agricultural success story in marathi, patas dist. pune , Agrowon, Maharashtra | Agrowon

सुधारित तंत्र, शिकाऊ वृत्तीतून ऊस उत्पादनवाढ
संदीप नवले
शनिवार, 9 जून 2018

प्रमुख प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत पुणे जिल्ह्यातील पाटस येथील संदीप घोले यांनी ऊसशेती विकसित केली आहे. एकरी ५० ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळणारे उत्पादन त्यातूनच १०० टनांपर्यंत पोचवले आहे. तंत्रज्ञानाची विविध सूत्रे वापरत कमी खर्चात शेती करताना अन्य शेतकऱ्यांचेदेखील घोले मार्गदर्शक झाले आहेत.

प्रमुख प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत पुणे जिल्ह्यातील पाटस येथील संदीप घोले यांनी ऊसशेती विकसित केली आहे. एकरी ५० ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळणारे उत्पादन त्यातूनच १०० टनांपर्यंत पोचवले आहे. तंत्रज्ञानाची विविध सूत्रे वापरत कमी खर्चात शेती करताना अन्य शेतकऱ्यांचेदेखील घोले मार्गदर्शक झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील खडकवासला धरणाच्या कॅनालचा फायदा मिळत असल्याने परिसर बागायती आहे. त्यामुळे येथील अनेक शेतकरी ऊसपीक घेतात. तालुक्यातील पाटस येथील संदीप विश्राम घोले सुधारित तंत्राचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवत आहेत. मात्र ते करताना उत्पादन खर्च कमी करण्याचेही उद्दीष्ट त्यांनी ठेवले आहे.

घोले यांची ऊसशेती

 • शेती- १२ एकर. ऊस, कांदा, गहू, हरभरा ही मुख्य पिके
 • ऊस- पाच एकर, कांदा- तीन ते चार एकर कांदा

तज्ज्ञ शेतकऱ्यांचे मार्गदर्शन
पूर्वी पाटपाण्यावर व पारंपरिक पद्धतीवर अवलंबून असलेल्या ऊसशेतीतून घोले यांना एकरी ५० ते ६० टन उत्पादन मिळायचे. मात्र मानोरी (ता. राहुरी) येथील डाॅ. दत्तात्रय वने व आष्टा (जि. सांगली) येथील संजीव माने सांगली या राज्यातील तज्ज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यास त्यांनी सुरवात केली. त्यांच्याकडून पिकाच्या प्रत्येक टप्प्यातील बारकावे, वेळापत्रक, तंत्र समजून घेतले. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांनाही भेट देत उसशेतीतील ‘होमवर्क’ पक्के केले.
 
घोले यांची आजची सुधारित ऊसशेती

 • हंगाम- आडसाली, ऊस- को ८६०३२

उत्पादनाचा जमीन हाच पाया

 • जमीन सजीव व सक्षम असेल तरच एकरी १०० टनाचे उद्दीष्ट गाठता येते. त्यासाठी एकरी चार ट्रेलर उत्तम प्रतिचे शेणखत दर तीन वर्षांनी किवा कारखान्याचे कंपोष्ट खत दरवर्षी १० ते १५ टन
 • मोकळ्या शेतात ताग या हिरवळीच्या पिकाचा वापर. सोयाबीनचादेखील तसाच वापर

शुद्ध व प्रमाणित बेणे 

 • कृषी विद्यापीठांकडून शिफारस वाणांची निवड. तसेच नजिकच्या साखर कारखान्यांनी ठरविलेल्या ध्येय धोरणानुसारच वाण निवडतात.
 • स्वतः बेणेमळा तयार करतात. भेसळविरहीत, ९  ते ११ महिन्यांच्या बेण्याचा वापर
 • रसरशीत, लांब, जाड, डोळ्यांची वाढ चांगली झालेले बेणे घेतात.

