agricultural success story in marathi, Shankarpurwadii, Tal. Khultabad, dist. Aurangabad, Agrowon, Maharashtra | Agrowon

इथे नांदतात हापूस, केसर, रत्ना, पायरी गुण्यागोविंदाने
संतोष मुंढे
शुक्रवार, 8 जून 2018

औरंगाबाद जिल्ह्यात खुल्ताबाद तालुक्‍यातील शंकरपूरवाडी शिवारात डोंगराच्या पायथ्याशी विविध प्रकारच्या आंबा जातींची सुमारे चारशे झाडांची आमराई अनिल परांजपे यांनी वसविली आहे. पाडाला आल्यानंतरच रसाळ, चवदार व अधिकाधिक सेंद्रिय आंब्यांची विक्री ते करतात. थेट विक्रीतूनही त्यांनी फळांना मार्केट तयार केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात खुल्ताबाद तालुक्‍यातील शंकरपूरवाडी शिवारात डोंगराच्या पायथ्याशी विविध प्रकारच्या आंबा जातींची सुमारे चारशे झाडांची आमराई अनिल परांजपे यांनी वसविली आहे. पाडाला आल्यानंतरच रसाळ, चवदार व अधिकाधिक सेंद्रिय आंब्यांची विक्री ते करतात. थेट विक्रीतूनही त्यांनी फळांना मार्केट तयार केले आहे.

सहायक प्राध्यापक ते शेतकरी मूळचे कोकणचे (राजापूर) असलेले अनिल वामन परांजपे आज अौरंगाबाद जिल्ह्यातील शंकरपूरवाडी (ता. खुल्ताबाद) येथे स्थायिक झाले. त्यांची इथे नांदणारी ही तिसरी पिढी. आजोबा या भागात आले ते इथेच स्थायिक झाले. अनिल यांनी १९८४ ते १९८८ या काळात दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदी नोकरी केली. परंतु नोकरीत मन न रमल्याने राजीनामा देऊन शंकरपूरवाडी येथील शेतीतच राबण्याचा निर्णय घेतला.
 
फुलवली आमराई

आजोबांनी इथे घेतलेल्या शेतीत आंब्याची जवळपास तीनशे झाडे होती. हापूस, निलम, लंगडा, बोरस्या, मलगोबा, तोतापरी, दिलपसंद, गधेमार, पायरी, अमृत, दूधपेढा अशा ५० ते ६० प्रकारच्या वाणांचा समावेश होता. आपल्या कृषी शिक्षणाचा उपयोग करून आमराई विकसित करण्यासाठी अनिल यांनी  प्रयत्न सुरू केले. केसर, हापूस, रत्ना हे वाण कोकणातून आणून वाढविले. काहींचे कलमीकरण केले. कोयींच्या माध्यमातूनही वृद्धी केली.
 
जुने वाण जपले

 • तीस बाय ३० फूट अंतरावर लागवड. सन १९९० ते १९९३ या काळात दहा एकरांवर आंबा बागेचा विस्तार. जुने वाण नष्ट होणार नाहीत याचीही घेतली खबरदारी.  
 • बागेत शंभरावर अशी झाडे की त्यांनी १९७२ चा दुष्काळ सोसला.
 • सुरुवातीच्या पाच वर्षांच्या काळात मिळालेले उत्पन्न बागेच्या नियोजनासाठी वापरून नव्या वाणांची लागवड   

पाण्याचे नियोजन

 • सन १९९० ते १९९५- पाच वर्षे ठिबकने पाणी. त्यानंतर पारंपरिक पद्धत व निसर्गाच्या भरवश्‍यावर बाग सोडण्याचा निर्णय. त्यामुळे झाडांना पाण्याचा ताण सोसण्याची व त्यातून तरण्याची सवय झाली.
 • फळे बोराएवढी झाली की पाणी सुरू तर पाड लागण्याच्या एक महिन्याआधी बंद.
 • बहार नियोजनानुसार एप्रिल अखेरपर्यंत पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा पाणी. या नियोजनामुळे फळगळ थांबून फळे देठाला पक्‍की होत असल्याचा अनिल यांचा अनुभव. दोन विहिरी दिमतीला.

