agricultural success story in marathi, khebwade dist. kolhapur, Agrowon, Maharashtra | Agrowon

देशी गाईंच्या संगोपनातून वाढविला नफा
राजकुमार चौगुले
रविवार, 25 मार्च 2018

देशी गायींचे चांगले व्यवस्थापन करून या गाईंच्या संगोपनाबाबत जनजागृतीचे काम खेबवडे (जि. कोल्हापूर) येथील अरुण पाटील करत आहेत.

देशी गायींचे चांगले व्यवस्थापन करून या गाईंच्या संगोपनाबाबत जनजागृतीचे काम खेबवडे (जि. कोल्हापूर) येथील अरुण पाटील करत आहेत.

पाटील यांनी १९९५ पासून गोपालनास सुरवात केली. त्यांनी पहिल्यांदा कोकणगिड्ड जातीची गाय आणली. त्यानंतर पुढे टप्याटप्याने गीर गाईंची संख्या वाढवत नेली. जादा दूध देणाऱ्या गायीची अपेक्षा न ठेवता शेती आणि आरोग्य संवर्धनाचा दृष्टिकोन समोर ठेऊन पाटील देशी गाईंचे संगोपन करतात. स्वतःच्या गोठ्यात त्यांनी जातीवंत दुधाळ गीर गाई तयार केल्या. सध्या गोठ्यात पाच गीर गाई, दोन गीर वळू, एक कॉंक्रेज गाय आणि दोन वासरे आहेत. या पैकी एक गीर गाय दहाव्या वेताची आहे. सध्या तीन गीर गाई दुधात आहेत. दोन गाई गाभण आहेत. सध्या दररोज २२ लिटर दूध संकलन होते. दूध विक्रीपेक्षा तूप विक्रीवर त्यांचा भर आहे. अरुण पाटील यांचा देशी गायींच्या व्यवस्थापनाचा चांगला अभ्यास आहे. देशी गायींपासून दुग्धोत्पादन, प्रक्रिया उत्पादने आणि त्याला बाजारपेठेत मिळणारा दर याचे गणित घालून ही गाय आर्थिकदृष्ट्या कशी फायदेशीर ठरू शकते, याबाबत शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात.  

गाईंचे व्यवस्थापन   

  • सकाळी चार वाजता गाय, गोठा स्वच्छता. प्रत्येक गायीस सकाळी आणि संध्याकाळी आठ किलो हिरवा चाऱ्याची कुट्टी. हिरव्या चाऱ्यात मका, कडवळ, नेपिअर, ऊस वाढ्याचा वापर. दोन किलो पेंड, भुश्‍याचा खुराक. गाईंना पुरेसे पाणी पाजले जाते.
  • प्रत्येक गायीला दररोज दुपारी चार लिटर ताक पाजले जाते. ताकामुळे गायींची पचनक्रिया सुधारते.
  • दर चार महिन्यांनी जंतनिर्मूलन. आरोग्य तपासणीवर भर.
  • शेण, घनजीवामृत शेतीमध्ये वापरले जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढत आहे.
  • ठराविक वेळेत गोमूत्र गोळा केले जाते. गोमूत्रापासून जीवामृतनिर्मिती. त्याचा शेतीमध्ये वापर केला जातो. गोमूत्र अर्क निर्मिती.

तूप विक्रीतून वाढविला नफा  
अलीकडे गोपालक फक्त दुधाच्या विक्रीसाठी देशी गायीचे पालन करतात. मात्र पाटील यांनी दुधाएेवजी तूप निर्मितीकरून त्याच्या विक्रीवर भर दिला आहे. सरासरी २७ लिटर दुधापासून एक किलो तूप तयार होते. सकाळ व संध्याकाळच्या धारा काढल्यानंतर चुलीवर दूध तापविले जाते. सायंकाळी विरजण लावले जाते. विरजण झाल्यानंतर यांत्रिक रवीद्वारे ताक घुसळून लोणी काढले जाते. प्रति किलोस २२०० रुपये या प्रमाणे तुपाची विक्री होते. ग्राहक घरी येऊन तूप घेऊन जातात. महिन्याला सुमारे ३५ किलो तूप तयार केले जाते. तूप विक्रीतून वीस टक्के नफा रहातो, असे पाटील सांगतात.

संपर्क : अरुण पाटील, ८२७५२६७९३५

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...