agricultural success story in marathi, Sangli agriculture market committe, Custard Apple market | Agrowon

सीताफळ उत्पादकांसाठी हक्काची सांगलीची बाजारपेठ
अभिजित डाके
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

माझी सीताफळाची तीन एकर बाग आहे. येथील बाजारपेठेचा तीन वर्षांपासून आधार घेत आहे. सांगली
जिल्ह्यातील सीताफळासाठी ही एकमेव बाजारेपठ आहे. येथे मालाला मनासारखा दर मिळतो.
-अजय सरगर
करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली

सांगली मुख्य बाजार समितीने सांगली-कोल्हापूर मार्गावर विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार उभारून शेतकऱ्यांसाठी नवी विक्री व्यवस्था उपलब्ध करून दिली. येथे सर्व फळांचे सौदे होतातच; मात्र जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात सीताफळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाजारपेठ हक्काची ठरली आहे. सीताफळासाठी या बाजारपेठेने आपले विशिष्ट स्थान निर्माण केले आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्यांचे सौदे पूर्वी व्हायचे. त्या वेळी फळे, भाजीपाला यांचा बाजार सांगली शहरात पेठभाग, छत्रपती शिवाजी मंडई तसेच रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी भरायचा. या ठिकाणी व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सोयी उपलब्ध नव्हत्या. जागाही अपुरी पडायची. त्यामुळे या शेतमालातील बाजारपेठ नव्या ठिकाणी सुरू करणे आवश्‍यक होते. त्यानुसार सांगली बाजार समितीने १९८८ च्या दरम्यान सांगली- कोल्हापूर मार्गावर सुमारे ११ एकर ३८ गुंठे जागा विकत घेतली. या ठिकाणी पुढे-मागे मार्केटची उभारणी करता येईल, असा विचार होता; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही बाजारपेठ उभी करण्यासाठी वेळ लागला. अशातच तीन ते चार वर्षांचा कालावधी लोटला. शेतकऱ्यांसाठी एका सक्षम मार्केटची आवश्यकता आहे हे लक्षात आले. मग बाजार समितीचे पदाधिकारी आणि व्यापारी महाराष्ट्राचे कै. मदन पाटील यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेले. कै. पाटील हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांचे नातू होते. बाजारपेठ उभारणीसाठी प्रस्ताव पणन मंडळाकडे सादर झाला. त्याचा पाठपुरावाही करण्यात आला. प्रस्ताव मंजूर होण्यास यश मिळाले.

बाजारपेठेची उभारणी
सन १९९५ च्या दरम्यान मार्केट साकारू लागले. केवळ एकरा महिन्यांत त्याची उभारणी झालीदेखील. सन १९९६ पासून सांगली-कोल्हापूर मार्गावर विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार सुरू झाले. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च आला. हळूहळू मार्केटची ओळख सर्वत्र होऊ लागली. अलीकडील काळात सीताफळ राज्यातील शेतकऱ्यांच्या अधिक चर्चेतील फळ आहे. याच सीताफळासाठी या मार्केटने वेगळी अोळख तयार केली आहे.

अशी आहे सीताफळाची बाजारपेठ

 • येथून होते आवक- सांगली जिल्ह्यातील तासगाव, आटपाडी, मिरज, खानापूर, जत आदी तालुके.
 • अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर आजही सीताफळाची झाडे दिसतात. तेदेखील या मार्केटचा फायदा घेतात.
 • तासगाव, मिरज, आटपाडी, तालुक्‍यांत शेतकरी सीताफळाच्या लागवडीत पुढे आले आहेत. त्यामुळे दुय्यम बाजार समितीतील आवक वाढताना दिसत आहे.

लहान मोठे व्यापारी येतात खरेदीसाठी
विक्री करण्यासाठी बहुतांश शेतकरी प्रत्यक्ष येतात. ते थेट बाजार समितीतील अडत्यांकडे जातात. त्यानंतर अडत्यांकडून सीताफळाची प्रतवारी होते. शेतकरीदेखील आपल्या मालाची प्रतवारी करून माल घेऊन येतात. सीताफळाची खरेदी करण्यासाठी परिसरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांची सकाळच्या वेळी लगबग दिसून येते.

सीताफळाला अधिक मागणी कशामुळे?

 • देशी वाणाला अधिक पसंती मिळते.
 • गोडी अधिक
 • नैसर्गिकरीत्या पिकवलेली असतात
 • प्रतवारी केल्याने व्यापाऱ्यांकडून खरेदीस लवकर पसंती

सौद्याची वैशिष्ट्ये

 • वर्षातले ३६५ दिवस भाजीपाला व फळांचे सौदे होतात. (सुटी वगळता)
 • खुल्या पद्धतीने सौदे- सकाळी ८ ते ११ या काळापर्यंत चालतात.
 • देशी वाणाला मागणी अधिक असल्याने स्पर्धा होऊन दर कायम चढे
 • सौदे झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित रक्कम अदा केली जाते.

