agricultural success story in marathi, islampur, walwa, sangli | Agrowon

भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड जमिनीची सुधारणा
अभिजित डाके
शनिवार, 20 जानेवारी 2018

   क्षारपड जमिनीत विक्रमी उत्पादन
क्षारपड जमिनीची सुधारणा केलेल्या शेतात २०१६-१७ च्या सुरू हंगामात उसाचे ३४ गुंठ्यांत ९४.९४२ टन उत्पादन (हेक्टरी २७९. २४ टन) घेण्यात अभिजित पाटील यशस्वी झाले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे (व्हीएसआय, पुणे) दक्षिण विभागात सुरू उसाचे अधिक उत्पादन मिळवल्याबद्दल ऊसभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्माान करण्यात आला आहे.

सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक
उरुण इस्लामपूर (जि. सांगली) येथील युवा शेतकरी अभिजित पाटील यांनी भूमिगत निचरा प्रणाली तंत्राचा अवलंब करून आपल्या क्षारपड जमिनीची सुधारणा केली. या जमिनीत उसाचे जिथे १५ ते २० टनच उत्पादन मिळायचे, तिथे सुरू उसाचे ३४ गुंठ्यांत ९४. ९४२ टन म्हणजे हेक्टरी २७९.२४ टन उत्पादन मिळविले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा २०१६-१७ चा विभागवार पहिला क्रमांक मिळवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे
.

 सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी व खतांचा अतिवापर झाल्याने क्षारपड जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. ही जमीन पिकाऊ व सुपीक बनवण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्नशील आहेत. वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर येथील अभिजित बाळासाहेब पाटील हा त्यापैकीच युवा शेतकरी.

जमीन सुधारण्यासाठीचे प्रयत्नअभिजित यांचे एम.कॉम.पर्यंत शिक्षण झाले आहे. इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ते सध्या क्‍लार्क आहेत. त्यांचे वडील शेतीच करायचे. एकूण शेती सात एकर. त्यातील पाच एकर क्षारपड होती. त्यामुळे ती असून नसल्यासारखी होती. दोनच एकरांत काय ते उत्पन्न मिळायचे. त्यामुळे आर्थिक ताणही जाणवायचा. प्रगतिशील विचारांचे अभिजित यांनी हीच पाच एकर क्षारपड जमीन सुधारण्याचे ठरवले.

विचारांना कृतीची दिशा मिळाली
सांगली शहरापासून जवळच असलेल्या कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राने भूमिगत निचरा प्रणाली तंत्राचा विकास केला आहे. ही माहिती इस्लामपूर नजीकच्या कै. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडून अभिजित यांना मिळाली. त्यांनी संशोधन केंद्रात धाव घेतली. तेथे निचरा प्रणालीचे कार्य, खर्च आदी सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था
शेतकऱ्यांना याच प्रणालीविषयी शेतकऱ्यांत जागृती करीत होती. अभिजित यांना नेमक्या याच काळात या तंत्राची व त्याबाबत मदत करणाऱ्या तज्ज्ञांची गरज होती. विचारांना कृतीची दिशा मिळाली. त्यानुसार संस्थेने प्रायोगिक तत्त्वावर अभिजित यांच्या शेतात तंत्राचा वापर करण्याचे नक्की केले. मुख्य म्हणजे त्याचा खर्चही संस्थाच करणार होती.

 या होत्या अडचणी

 • जमीन क्षारपड असल्याने उगवण क्षमता कमी होती.
 • पाणी साचून राहत असल्याने निचरा होत नसे
 • शेती पडून होती
 • ऊस उत्पादकता एकरी केवळ १५ ते२० टन होती.

त्यासाठी असा केला भूमिगत
निचरा प्रणाली तंत्राचा वापर

 • पाच एकर क्षारपड क्षेत्र निश्चित केले.  संपूर्ण क्षेत्राचा आवाका लक्षात घेऊन जमिनीत तीन फूट खोल पाइप बसविली.
 • यात सुमारे चार पाइप्स वापरल्या. प्रत्येकी दोन पाइपमध्ये ६० फूट अंतर ठेवले.
 • पाइपची लांबी सुमारे सहाशे ते सातशे फूट होती.   
 • समांतर निचरा प्रणाली पद्धत वापरली.

   या झाल्या सुधारणा

 •  जमिनीची सुपीकता वाढू लागली
 •  वाफसा लवकर येऊ लागला
 •  पांढऱ्या मुळींची वाढ झाली.
   
 •  एकरी उत्पादन वाढू लागले. त्याची आकडेवारी (एकरी)                      
पीक  पूर्वी        सद्यःस्थितीत
हरभरा  २ ते ३.३ क्विंटल     ९ क्विंटल
सोयाबीन  ६ क्विंटल         १५ क्विंटल
ऊस     १५ ते २० टन       ५० ते ६० टन

  या गोष्टींची घेतली जाते काळजी

 •  मशागत ३५ एचपी ट्रॅक्‍टरच्या वापराने. त्यामुळे शेताचा तुडवा होत नाही
 •  तणनाशकांचा वापर टाळला जातो
 •  कुट्टीद्वारे पाला मातीआड केला जातो
 •  गरजेएवढाच पाण्याचा व हिरवळीच्या खतांचा वापर

   मातीचा तलाव
निचरा प्रणाली तंत्राचा वापर केल्यानंतर शेतात निचरा होणारे पाणी ओढ्यात सोडण्याऐवजी केंद्रीय मत्स्य शिक्षण या संस्थेच्या सल्ल्यानुसार तलाव बांधून त्यात घेण्याचे ठरले. त्यात मागील वर्षापासून मत्स्यपालन सुरू केले. हे पाणी शेताला वर्षातून चार ते पाच वेळा वापरले जाते. मात्र त्याआधी पाण्याची तपासणी केली जाते.                                                      

 माती पृथक्करण अहवाल
 
 अ  ब
 आम्ल-विम्ल निर्देशांक (पीएच)  ८,२५  ८.२३
 एकूण विद्राव्य क्षार (ईसी)  ३.८५  ०.७७
 सेंद्रिय कर्ब (टक्के)  ०.९०  ०.८९
 स्फूरद  (किलो प्रति एकर  १.३५    ३.८४  
 पालाश (किलो प्रति एकर)   १४५.१०  ३०४. ६४
 मुक्त चुना (टक्के)            १.२५    १२. ०   १.२५  
 लोह (पीपीएम)  ५. ७०    १.९२  
 जस्त (पीपीएम)   ०.५१    १.९५
 मंगल (पीपीएम)  २.०६   ६.५६  
 तांबे (पीपीएम)   ७.८९   ५.२८  

अ.  तंत्र वापरापूर्वीची अाकडेवारी (सन २००९)
ब.  भूमिगत निचरा प्रणाली वापरानंतरची अाकडेवारी (सन २०१५)

संपर्क- अभिजीत पाटील- ८२७५५९२२९३

.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...