agricultural success story in marathi, lonand Onion market, satara | Agrowon

कांद्यासाठी लोणंदचे मार्केट
विकास जाधव
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

राज्यामध्ये कांद्यासाठी नाशिक, लासलगाव या प्रसिद्ध बाजारपेठांनंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद बाजारपेठ प्रसिद्ध आहे. या बाजार समितीचा ई-नाम प्रकल्पात समावेश झाला आहे. येथे कांद्यासह शेळ्या- मेंढ्यासारख्या जनावरांचा बाजारही भरतो. लोणंद बाजार समितीत लक्षावधींची उलाढाल या दोन्ही बाजारांतून होत असते. रोख पट्टी हे येथील वैशिष्ट्य ठरले आहे.

राज्यामध्ये कांद्यासाठी नाशिक, लासलगाव या प्रसिद्ध बाजारपेठांनंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद बाजारपेठ प्रसिद्ध आहे. या बाजार समितीचा ई-नाम प्रकल्पात समावेश झाला आहे. येथे कांद्यासह शेळ्या- मेंढ्यासारख्या जनावरांचा बाजारही भरतो. लोणंद बाजार समितीत लक्षावधींची उलाढाल या दोन्ही बाजारांतून होत असते. रोख पट्टी हे येथील वैशिष्ट्य ठरले आहे.

राज्यात कांद्यासाठी प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक लोणंद बाजारपेठ आहे.
१९५२ मध्ये खंडाळा तालुक्यात लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. राज्यभरातून खरेदी विक्रीसाठी कांद्याची आवक होते. येथे सोमवारी कांदा, तर गुरुवारी जनावरांसह इतर बाजार भरतो. यातून लक्षावधी रुपयांची उलाढाल होते.

लोणंदाचा कांदा ही वेगळी ओळख
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव हे दुष्काळी तालुके आहेत. येथे खरिपात हळवा व रब्बी हंगामात गरवा कांदा मोठ्या प्रमाणात केला जातो. या प्रमुख तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांतून लोणंद बाजारसमितीत कांद्याची आवक होते.

 • खरिपातील हळवा कांदा ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात, तर रब्बीतील गरवा कांद्याची डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये आवक होत असते. या कांद्याचा रंग लालसर असल्याने या कांद्यास त्याच्या वाणावर न ओळखता "लोणंदाचा कांदा'' म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

बाजार समितीतील सुविधा

 • बाजारपेठेत कांदा खरेदीसाठी ५० परवानाधारक व्यापारी कार्यरत आहेत. कांदा ठेवण्यासाठी बंदिस्त १२ शेड उभारली आहेत. बंदिस्त शेडमुळे कांद्याचे जनावरांपासून नुकसान टाळले जाते.
 • ट्रकमध्ये कांदा भरून येत असल्याने एकाच वेळी वजन करण्यासाठी बाजार समितीकडून ५० टनी वजन काट्याची सोय केली आहे.
 • समितीने शेतकऱ्यांना फिल्टर बसवून पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय केली आहे.  समितीत कांदा तसेच धान्याची वाहतूक सुलभ व्हावी, यासाठी अंतर्गत सुसज्ज डांबरी रस्ते तयार केले आहेत.
 • शेतकऱ्याच्या कांदा उत्पादनात वाढ व्हावी, नवीन तंत्राची माहिती व्हावी यासाठी बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना सुगी पश्‍चात तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे पाठविले जाते.
 • सुसज्ज मंगल कार्यालय बांधले असून, शेतकऱ्यांच्या लग्नकार्यांसाठी ते सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाते.

दर गुरुवारी भरतो जनावरांचा बाजार
या बाजारसमितीत दर गुरुवारी शेळ्या-मेंढ्याचा आठवडी बाजार भरतो. जिल्ह्याती मोठ्या बाजारांपैकी हा बाजार आहे. येथे चार ते पाच हजार शेळ्या- मेंढ्या, तसेच १०० ते १५० जनावरांची आवक व खरेदी विक्री होते.

ई-नाम प्रकल्पात समावेश  
बाजार समित्यांमधील शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या पारंपरिक पद्धतींमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने शेतमाल खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय पातळीवर इलेक्‍ट्रॉनिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यास ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) असे संबोधले जाते. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांमधे लोणंद बाजार समितीचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत बाजार समितीतील परवानाधारक आडते, व्यापारी, खरेदीदारांना लॉगईन व पासवर्ड दिले आहेत. ई-नाम प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर सर्व व्यवहार त्याद्वारे करण्यात येणार आहेत. त्यामुळे आवक आणि दर याबाबत पारदर्शकता मिळू शकेल.

बाजारपेठेची वैशिष्ट्ये

 • बाजार समितीत कांद्याच्या लिलावाआधी वजन केले जाते.
 • शेतकऱ्यांना विक्रीनंतर रोख पट्टी दिली जाते.
 • बाजार समितीत ५५ वर खरेदीदार व्यापारी.
 • शुद्ध पाणी व विजेची २४ तास सुविधा
 • बाजारसमितीत ५० टनी वजन काटा उपलब्ध
 • वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते व व्यापाऱ्यांसाठी प्रशस्त शेड
 • ई-नाम प्रकल्पात समावेश होऊन प्राथमिक स्वरूपात खरेदीस प्रारंभ
 • या बाजार समितीतील कांद्याची परराज्यासह परदेशात निर्यात

केंद्र शासनाच्या ई-नाम प्रकल्पामध्ये आमच्या बाजार समितीचा समावेश झाला आहे. त्यामुळे कांद्यास चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे. विधान परिषद रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक दत्तानाना धमाळ, जिल्हा परिषद कृषी सभापती मनोज पवार तसेच सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे व्यवस्थापन सुरू आहे.
अनंत तांबे, सभापती, लोणंद बाजार समिती

१५ एकर क्षेत्रात समितीचा परिसर असून, ५० ते ५५ व्यापाऱ्यांकडून कांद्याचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. बाजार समितीत सोमवारी कांद्याचा व गुरुवारी इतर अन्नधान्य व जनावरांचा बाजार भरतो. यासाठी खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्याचा प्रयत्न समिती करत आहे.
विठ्ठल सपकाळ, सचिव, ( - ९५६१८०८८०५)

या बाजार समितीत वडिलापासून आमचा कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते. सध्या कांद्यास चांगले दर मिळत असून, शेतकऱ्यांकडून येणाऱ्या कांद्याला रोख रक्कम अदा केली जाते.
मनसुखलाल शहा, कांदा व्यापारी.

रुई हे गाव दुष्काळी भागात येते. कांदा हे पीक कमी पाण्यावर चांगल्या प्रकारे उत्पन्न देत असल्याने आमचे प्रमुख पीक आहे. या वर्षी साडे तीन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड होती. सध्या कांद्यास क्विंटलला ३००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. असा समाधानकारक दर असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नितीन होळकर, कांदा उत्पादक शेतकरी, रुई, जि. सातारा.

            बाजार समितीतील कांद्याची आवक  (क्विंटल) आणि दर (रुपये)

महिना         आवक    किमान     कमाल    सरासरी
नोव्हेंबर-डिसेंबर (२०१६) - - - -
नोव्हेंबर   २०,६२८     ३००     १३००     ९५०
डिसेंबर    ३०,४८९     २००     ११६५    ८५०
नोव्हेंबर-डिसेंबर (२०१७) - - - -
नोव्हेंबर     ६,१९९    ८००     ४,४१५     २,७००
डिसेंबर     ४,६५५     ८००     ३,६००     २,५००

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...