agricultural success story in marathi, Rahu, tal. daund, dist. pune | Agrowon

नवलेंचा ब्रॅंडेड गूळ
राधिका म्हेत्रे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

गुऱ्हाळाचे आगर असलेल्या राहू (जि. पुणे) येथे नवले कुटुंबाचाही वर्षभर गूळनिर्मिती हा पारंपरिक व्यवसाय. कुटुंबातील नव्या पिढीचे संदीप नवले यांनी आज या गुळाला थेट मार्केट मिळवलेच. आता परदेशात निर्यातीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध पॅकिंगमधून दर्जेदार गूळ विकताना काकवी, गूळपावडर आदी पदार्थांसाठीही त्यांनी मार्केट काबीज केले आहे.

गुऱ्हाळाचे आगर असलेल्या राहू (जि. पुणे) येथे नवले कुटुंबाचाही वर्षभर गूळनिर्मिती हा पारंपरिक व्यवसाय. कुटुंबातील नव्या पिढीचे संदीप नवले यांनी आज या गुळाला थेट मार्केट मिळवलेच. आता परदेशात निर्यातीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध पॅकिंगमधून दर्जेदार गूळ विकताना काकवी, गूळपावडर आदी पदार्थांसाठीही त्यांनी मार्केट काबीज केले आहे.

पुणे जिल्ह्यात इंद्रायणी अाणि मुळा-मुठा नदीच्या मध्यभागी दाैंड तालुक्यातील राहू, वाळकी, देवकरवाडी, कोरेगाव, कोरेगाव मांडे, डुबेवाडी, पाठेठाण, टाकळी आदी गावे अाहेत. दोन नद्यांनी वेढलेली असल्याने या गावसमूहाला बेट म्हणतात. या भागात पाण्याचे चांगले स्राेत उपलब्ध असल्याने ऊस, भाजीपाला ही पिके प्रामुख्याने दिसून येतात.

गुऱ्हाळाचा प्रदेश
मुख्यत्वे ऊसपट्टा आणि त्यातही हा गुऱ्हाळाचा प्रदेश म्हणून अोळखला जातो. यवतपासून सुमारे दहा किलोमीटरवर राहू येथे संदीप नवले कुटुंबाचे गुऱ्हाळघर आहे. पुण्याला जेव्हा बैलगाडीने गुळाची वाहतूक केली जायची, त्या काळापासून त्यांच्याकडे वर्षभर गूळनिर्मिती होते. संदीप यांचे मोठे बंधू दामोदर शेती, तर संदीप १७ वर्षांपासून गूळनिर्मिती ते मार्केटिंगपर्यंतची जबाबदारी पाहतात.

नवले यांची गूळनिर्मिती

 • एकूण शेती - २५ एकर - सर्व ऊस
 • गुऱ्हाळ - चोवीस तास व वर्षभर
 • एक टन ऊस - ११० किलो गूळनिर्मिती
 • दररोज ५० टन रसापासून - सुमारे ५५०० किलो गूळनिर्मिती
 • (शिवारात सर्वांत जास्त गूळनिर्मिती आपल्याकडे होत असल्याचा संदीप यांचा अंदाज)
 • बगॅस- १५ टन. वाळवून ज्वलनासाठी वापर. त्यामुळे इंधनात बचत.
 • क्रशर बिघडल्यास गुऱ्हाळ थांबू नये म्हणून दोन क्रशर अाणि जनरेटरची सोय
 • गुऱ्हाळातील रोजगार - दररोज २५ मजुरांना. दोन गुळवे.
 • मजुरांची शेतातच राहण्याची सोय

गुळाचा ब्रॅंड

 • प्रतिभा गोल्ड - पॅकिंग - एक, १० किलो
 • किलोचा दर - ४० रुपये. (पॅकिंगनुसार त्यात बदल)
 • अन्य उत्पादने - काकवी - ५० रुपये प्रतिलिटर दर, गूळ पावडर

ब्रॅंडचे महत्त्व

उत्कृष्ट दर्जा व त्याचा ब्रँड तयार केल्यास ग्राहकांमध्ये विश्वास तयार होतो व चांगल्या दराने उत्पादनाची विक्री करता येते. हे महत्त्व पटल्यानेच ब्रॅंड नेम व मैत्री ॲग्रो फूड्स कंपनीची स्थापना संदीप यांनी केली. या कंपनीमार्फत काजू, बदाम, अक्रोड, केशर कश्मीर आदींच्याही विक्रीचा उद्देश आहे.

