍टरद्वारे ते आपल्या सर्व पिकांतील आंतरमशागतीची कामे करतात.

फायदे

  • मजुरांच्या माध्यमातून होणारी कामे टप्प्याटप्प्याने कमी केली.
  • आज ९५ टक्‍के कामे मजुरांऐवजी या ट्रॅक्‍टरद्वारे ने केली जातात. उर्वरित पाच टक्‍के कामांसाठी बैलजोडीचा वापर होतो.
  • ट्रॅक्टरच्या पुढील दोन चाकांमधील अंतर ४२ इंच आहे. तर मागील चाकांची रुंदी नऊ इंच आहे. त्यामुळे लहान ओळीतील पिकांतही (पाच फूट) हा ट्रॅक्टर चालतो.

हळद लागवड

हळद लागवड ट्रॅक्‍टरचलित यंत्राने होते. यात दोन फाळांना अडीच इंचाचा पाइप लावला आहे. त्यातून बेणे टाकता येते. ट्रॅक्‍टरचा वेग कमी जास्त करून नियोजन करता येते. दोन फूट बाय सहा इंच अंतरात लागवड होऊ शकते. गरजेनुसार अंतर बदलताही येते. अंतरात जास्त फरक पडल्यास ही ‘गॅप’ भरून निघावी यासाठी दोन मजूर मागील बाजूस तैनात केलेले असतात.

झालेली बचत

हळद लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीत एकरी सरासरी २५ ते ३० मजुरांची गरज भासते. यंत्राद्वारे हे काम साधल्यास एकरी चार लिटर डिझेल (३२० रु.), चालकाची मजुरी २०० रुपये, दोन मजूर ४०० रुपये, तीन मजूर बेणे लागवडकामी ६०० रुपये याप्रमाणे एकरी खर्च होतो. म्हणजेच सुमारे १५०० ते साडे १५०० रुपयांत हे काम होते. पारंपरिक पद्धतीत २५ मजुरांची प्रत्येकी २०० रुपये मजुरी अपेक्षित धरल्यास हाच खर्च एकरी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक होतो.

बेडमेकर यंत्र

कपाशी, तूर, हळद या पिकांची लागवड देशमुख गादीवाफ्यावर करतात. मध्यंतरी पारंपरिक पद्धतीच्या तूर लागवडीत अतिपावसात तूर मर रोगाने नुकसानीत गेली होती. यांत्रिक पद्धतीने (बेडमेकरचा वापर) बेड तयार करून हे नुकसान वाचवले आहे. यामुळे वाफसा अवस्था चांगली राहते. झाडांच्या मुळांना खेळती हवा मिळते. पाणी साचून राहत नसल्याने रोगांपासून पीक दूर राहण्यास मदत होते. सुमारे २५ हजार रुपयांना हे यंत्र सुरतहून (गुजरात) आणले आहे. तीन ते पाच फूट अंतरापर्यंतचा बेड या माध्यमातून तयार करता येतो. मिनी ट्रॅक्‍टरचा वापर यात होतो.

पिकाला मातीची भर

तूर किंवा तत्सम पिके लहान वयात असताना निंदणी करून तण काढण्यात येते. या वेळी उकरलेल्या मातीची भर लावणारे यंत्रही देशमुख यांच्याकडे आहे. राजकोटहून (गुजरात) १५ हजार रुपयांत ते आणले आहे. मातीची भर लावण्यानंतर तणेही मातीमुळे बुजून जात असल्याने त्यांचे नियंत्रण होऊन जाते.

स्वयंचलित सीड ड्रील

या यंत्राच्या माध्यमातून सोयाबीन, हरभरा, तूर, गहू यासारख्या पिकांची टोकण वा पेरणी शक्य होते. सन २०११ मध्ये राजकोट (गुजरात) येथूनच त्याची खरेदी ३३ हजार रुपयांना करण्यात आली. यालही मिनी ट्रॅक्टरची जोड देता येते. दिवसभरात हरभरा चार एकर, सोयाबीन दहा एकरांपर्यंत लावण याद्वारे शक्‍य होते असा देशमुख यांचा अनुभव आहे. या यंत्राच्या माध्यमातून पेरणीळी खत देणेदेखील शक्‍य होते. त्यामुळे मजुरी खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो.

ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र

विविध पिके असल्याने फवारण्याही भरपूर असतात. त्यासाठी मजुरांची वेळोवेळी गरज भासत होती. त्यावर ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्राच्या माध्यमातून पर्याय शोधला. नाशिक येथून २०१२ मध्ये ४० हजार रुपयांत त्याची खरेदी करण्यात आली. सहाशे लिटर क्षमतेचा टॅंक यात आहे. दिवसभरात २० ते २५ एकरांपर्यंत फवारणीचे काम या यंत्राद्वारे होते. केवळ दोन मजूर व चालक एवढेच मनुष्यबळ लागते.

