agricultural success story in marathi, nimon dist. nashik, Agrowon, Maharashtra | Agrowon

पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचे
ज्ञानेश उगले
शुक्रवार, 25 मे 2018

अशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात मजूरटंचाई, भांडवलाची कमी उपलब्धता व पावसाच्या लहरीपणामुळे पाणी टंचाई आदी समस्यांचा दरवर्षी सामना करावा लागत होता. अखेर त्यांनी यांत्रिकीकरण ,मजुरांचा आवश्‍यकतेनूसार वापर व पिकनियोजन यांचा समन्वय साधून या समस्यांवर मात केली.

अशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात मजूरटंचाई, भांडवलाची कमी उपलब्धता व पावसाच्या लहरीपणामुळे पाणी टंचाई आदी समस्यांचा दरवर्षी सामना करावा लागत होता. अखेर त्यांनी यांत्रिकीकरण ,मजुरांचा आवश्‍यकतेनूसार वापर व पिकनियोजन यांचा समन्वय साधून या समस्यांवर मात केली.

जाणवणाऱ्या समस्या
दर वर्षी खरीप हंगामात मजूरटंचाई ही मुख्य समस्या बनत आहे. पाणीटंचाई, पाऊस वेळेवर न पडणे, भांडवलाची योग्य वेळी उपलब्धता या समस्या तर आहेतच. त्याचप्रमाणे रासायनिक खते व कीडनाशकांवरील खर्चात दर वर्षी वाढ होत आहे. भांडवलासाठी बहुतांश वेळी सहकारी संस्था व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पुरेसे कर्ज उपलब्ध होत नाही. खासगी सावकाराकडून पैसे घेऊन भांडवल उभे करावे लागते.

खरिपातील कामाचे नियोजन  
खरिपामध्ये कांदे, टोमॅटो, मूग, बाजरी यांसह हंगामी भाजीपाला पिकांचे नियोजन असते. उन्हाळ्यात पूर्ण शेताची नांगरणी करून, मे महिन्यात एकरी ४ ट्रॅक्टर शेणखत टाकून घेतो. आमच्याकडे २ ट्रॅक्‍टर आहेत. त्यापैकी ४५ हॉर्सपॉवर व दुसरा २५ हॉर्सपॉवर क्षमतेचा आहे. मशागत आणि फवारणी या साह्याने केली जाते. शेणखत मजुरांच्या साह्याने पसरून, रोटाव्हेटरने पुन्हा मशागत केली जाते. पाऊस पडण्यापूर्वी ट्रॅक्‍टरच्या फणाने मशागत केली जाते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दीड एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी गादीवाफे करून त्यावर मल्चिंग पेपर व इन लाइन ठिबक याचा वापर करतो. टोमॅटोची लागवड, बांधणी, खते देणे, विद्राव्य खते, पीक संरक्षण या सगळ्यांसाठी मजूर मोठ्या प्रमाणावर लागतात. टोमॅटो लागवड झाल्यानंतर १ महिन्याने १ एकर क्षेत्रावर फ्लॉवर लागवड करण्याचे नियोजन आहे.

  • पेरणीयोग्य पाऊस झाला, तर बाजरी, मूग आणि भुईमूग याची पेरणी केली जाते. मूग काढल्यानंतर त्याच क्षेत्रात कांदा लागवड होते. बाजरी ही मजुरांसाठी आणि घरातील अन्नासाठीच केली जाते. भुईमूग ही घरगुती गरजेपुरता करतो.  
  • १५ ते २५ जूनदरम्यान कांदा रोपेवाटिका तयार केली जाते. त्यासाठी बियाणे हे स्वत: विकसित केलेले असते. रोप तयार होत असतानाच्या काळात कांदा लागवडीचे क्षेत्राची मशागत व शेणखत टाकणे आदी पूर्ण कामे केली जातात. १५ ते २५ ऑगस्टदरम्यान २ ते ३ एकरांवर गादी वाफे तयार करून इन लाइन ठिबकच्या मदतीने लागवड होते. २ ते ३ एकरावर पारंपरिक पद्धतीने लागवड होते. भविष्यात पूर्ण क्षेत्र इनलाइन ठिबक लागवडीचे नियोजन आहे. त्यातून पाण्याची बचत होते. पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
  • हंगामाचे नियोजन वेळेपूर्वी करण्यावर भर दिला जातो. सर्वांत अगोदर मशागतीची कामे व्यवस्थितरीत्या पूर्ण करून घेतो. ज्या क्षेत्रात कांदा, टोमॅटो व इतर भाजीपाला पिके घ्यावयाची असतात. त्या क्षेत्रात भरपूर शेणखत टाकले जाते. शेणखत टाकल्यानंतर पुन्हा मशागत केली जाते.
  • बाजरी, मका, कडधान्ये आदी पिकांची पेरणी ही पेरणीयंत्राने केली जाते. कांदा व भाजीपाला पिकांसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे कल असतो. त्यात गादीवाफ्यावर लागवड, ठिबक सिंचन यांसह कीडनाशकांच्या फवारणीसाठी ब्लोअर तंत्रज्ञानावर आधा.िरत फवारणी यंत्राचा वापर करतो.
  • आमच्या भागात उन्हाळ्यात पाण्याची मोठी कमतरता भासते. त्यावर मात करण्यासाठी शेततळ्याची उभारणी केली आहे.   
  • खर्च : पिकांच्या संपूर्ण कालावधीसाठी खालीलप्रमाणे खर्च होतो. त्याचे नियोजन सुरवातीपासूनच करण्याचा प्रयत्न असतो.  
  • कांद्याला एकरी ५५ ते ६० हजार रुपये काढणीपर्यंतचा खर्च येतो.
  • टोमॅटोला एकरी १ लाख ६५ हजारांपर्यंत खर्च. मात्र बाजारात चढ-उतार असते.
  • बाजरी, भुईमूग या शेतमालाची विक्री न करता घरासाठीच वापरले जाते.
  • मुगाचा हिरवळीचे खत म्हणून वापर होतो.

संपर्क : अशोक राघो बारहाते, ७५८८०३७६६४

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...