सध्याचे मार्केट

 • पुणे गुलटेकडी
 • विविध दुकानदार-
 • गुजरातमधील व्यापारी
 • यंदा तमिळनाडूला गूळ पाठवला.
 • डिसेंबर- जानेवारी अाणि संक्रांतीच्या वेळी चिक्कीच्या गुळाला जास्त मागणी.
 • त्यास ३७ रुपये प्रतिकिलो दर. लोणावळ्यालाही चिक्कीसाठी या गुळाची विक्री
 • अाैषधे, ग्लुकोजनिर्मितीसाठी गुळाच्या पावडरीला मागणी. संदीप यांच्य मित्राकडे विक्रीची जबाबदारी. पावडरीचा दर- ५० रुपये प्रतिकिलो
 • लहान मुलांसाठी ‘रेडी टू इट’ पदार्थ म्हणून १५ ग्रॅम वजनाच्या ट्यूब पॅकिंगमधून गुळाची विक्री. त्यास किलोला ७० रुपये दर.
 • काही वेळा गुळाचे दर अत्यंत खाली घसरतात. व्यापारी कमी दराने खरेदी करून पुढे जास्त किमतीला विकतो; मात्र उत्पादनात सातत्य व विक्रीचे स्रोत वाढवून उद्योगाचे अर्थकारण वाढवले.
 • सुपरमार्केट्स व या क्षेत्रातील स्वदेशी कंपनीला गुळाची विक्री करण्याचे प्रयत्न

अाखाती देश, कॅनडाचे टार्गेट

संदीप यांनी इस्राईलचा दौरा करत खरेदीदार अाणि मॉल्सना भेटी दिल्या. तेथे किलोला ५०० रुपये दराने गूळ विकला जातो, असे लक्षात आले. आता कॅनडा, आखाती देशात जाऊन तेथील मार्केट अभ्यासणार अाहेत. ही मार्केट्स काबीज करण्याचा त्यांचा इरादा आहे. इस्राईलमधील समूहशेतीची प्रेरणा घेऊन ते गावातील पुरुष बचत गटाचे सदस्य झाले अाहेत.

ऊस शेतीचे नियोजन

पाऊस कमी झाला तरी तीन विहिरी, तीन बोअर्स अाणि गावातील नदीवर कोल्हापुरी बंधारे असल्यामुळे उसाला बाराही महिने पाणी उपलब्ध होते. को ८६०३२ जातीची आडसाली लागवड असते. एकरी सरासरी ८० ते ८५ टन व काही वेळा एकरी १०० टनांपर्यंत उत्पादन घेतले अाहे.

उसासाठी दाही दिशा

 • दररोज ५० टन ऊस गाळपाला लागतो. मजुरांच्या अडचणींमुळे काहीवेळा त्यात खंड पडतो.
 • गरजेनुसार अन्य शेतकऱ्यांकडूनही ऊस अाणला जातो.
 • ऊस तोडणीसाठी दोन टोळ्यांची नेमणूक. वाहतुकीसाठी तीन ट्रॅक्टर, सहा ट्रॉलीज
 • काहीवेळा उचल दिलेली मोठी रक्कम घेऊन मजूर पळून गेल्याचे अनुभव आले. हा तोटा बऱ्याच वेळा सहन करावा लागला.

गुळावर संशोधनाची गरज

गुळातील संशोधनात शेतकऱ्यांचाच अधिक वाटा अाहे. शासनाकडून गुऱ्हाळासाठी शासकीय योजना किंवा मदत दिली जात नाही, असे संदीप म्हणतात. लोह, कॅल्शिअम, ग्लुकोज या घटकांमुळे गूळ लहान मुले, गरोदर मातांसाठी उपयुक्त अाहे. त्याचे महत्त्व वाढण्याची गरज आहे. गुळासह काकवीमध्येही अधिक संशोधनाची गरज ते व्यक्त करतात.

घरच्यांची व ॲग्रोवनची समर्थ साथ

संदीप यांच्या कुटुंबात अाई-वडील, पत्नी मनीषा, भाऊ, भावजय मिळून ११ सदस्य अाहेत. वडील अनंता यांनी संदीप यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून व्यवसायात पूर्णपणे मोकळीक दिली. सर्वांची एकमेकांना साथ मिळते. भावाची प्रवीण व अक्षय ही मुले गुऱ्हाळात मदत करतात. ॲग्रोवन सुरू झाल्यापासून संदीप या दैनिकाचे नियमित वाचक अाहेत. मार्केट, नवे तंत्रज्ञान या विषयांवरील लेख वाचण्यावर त्यांचा भर असतो.

संपर्क ः संदीप नवले- ८१८०००७७९९, ९८२३८५५३८८

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...