फळबागकेंद्रित नफ्याची शेती

पारंपरिक पिकांना वळण देत केशर आंबा, डाळिंब, सीताफळ अशी फळबागकेंद्रित शेती मुखई (जि. पुणे) येथील धनंजय नेताजी शुक्रे यांनी निवडली. आधुनिक सुविधांसह शेती करताना आपला आंबा व्यापाऱ्यांना न देता ग्राहकांचे नेटवर्क तयार करून पर्यायी बाजारपेठ तयार केली. विचार आधुनिकतेचे जोपासले की त्याचे प्रतिबिंब शेतीत उमटायला वेळ लागत नाही हेच शुक्रे यांनी सिद्ध केले आहे.
केशर आंब्याच्या बागेत धनंजय शुक्रे, मुलगी अक्षरा, आई सौ. भाग्यश्री व वडील नेताजी.
केशर आंब्याच्या बागेत धनंजय शुक्रे, मुलगी अक्षरा, आई सौ. भाग्यश्री व वडील नेताजी.

पारंपरिक पिकांना वळण देत केशर आंबा, डाळिंब, सीताफळ अशी फळबागकेंद्रित शेती मुखई (जि. पुणे) येथील धनंजय नेताजी शुक्रे यांनी निवडली. आधुनिक सुविधांसह शेती करताना आपला आंबा व्यापाऱ्यांना न देता ग्राहकांचे नेटवर्क तयार करून पर्यायी बाजारपेठ तयार केली. विचार आधुनिकतेचे जोपासले की त्याचे प्रतिबिंब शेतीत उमटायला वेळ लागत नाही हेच शुक्रे यांनी सिद्ध केले आहे. गावाची पार्श्वभूमी पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडील काही भाग बऱ्यापैकी बागायती म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे मुखई हे छोटेसे गाव आहे. गावपरिसरातून चासकमान धरणाचा कॅनाल गेल्यामुळे येथील भागात पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करणे शक्य झाले आहे. येथील जमीन खडकाळ आहे. पूर्वी ज्वारी, बाजरी अशा पिकांची जागा आता उसाने घेतले आहे. अलिकडील वर्षांपासून येथील शेतकरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून फळबागा, पाॅलिहाऊस, दुग्ध व्यवसाय याकडे वळला आहे.

शुक्रे यांची आधुनिक वळणाची शेती पुणे शहरातील हडपसर या उपनगरात राहणारे धनंजय नेताजी शुक्रे यांची गावात सुमारे १३ एकर शेती आहे. सोमवार ते शुक्रवार ते शेतातील घरी राहून शेती व्यवस्थापन पाहतात. त्यांचे वडील शिक्षक होते.त्यामुळे शेती कसण्यास दिली जायची. या खडकाळ जमिनीत पारंपरिक हंगामी पिके घेतली जायची.धनंजय यांनी शेतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर वडिलांच्या सल्ल्याने फळबाग केंद्रित शेती करायचे ठरवले.यात आंबा लागवडीस प्राधान्य दिले. धनंजय यांनी आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून ट्रान्सपोर्ट व्यवसायही सांभाळतात.

आंबा लागवड :

  • खडकाळ जमीन असल्याने कृषी विभागाच्या फळबाग लागवडींतर्गत केशर आंब्याची लागवड.
  • दापोली येथील कृषी विद्यापीठातून रोपे आणली. ३३ बाय ३३ फूट अंतरावर २००८ मध्ये लागवड.
  • एकूण दीड एकरात लागवड.
  • रोपांची व्यवस्थित निगा राखत, शेणखताचा वापर करीत चांगली बाग फुलवली.
  • साधारण २०१२ पासून फळांचे प्रमाण वाढत केले. यंदा झाडे डौलदार असून आंबे लगडले आहेत.
  • ठिबकद्वारे पाणी. एक विहीर, एक बोअरवेल. उन्हाळ्यात पाणीटंचाईत छोट्या शेततळ्याची सुविधा.
  • थेट विक्रीतून सोडवली समस्या

