agricultural success story in marathi, kvk Karda, Washim | Agrowon

एकात्‍मिक शेती तंत्रज्ञानाचा करडा कृषी विज्ञान केंद्राचा प्रयोग
गोपाल हागे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

वाशीम जिल्ह्यातील करडा कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) काळाची पावले अोळखत एकात्मिक शेती या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यासाठी प्रात्यक्षिक स्वरूपात तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, यासाठी अडीच एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांसाठी प्रकल्प उभा केला आहे. त्यात उत्पादन व उत्पन्न वाढवणाऱ्या विविध घटकांचा समावेश करण्यात अाला अाहे. ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उत्पन्न करणारे व्यासपीठ म्हणूनही या प्रकल्पाककडे पाहता येते.
 
एकाच पिकावर अवलंबून न राहता विविध

वाशीम जिल्ह्यातील करडा कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) काळाची पावले अोळखत एकात्मिक शेती या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यासाठी प्रात्यक्षिक स्वरूपात तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, यासाठी अडीच एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांसाठी प्रकल्प उभा केला आहे. त्यात उत्पादन व उत्पन्न वाढवणाऱ्या विविध घटकांचा समावेश करण्यात अाला अाहे. ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उत्पन्न करणारे व्यासपीठ म्हणूनही या प्रकल्पाककडे पाहता येते.
 
एकाच पिकावर अवलंबून न राहता विविध
तंत्रज्ञानाचा मिलाफ करून शेतीतील जोखीम कमी करता येते. त्यातून उत्पन्नात वाढ होऊ शकते हा संदेश वाशिम येथील कृषी विज्ञान केंद्राने प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. त्यासाठी प्रक्षेत्रावर विविध व्यवसायांचे प्रकल्प उभे केले आहेत.   

केव्हीकेचे असे आहेत प्रकल्प
गांडूळ खतनिर्मिती
प्रकल्पात पशुधन म्हणून गाय, म्हैस व बकरी यांचे संगोपन हा महत्त्वाचा घटक समाविष्ट केलेला आढळतो. जनावरांपासून माेठ्या प्रमाणात शेण व लेंडीखत मिळते. त्याचे रूपांतर गांडूळ खतामध्ये करण्यासाठी युनिट उभे केले आहे. गांडूळांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणात गांडूळखत तयार होते.  वर्षाला साधारणतः ३० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल अशी संधी त्यातून मिळत आहे. शिवाय केंद्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना गांडूळ कल्चर व खत निर्मितीचे ‘मॉडेल’ पाहण्यास मिळते.  

व्हर्मीवॉश निर्मिती
गांडूळखत युनिटद्वारे गांडूळखत पाणी अर्थात ‘व्हर्मीवॉश’ही मिळते. ते बनविण्यासाठी विशिष्ट पद्धत तयार केली आहे. या घटकात नत्र, स्फुरद, पालाश यांच्यासह सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात अाहे. वर्षाकाठी सुमारे पाच हजार रुपयांपर्यंत उत्पन्न त्यातून मिळू शकते.

निंबोळी पावडर, दशपर्णी अर्क निर्मिती
येथे सेंद्रिय कीडनाशक युनिटही आहे. सुमारे दहा क्विंटल निंबोळ्या गोळा करून त्याची पावडर तयार केली जाते. वर्षाला सुमारे २० हजार रुपयांचे एकूण उत्पन्न त्यातून मिळते. दहा प्रकारच्या वनस्पतींच्या पानांचा वापर करून दशपर्णी अर्काची निर्मिती केली जाते. वर्षभरात त्यातून दहा हजार रुपयांचे उत्पन्न होते.

अॅझोला विक्री; चारानिर्मिती
दुधाळ जनावरांचे फॅट तसेच दूध वाढवण्यासाठी कॅल्शियमयुक्त अॅझोलाची निर्मिती केली जाते. या जनावरांच्या आहारात दररोज त्याचा वापर होतो. गरजेनुसार शेतकऱ्यांनाही त्याची विक्री होते. एका एकरावर विविध प्रकारचा चारा लावला अाहे. यात यशवंत, जयवंत, डीएचएन- ६ व मका आदींचा समावेश आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे चारा पिके घेणे शक्य होत नाही. मग मुरघास साठविण्यासाठी पाच क्विंटल क्षमतेच्या बॅगचा वापर करून जनावरांना पौष्टीक चारा पुरविण्यात येतो. हायड्रोपोनीक्स पध्दतीने चारा निर्मिती होते.

शोभिवंत मासे संगोपन
येथे प्लॅस्‍टिक टाक्यांचा वापर करून रंगीत अर्थात शोभिवंत माशांचे संगोपनही केले जाते. माशांची विक्रीही साधली जातेे. या माध्यमातून वर्षाला पाच हजारांपर्यंत उत्पन्न प्राप्ती होऊ लागली आहे.

तंत्रज्ञानाचा प्रसार
केंद्रातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी जिल्हाभर विस्तार कार्य केले जाते. कृषी विज्ञान केंद्राच्या मुख्यालयी अादर्श मॉडेल उभारण्यासाठी येथील तज्ज्ञ डाॅ. रवींद्र काळे, तुषार देशमुख, आर. एस. डवरे, डी. एन. इंगोले, डाॅ. डी. एल. रामटेके यांचे तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे. प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रमोद देशमुख यांनी संकल्पनेची उभारणी केली. ग्रामीण बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार मिळवून देणारे व्यासपीठ म्हणून या प्रकल्पाकडे पाहता येते.

संपकर् : डॉ. अार. एल. काळे, ७३५०२०५७४६
वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख
कृषी विज्ञान केंद्र, करडा जि. वाशीम

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...