बाजार समितीतील सुविधा

 • शेतकरी निवास
 • पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे
 • बाजार समितीच्या आवारात काँक्रीटचे रस्ते
 • लिलाव ओटा
 • शुद्ध पाण्याचे ‘वॉटर एटीएम’

बाजार समितीचा विस्तार

 • क्षेत्र ११ एकर ३८ गुंठे
 • प्रत्येक विभाग स्वतंत्र
 • कांदा आणि बटाटा- ३० गाळे
 • फळे- ४८ गाळे
 • भाजीपाला- १४ गाळे
 • लिलावगृह- दोन गाळे

दुय्यम बाजार समितीची उलाढाल- सुमारे १३४ कोटी (२०१६-१७)

सीताफळाचे सौदे व दर (प्रतिडझन)

 • मोठा आकार- (चार डझन पॅकिंग) ३०० रुपये
 • मध्यम आकार- (सहा डझन पॅकिंग) १७० ते १८० रु.
 • लहान आकार- (दहा डझन पॅकिंग) ४० ते ५० रु.

 अलीकडील वर्षातील आवक (डझनामध्ये) तसेच त्यापुढे दर रु. प्रतिडझन

 • २०१३-१४ ७९, ००५  दर- ३० ते ४००
 • २०१४-१५- ७५, १७० दर- २५ ते ३००
 • २०१५-१६ - ६६, ३९०  दर- २५ ते ५००
 • २०१६-१७ ( मार्चअखेरीपर्यंत) एक लाख १० हजार ६९५         दर- २५ ते ७००
 • सन २०१७- एप्रिल ते २५ नोव्हेंबरअखेर ९७ हजार १५०       दर-  ३० ते ६००

प्रतिक्रिया
अत्यंत कमी देखभालीत सीताफळ पीक चांगले येते. शेताच्या बांधावर त्याची लागवड केली आहे. अन्य बाजारपेठेपेक्षा येथील मार्केटमध्ये दोन पैसे अधिक मिळतात.
- प्रकाश नलवडे, मणेराजूरी, ता. तासगाव, जि. सांगली

गेल्या दहा वर्षांपासून सीताफळ घेत आहे. हातविक्री करायची तर अनेक अडचणी येतात. त्यामुळे पाच वर्षांपासून सांगली येथील बाजारपेठेची निवड केली आहे. या ठिकाणी सीताफळे डझनांवर खरेदी केली जात असली, तरी दर नेहमीच चांगले राहतात. चालू हंगामात सातशे रुपये प्रतिडझन असा दर मिळाला.
- सर्जेराव पाटील, आरग, ता. मिरज, जि. सांगली

जिल्ह्यात सीताफळाची लागवड वाढू लागली आहे. त्यामुळे मागणीदेखील वाढली आहे. शेतकऱ्यांचा विश्‍वास बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी संपादन केला आहे. त्यामुळे सौद्यामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार कांदा, बटाट्यासाठी प्रसिद्ध आहे. आता सीताफळासाठी हे मार्केट दिवसेंदिवस प्रसिद्ध होऊ लागले आहे.
- शिवाजी सगरे, अडते, फळ मार्केट सांगली

फळे व भाजीपाल्यांसाठी बाजारपेठ सुरू होऊन सुमारे १७ वर्षे झाली. येथे फळांचे सर्वच सौदे खुल्या पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा वाढण्यास मदत होत आहे.
व्ही. जे. राजेशिर्के, सहाय्यक सचिव,
विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार, सांगली.

संपर्क- ९६६५६२९५९५
कार्यालय-०२३३- २५३१६२३

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
साखर उद्योगासाठी तातडीने प्रयत्न करा :...नवी दिल्ली : अडचणीतल्या साखर उद्योगाला तातडीने...
आदेश पोचले, खरेदी ठप्पच !औरंगाबाद : तूर खरेदीसाठीच्या मुदतवाढीचे आदेश अखेर...
कच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभावनवी दिल्ली ः कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला...
सोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
जालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबलीजालना : येथील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष...
वेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय...सह्याद्रीच्या कडेकपारीत शेकडो वैशिष्ट्यपूर्ण व...
राज्यात ११ ठिकाणी पारा ४२ अंशांवरपुणे : विदर्भ उन्हात होरपळत असतानाच मध्य...
नागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे...पुणे : कृषी विभागातील बदल्यांमागे घडणाऱ्या खऱ्या...
महाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्यपुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने देशात महाराष्ट्र...
रब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ...मुंबई : राज्य सरकारने रब्बी २०१७ -१८ च्या...
शेतकरी, साखर कारखान्यांनी रस्त्यावर...सातारा : केंद्र आणि राज्य सरकार यांचा साखर...
दूधप्रश्नावरील आंदोलनाच्या समन्वयासाठी...नगर : दर मिळत नसल्याने मोफत दूध देऊन आंदोलन...
साखर खरेदी, निर्यात अनुदानावर लवकरच...पुणे : साखर कारखान्यांना मदतीची भूमिका राज्य...
उसाचा तब्बल ११ वा खोडवा !!खेड (ता. कर्जत, जि. नगर) येथील उदयसिंह हिंदूराव...
इंधनाचा भडकाएप्रिल महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश...
हमीभावाने खरेदीत हवी विश्वासार्हताशासनाची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढविण्याच्या...
उन्हामुळे लाही लाहीपुणे : वाढलेल्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत...
साखरेवर कर, इथेनॉलवरील जीएसटी कमी...नवी दिल्ली ः देशात सध्या साखरेचे दर पडल्याने...
तूर खरेदीत राज्याला एक हजार कोटींचा...मुंबई ः अगदी सुरवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात...
व्यावसायिक पिकांसह ‘हायटेक’ फुलशेतीचा...डोंगरकडा (जि. हिंगोली) येथील नागेश खांडरे या कृषी...