तूर खुडणी यंत्र

तीन ड्रिल्स, मोटर व १२ व्होल्टची बॅटरी यांचा वापर केलेले तूर खुडणी यंत्रही आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीसाठी एकरी दहा मजुरांची गरज यासाठी भासत होती. यंत्राचा वापर केल्यास एका व्यक्‍तीच्या माध्यमातूनच विरळणी आणि खुडणीचे काम होते. हे यंत्र तयार करून घेण्यासाठी ४०० रुपयांचा खर्च आल्याचे देशमुख सांगतात.

बहुउद्देशीय सायकल यंत्र

तीन वर्षांपूर्वी एकरी १६ ते १७ हजार झाडे कपाशीची लावली. यासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागले. त्यावर पर्याय म्हणून सायकल पेरणी, टोकण आणि कोळपणी असे बहुपयोगी यंत्र आपल्या कल्पकतेतून तयार केले आहे. मोठ्या ट्रॅक्‍टरमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लेटसचा वापर यात केला आहे. एका व्यक्‍तीच्या माध्यमातून तीन ते चार एकर पेरणी किंवा खत देणे या यंत्राच्या माध्यमातून देणे शक्‍य होते. अवघ्या ३७०० रुपयांत हे यंत्र विकसित केल्याचे देशमुख सांगतात.

रोटाव्हेटरमध्ये सुधारणा

रोटाव्हेटरमधील "जे' आकारचे ब्लेड ओल्या मातीत चालते. मात्र कडक जमिनीत ते तुटण्याची भिती राहते. त्यामुळे त्यात सुधारणा करुन "एल' आकाराचे ब्लेड तयार करुन घेतले. यासाठी आठ हजार रुपयांचा खर्च झाला. मात्र मशागतीचे काम सुलभ झाले आहे.

पक्ष्यांना दूर हाकलण्याचे यंत्र

शेतात येणारे पक्षी हाकलण्यासाठी ४०० रुपयांत यंत्र विकसीत केले आहे. फॅन आणि स्टीलच्या भांड्याचा वापर यात रण्यात आला आहे. मृगधारा बहुद्देशीय शेतकरी स्वयंसाह्यता समूहाच्या माध्यमातून त्याची विक्री होते. आत्माअंतर्गत या समूहाची नोंदणी झाली आहे.

सिंचनासाठी यंत्र

स्प्रिंकलरची दुसरी शिफ्ट चालू करायची असल्यास पंप बंद करावा लागतो. तो पाचशे फुटांवर असल्यास सरासरी १५ मिनिटे वेळ पायी जाण्यास खर्ची होतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी दोन व्हॉल्व्हज तयार केले आहेत. त्यासाठी सरासरी १८९०० रुपये खर्च झाला. या माध्यमातून दुसरी शिफ्ट सुरू करणे सोयीचे होते. प्रयोगशीलतेला चालना देणाऱ्या देशमुख यांची शेती पाहण्यासाठी राज्य व राज्याबाहेरील शेतकरीही येत असतात. काही यंत्रे पंजाबमधील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून नेली आहेत.

बहुद्देशीय वखर

आंतरमशागतीसाठी गुजरातहून ११ हजार रुपये किंमतीचा बहुद्देशीय वखर खरेदी केला आहे. याचे अंतर कमी जास्त करता येते. जीआय पाइपला छिद्र पाडण्यात आले असून, त्या माध्यमातून अंतर ‘सेट’ करता येते. नऊ इंच खोलीपर्यंत डवरणीचे काम यातून साधता येते.

परिसरातील पहिली बोअरवेल

उत्पादकता वाढीसाठी पिकांना संरक्षित सिंचनाची गरज असल्याचे लक्षात आले. त्यामुळे २००१ साली बेलोरा परिसरातील पहिलीच बोअरवेल त्यांनी घेतली. पाण्याची सोय झाल्यानंतर व्यावसायिक पीक म्हणून पाच एकरांवर संत्रा लागवड केली.

संशोधक संस्थांना भेटी
कृषी प्रदर्शने व संशोधन संस्थांच्या भेटीवर देशमुख यांचा कायमच भर राहतो. शेतीत नवे करण्याची जिद्द आणि उत्साह असल्यामुळे प्रयोगशीलतेत अनेक वर्षांपासून सातत्य ठेवल्याचे ते सांगतात.

आशुतोष देशमुख, ९४०४६८९८४०

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
कमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...
दूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...
लसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण...राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक...
मधुमक्यावरील प्रक्रियामधुमक्याच्या काढणीनंतर पुढील प्रक्रिया या त्वरीत...
सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्टखरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग,...
मलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे...बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल...
यंत्राने काढा जांभळाचा गरकृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर...
शेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...
पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...
हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती यंत्रणादुष्काळी परिस्थिती दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा...
जैवइंधनावर चालणाऱ्या यंत्राची निर्मिती...सध्या पडिक आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीमध्ये...
धुरळणी यंत्र फायदेशीरधुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक...
देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...सध्याच्या काळात पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक...
असे करा ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा...सिन्नर (जि. नाशिक) येथील जनक कुंदे या अभियंता...
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग...नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍...
फुलांचा ताजेपणा टिकविण्यासाठी...घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर...