agricultural success story in marathi, sangli dist. sangli, Agrowon, Maharashtra | Agrowon

पिवळ्या सोन्यासाठी देशभरात सांगली मार्केटचा डंका
अभिजित डाके
शुक्रवार, 30 मार्च 2018

शंभर वर्षांपूर्वी सांगलीत हळदीची पेठ स्थापन झाली. त्या वेळी केवळ स्थानिक राजापुरी हळदीची खरेदी- विक्री व्हायची. आता केवळ सौदे न राहता सांगली बाजार समिती उतारपेठ म्हणून ओळखू लागली आहे. मोठ्या प्रमाणात हळदीची उलाढाल करणारी ही बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध आहे.

शंभर वर्षांपूर्वी सांगलीत हळदीची पेठ स्थापन झाली. त्या वेळी केवळ स्थानिक राजापुरी हळदीची खरेदी- विक्री व्हायची. आता केवळ सौदे न राहता सांगली बाजार समिती उतारपेठ म्हणून ओळखू लागली आहे. मोठ्या प्रमाणात हळदीची उलाढाल करणारी ही बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध आहे.

हळद बेणे प्रसार
सांगली बाजार समितीत व्यापारी आणि शेतकऱ्यांचे वेगळे नाते तयार झाले आहे. खरेदी- विक्रीच्या माध्यमातून कर्नाटकातील शेतकऱ्यांशी संबंध येत गेले. तसे व्यापाऱ्यांनी रायबाग, विजापूर, अथणी, जमखंडी या भागांतील शेतकऱ्यांना हळदीचे बेणे दिले. हळद लागवड प्रोत्साहनासाठी सांगलीचा मोठा वाटा आहे. सेलम, आंध्र प्रदेश येथूनही बेणे कर्नाटकात जाण्याचे प्रमाण वाढले.
 
साठवणुकीचे तंत्र  
पूर्वी शेतकरी हरिपूर (जि. सांगली) येथील पेवात हळद ठेवायचा. दरात वाढ झाली की विक्री करायचा. मात्र २००५ च्या दरम्यान महापुरात पेव खराब झाली. आता सांगली बाजार समितीतील वेअर हाऊस आणि शीतगृहात साठवणूक होते. ‘वेअर हाऊस’मध्ये कीड लागू नये म्हणून ‘फ्युमिगेशन’ केले जाते.  

प्रतवारी
प्रतवारीमुळे जादा दर मिळतोय हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

पूर्वी  सध्या            
७ टक्के     २० ते २५ टक्के

प्रतवारी करणारे शेतकरी 
त्यामुळे मिळणारा दर

१००० ते १५०० रु. प्रति क्विंटल

 
                      
राजापूरी हळद  : सांगली बाजारातील आवक क्विंटल व दर रुपये

वर्ष            आवक   किमान   कमाल      सरासरी
२०१३-१४    ५५७६०७    १५३५    १५६००      ६५४०
२०१४-१५   ६६६२०७    ४०००    १६२५०      ७६१९
२०१५-१६ ७७४२६२   ५०००   १८४००   ९६७६
२०१६-१७   ५१४१८६    ७६३६ ११४६४   ९४४४

परराज्यातील हळद

२०१३-१४ २०५४७६     ४२००        १०३००  ६४८२
२०१४-१५   ४०३७९६     ४०००    १४१००   ६५१०
२०१५-१६     १६२३४६     ४०००    १२००   ८४५८
२०१६-१७     ११०८८८   ६९६४  ८९३१   ७९३४

यंदाच्या २२ मार्चअखेर - परराज्यातील व राजापूरी हळद  

आवक   किमान    कमाल   सरासरी
१०३९४५९     ६०६५  ११३४८    ८७०७

प्रतिक्रिया :
चाळीस वर्षांपासून हळद घेतोय. साहजिकच या पिकातील मार्केटचा चांगला अभ्यास आहे. बाजार पेठेची मागणी, दर यानुसार लागवडीचे नियोजन करतो. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने काढणीही सोपी होते. या बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळतो.  बाळासो साळुंखे, वडगाव हवेली, ता. कऱ्हाड, जि. सातारा.
 
गेल्या चार वर्षांपासून या बाजारात येतो. हळदीचा उठाव त्वरीत होतो. गेल्यावर्षी उत्पादन अधिक झाल्याने हळद शिल्लक आहे. यंदाच्या हंगामात दर कमी आहेत.
राजाप्पा कुलीकट्टी,पामलदेणी, ता. गोकाग

निर्यात

 • आखाती देश
 • युरोप
 • जपान
 • सांगलीतून मुंबईतील मध्यस्थांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होतो. थेट निर्यात होत नसल्याने सांगलीतील व्यापारी त्यांच्याशी संपर्कात असतात.

हळद बाजार येथून येते  
राजापूर (स्थानिक), आंध्र प्रदेशातून निजामाबाद, कडपा, सदाशिवपेठ'', कडप्याचा कडपा'' असे स्थानिक नावांसह प्रकार

मोठ्या प्रमाणात आवक  
जानेवारी, फेब्रुवारी व मार्च

खुले सौदे

 • दिवसातून दोन वेळा  
 • त्यानंतर तातडीने रक्कम दिल्याने 
 • शेतकऱ्यांचाही फायदा

बाजार समिती वैशिष्ट्ये  

 • ९९ एकरांत बाजार समितीचा विस्तार
 • शेतकऱ्यांसाठी पाच रुपयांत जेवणाची सुविधा
 • महाराष्ट्रातील प्रमुख उतारपेठ म्हणून प्रसिद्ध
 • संपूर्ण शेतमाल सौद्यावर बाजार समितीचे नियंत्रण
 • खुले लिलाव व खुल्या करार पद्धतीने विक्री
 • मालाच्या प्रतवारीसाठी सोय
 • गूळ व अन्य मालासाठी शेकडा ८० पैसे सेस

बांधावर खरेदी करण्याची कारणे

 • मजुरांची कमतरता
 • वाहतूक खर्चात बचत
 • रोखीने व्यवहार होत असल्याने लगेच पैसे

मार्केट ट्रेंड

 • सांगलीच्या हळद बाजारातील दरावरच देशातील हळदीचे दर ठरले जातात.
 • २००३ ते २०१०- बाजार समितीत आवक- साडेचार लाख पोती
 • क्षेत्रवाढीनंतर वार्षिक आवक- १५ लाख पोती
 • पुढे दरातील चढ उतारांमुळे त्यात फार वाढ नाही.
 • गेल्या दोन वर्षांपासून १२ ते १५ लाख पोत्यांची आवक
 • शेतकरी मार्केटचा अभ्यास करू लागला आहे. मागणी स्थिर आहे. दरवर्षी क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होते. यामुळे हळद शिल्लक राहू लागली आहे.

कर्नाटकापेक्षा सांगलीच चांगली 
कर्नाटक राज्यात हळदीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षापासून बंगळूर येथील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून विना पॉलिश हळदीची खरेदी करु लागले आहेत. तेथे शेतकऱ्यांना ५५०० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे. बांधावर खरेदी असली तरी सांगली बाजारापेक्षा सरासरी पंधराशे रुपये हा दर कमीच असल्याने शेतकरी आजही सांगली बाजारपेठेचाच आधार घेत आहे.  

संपर्क :  सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली ०२३३- २६७०१४३
संपर्क : : एन. एम. हुल्याळकर उप सचिव, ९८९०६५२३४५
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...