  • आंब्याचे उत्पादन तर दर्जेदार मिळू लागले. पण पुणे बाजारात विक्रीचा प्रश्न उभा राहिला. व्यापारी अत्यंत कमी दराने माल मागू लागले. पहिली दोन वर्षे त्या दराने विक्री केली देखील. पण नफ्याचे गणीत जमेना.
  • मग हडपसर भागातील पाहुणे-रावळे, हितचिंतक यांना आंबा देण्यास सुरवात केली.
  • एका घरात आंबा दिला की चार घरांतून आॅर्डर येऊ लागली. विक्रीचा प्रश्न निकालात निघाला.
  • पुढे पुढे ग्राहकांची आॅर्डर पूर्ण करायला आंबाच शिल्लक नसायचा.
  • आज ७० ते ८० ग्राहकांचे निश्चित नेटवर्क तयार झाले अाहे. येत्या काळात ते वाढत आहे.
  • उत्पादन

  • प्रति झाड- ८० ते १२० किलो
  • दर- ६० ते ८० रुपये प्रति किलो
  • डाळिंबाची मोठी साथ

  • सन २०१४ मध्ये डाळिंबाची दोन एकरांत लागवड. सुमारे साडेसातशे झाडे.
  • आत्तापर्यंत दोन वेळा उत्पादन घेतले. पुणे, मुंबई येथे व्यापाऱ्यांना तर काही वेळेस थेट ग्राहकांना
  • विक्री

  • एकरी सात ते १४ टनांपर्यंत उत्पादन.
  • फळाचे वजन साडेचारशे ग्रॅमपासून साडेसहाशे ग्रॅमपर्यंत. दर्जा उत्तम. त्यामुळे गेल्या वर्षी ४० ते ११० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला.
  • सीताफळाची नवी बाग आता तिसरे फळ म्हणून गेल्या वर्षी जूनमध्ये एक एकरात सीताफळाची लागवड केली आहे. गोल्डन एनएमके या नव्या वाणाची निवड केली आहे. दहा बाय तेरा फूट अंतरावर लागवड केलेली रोपे सध्या वाढीच्या अवस्थेत असून साधारण तिसऱ्या ते चौथ्या वर्षांपासून चांगले उत्पादन देण्यास सुरवात करतील.

    पूरक व्यवसायातून हातभार

    मुक्त संचार पद्धतीने गोसंगोपन दीड वर्षांपूर्वी गोसंगोपनास सुरवात केली आहे. त्यासाठी मुक्तसंचार पद्धतीचा कमी खर्चिक गोठा बांधला आहे. सध्या दहा कालवडी आहेत. गावपरिसातून कालवडी आणून त्यांचे संगोपन करायचे. त्या गाभण झाल्यानंतर विक्री करायची. साधारण पाच ते दहा गायींची विक्री झाली तरी उत्पन्नाला मोठा हातभार लागेल असे धनंजय यांना वाटते. पाण्याच्या सुविधेसाठी लोखंडी टाकीची सुविधा आहे. चारा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले आहे. आगामी काळात कृषी पर्यटन सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. पोल्ट्री शेतीला आधार असावा म्हणून दोन महिन्यांपूर्वी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. त्यासाठी शेतात ३० बाय १५ फूट अंतराचे बांबूचे कमी खर्चिक शेड बांधले आहे. त्यात पाथर्डी येथून देशी कोंबडीची एक हजार पिल्ले आणली आहेत.

         मागील तीन वर्षांचे आंबा उत्पादन (दीड एकरातील)

    वर्ष उत्पादन (टन)
    २०१५
    २०१६ ३.५
    २०१७
    २०१८ ४ (अंदाजीत)

    धनंजय शुक्रे- ८५६८५१००८, ८६६८९८७०७२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com