पोल्ट्री व्यवसायात काटेकोर व्यवस्थापन महत्त्वाचे

पोल्ट्री व्यवसायात काटेकोर व्यवस्थापन महत्त्वाचे
पोल्ट्री व्यवसायात काटेकोर व्यवस्थापन महत्त्वाचे

मुंगसरा (ता. जि. नाशिक) येथील दीपक भोर हे गेल्या २२ वर्षांपासून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायात आहेत. वर्ष १९९५ मध्ये १०० पक्ष्यांपासून सुरवात केलेल्या भोर यांनी टप्प्याटप्प्याने व्यवसायात वाढ केली. आजमितीला त्यांच्याकडे ५ शेड आणि ५१ हजार पक्षी आहेत. खासगी कंपनीसोबत २००० पासून करार पद्धतीने व्यवसाय करतात. त्यांच्या नियोजनातील महत्त्वाच्या बाबी...

  • पोल्ट्रीतील नियोजनामध्ये बायोसिक्‍युरिटी (जैव सुरक्षा) अत्यंत महत्त्वाची असून, त्यापाठोपाठ  खाद्य आणि पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, वेळेचे व्यवस्थापन या महत्त्वाच्या बाबी आहेत.
  • पिले येण्यापूर्वी शेडचे संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जाते. पिले घेऊन येणाऱ्या गाडीवर जंतुनाशकाची फवारणी करूनच ती शेडजवळच आणली जाते. शेडमध्ये सर्वकाळ कार्यरत व्यक्तींव्यतिरिक्त अन्य व्यक्ती किंवा गाड्या आतमध्ये घेण्यापूर्वी निर्जंतुक केल्या जातात. त्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. ब्रुडिंग पीरियडमध्ये पक्षी शून्य दिवसाचा असतो. यावेळी त्याचे वजन ४० ते ४५ ग्रॅम असते. त्याला आवश्यक ते ३५ अंश सेल्सिअस तापमान ठेवले जाते. वातावरणातील बदलानुसार तापमानात बदल केला जातो. सुरवातीचा १ ते १६ दिवस हा 'ब्रुडिंग पीरियड' असतो. यावेळेस पक्ष्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते.
  • गुणवत्तापूर्वक खाद्य :  सुरवातीला १२ दिवसांपर्यंत प्री स्टार्टर खाद्य दिले जाते. त्यानंतर १२ ते २१ दिवसांपर्यंत स्टार्टर, त्यानंतर फिनिशर दिले जाते. प्रत्येक पक्ष्याला त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार ताजे व उत्तम दर्जाचे खाद्य मिळाले पाहिजे याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. शेडमधील लीटर किंवा तूस कोरडे राहील याकडे लक्ष दिले जाते. २०११ पासून खाद्य आणि पाणी व्यवस्थापन हे पूर्णत: स्वयंचलित केले आहे. स्वयंचलित फिडिंग (खाद्य) आणि नेपल (पाणी) सिस्टिम ही स्वयंचलित असल्याने वेळ आणि मजुरी यात बचत झाली आहे.
  • पाणी नियोजन : पक्ष्यांना शुद्धीकरण केलेले पाणी दिले जाते.
  • लसीकरण : शंभर टक्के उत्पादन मिळवण्यासाठी लसीकरण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. हॅचरीमध्ये पहिल्याच दिवशी मॅरेक्‍स ही लस दिलेली असते. त्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी लासोटा ही लस डोळ्यातून दिली जाते. त्यामुळे राणीखेत आजार होत नाही. त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी गंबोरा ही लस डोळ्यातूनच दिली जाते. संसर्गजन्य किंवा इतर आजार होऊ नये म्हणून या लसी महत्त्वाच्या असतात. तसेच गरज पडल्यास २१ ते २२ व्या दिवशी लासोटा बुस्टर लस दिली जाते. अशा प्रकारे विविध लसी देऊन पक्ष्यांची रोगप्रतिकारक्षमता वाढविली जाते.
  • वजन वाढीसाठी : पक्ष्यांचे ठराविक वेळेत अपेक्षित वजन मिळविण्यासाठी काटेकोरपणा आवश्यक असतो. प्रत्येक आठवड्याला पक्ष्यांचे वजन घेऊन वाढ तपासली जाते. आठवड्यातील वजनाच्या अहवालानुसार व्यवस्थापनात बदल केला जातो. आजारी व कमजोर पक्षी वेगळे काढून त्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. त्यासाठी ठराविक औषधे महत्त्वाची ठरतात. पक्ष्यांच्या हालचालींवरती बारीक लक्ष दिले जाते.
  • बहुतांश कामे (८० टक्के) ही स्वत: किंवा कुटुंबीयांद्वारे केली जातात. केवळ पक्षी लोडिंग आणि खत उचलणे या (२० टक्के) कामांसाठी मजूर वापरले जातात.  
  • शेडअंतर्गत आणि बाहेर एलईडी बल्ब वापरले आहेत. यामुळे विजेची बचत होते व खर्चातही बचत होते. एका पक्ष्यामागे लसीकरण, औषधे, मेंटेनन्स, मजुरी आदीचा खर्च हा जवळपास ३ रुपये येतो. करार पद्धतीच्या पोल्ट्रीत पक्ष्यामागे जवळपास १० रुपये उत्पन्न मिळते. 
  • संपर्क : दीपक भोर, ९९२२९०७७५९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com