 
बेणेप्रक्रियेसाठी खड्डा पद्धत 

 • तीन बाय २ मीटर रुंद व अर्धा फूट खोल आकाराचा खड्डा तयार केला जातो. त्यात एक हजार लिटरच्या आसपास पाणी बसेल असे नियोजन. म्हणजे एक डोळ्याच्या ४०० तर दोन डोळ्यांच्या २०० टिपऱ्या बसू शकतात.
 • क्लोरपायरीफॉस व कार्बेन्डाडिम यांची प्रक्रिया. त्यामुळे बेणे कीड-रोगमुक्त होते.
 • त्यानंतर जीवाणूखतांची (उदा. अझोटोबॅक्टर, पीएसबी, अॅसिटोबॅक्टर) यांची प्रक्रिया
 • साडेचार बाय दोन फुटांवर लागवड

 
पाणी

 • ठिबक सिंचन व रेनगन असे दोन्ही पर्याय.  
 • रेनगनमुळे पाणी एकसारख्या प्रमाणात मिळते. उसाला हवे असलेले सूक्ष्म वातावरण मिळते.
 • रेनगन बांधाच्या कडेला लावून अर्ध गोलाकार चालवली जाते. जेणे करून कडेकोपरे व्यवस्थित भिजतात .

जमीन केली सुपीक  
घोले म्हणाले, की दर तीन वर्षांनी माती परीक्षण करतो. सेंद्रिय घटकांचे नियोजन चांगल्या प्रकारे करताना मध्यम जमिनीत खतांचा काळजीपूर्वक वापर करतो. उत्पादन खर्च शक्य तेवढा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. खोडवा शक्यतो घेत नाही. गुजरात, विशाखापट्टणम आदी भागांतील शेतकऱ्यांनी माझ्या शेताला भेट देत प्रयोग समजावून घेतले आहेत.

व्हॉटसॲप ग्रुपद्वारे ज्ञानवृद्धी
संजीव माने यांच्या व्हॉटस ॲप ग्रुपद्वारे मी ज्ञान घेतो अाहेच. शिवाय स्वतःचाही ग्रूप तयार करून अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यात सामील करून घेतले आहे. अन्य शेतकऱ्यांचेही एकरी उत्पादन आपल्याप्रमाणे वाढावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे घोले म्हणाले.  

उत्पादन

वर्ष             उत्पादन (टन प्रति एकर)
२०१३      ९२
२०१४ ९६
२०१५ १०९
२०१६       दुष्काळामुळे उत्पादन घेता आले नाही.
२०१७          १०२
कमाल उत्पादन      सन २०१० मध्ये फुले २६५ उसाचे
    एकरी १२६ टन  

अन्य व्यवस्थापन

 • लागवडीपूर्वी सरीमध्ये बेसल डोस म्हणून डीएपी, गंधक, बोरॉन, मॅग्नेशिअम सल्फेट, ह्युमीक अॅसिड यांचा एकत्रित वापर. काही सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतात सहा दिवस मुरवून मग वापरली जातात.  लागवडीपासून वीस दिवसांनी युरिया. चाळीस दिवसांनी पुन्हा दुसरा हप्ता.
 • अडीच ते तीन महिन्यांनी तिसरा हप्ता.  
 • तणनाशक फवारून तणनियंत्रण   
 • जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ लक्षणीय दिसून आली.
 • आॅक्झीन्स, जिबरेलिन्स, सायटोकायनिन्स आदी वाढ संजीवकांचा वापर फवारणीद्वारे
 • बेणे रुजविणे, कोंब फुटणे, पालवी येणे, मुळे सुटणे, फुटवे येणे, कांडयांची संख्या वाढवणे, लांबी व जाडी वाढवणे या घटना संजीवकांच्या विशिष्ट संतुलनामुळे घडतात. ते चांगले असेल तर दिलेल्या खतांचे, पाण्याचे चांगले शोषण होते.
 • प्रकाशसंश्लेषण क्रिया व्यवस्थित घडते. फुटव्यांची मर कमी होते .
 • गाळपयोग्य उसांची संख्या ४० ते ४५ हजारांपर्यंत ठेवली जाते.
 • एकरी ५० बॅग्स प्रमाणात कोंबडी खताचाही वापर केला.  
 • उसानंतर कांदा. त्याचे एकरी १८ ते २० टनांपर्यंत उत्पादन.   

संपर्क : संदीप घोले, ९६०४७०९७५१

 
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...