  ठळक बाबी

 • अधिकाधिक सेंद्रिय व्यवस्थापन. मोहोर येण्याआधी व फळसेटिंगनंतर अशा दोन वेळा कीडनाशकांची फवारणी.
 • आंतरमशागतीवर विशेष भर. जमीन भुसभुशीत राहण्यासाठी विशेष काळजी.
 • झाडाखाली पडणारा पालापाचोळा जागेवरच कुजविला जातो. तीस वर्षांच्या कारकिर्दीत रासायनिक खते अत्यंत कमी किंवा शक्यतो नाहीच. शेणखताचा चांगला वापर.
 • खर्चाच्या मागे लागून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न नाही.  

तीस एकर शेती बटईने

तीस एकर शेती बटईने. पाच कुटुंबे ती कसतात. बटईदारांची दुसरी पिढी परांजपे यांच्या शेतात राबते आहे. त्यांच्यावर टाकलेला विश्वासच महत्त्वाचा ठरला. या शेतीत बाजरी, मका, तूर, गहू, हरभरा आदी पिके.
 
परांजपे यांची यशाची पाच गृहितके

 • फळबाग, वर्षाचं पीक, धान्यपीक, भाजीपाला आणि जनावरे.
 • यातील कोणतीही तीन फायद्यात तर दोन तोट्यात असा अनुभव.  
 • दरवर्षी पन्नास हजारांपर्यंत खर्च तर तीन लाखाचं उत्पन्न आंबा बाग देते.  
 • नियमांना कडक पण स्वभावाने दिलदार स्वभावाचे अनिल सर्वांनाच सक्षमपणे उभे करण्याचे काम करतात. पुढच्या पिढीला सकस जमीन देण्याची त्यांची धडपड.  
 • सगळी शेती तोट्यात गेली तरी जास्त वर्षे जगणाऱ्या फळपिकांनी अनेकदा साथ दिल्याचा त्यांचा अनुभव सांगतो.

पुढच्या पिढीला शेतीची आवड
अमेरिकेत वैद्यकशास्त्राची पदवी घेतलेला मुलगा तर कायद्याची पदवीधर मुलगी अशा दोघांनाही शेतीची विशेष आवड आहे. पुढच्या पिढीची नाळ शेतीशी जुळवून ठेवण्याचे काम परांजपे दांपत्याने केले आहे.

आंबा झाडांची संख्या (सुमारे)
हापूस :१००
रत्ना : ५०  
केसर : ५०
गावरान : २००  

नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले किंवा पाडाला आल्यानंतरच विक्री. त्यामुळे रसाळ, चवदार, गोड चवीचे आंबे ग्राहकांना मिळतात.

दर- किलोचे

 • केसर, रत्ना - १०० रु. हापूस- २०० रु.
 • वर्षाला विक्री - एक ते दीड टन  
 • औरंगाबादच्या जाधव मंडीतही दहा ते वीस टन आंब्यांची ठोक विक्री. गावरान आंब्यांना सहा ते दहा रुपये प्रतिकिलो दर  
 • काही वर्षांपूर्वी ३०० किलो केसर आंब्यांची लंडनला पणन विभागाच्या साह्याने निर्यात
 • हे व्यावसायिक फक्त परांजपे यांचेच आंबे विकतात. त्यांना मार्केटिंगमध्ये परांजपे यांनी तयार केले आहे.

आंबा- मार्केटिंग- विक्री
अौरंगाबाद : डिपार्टमेंटल स्टोअर, चष्मा दुकान अशी थेट विक्रीची दोन ठिकाणे

उत्पन्न देतेय जांभूळ

 • आंब्याचा मोसम संपला की जांभळांचा हंगाम सुरू.  
 • चाळीस एकरांत बांधावर- जांभूळ- ३० झाडे- उत्पादन- ३ टन-दर ५० ते १०० रु. प्रति किलो.
 • एका व्यक्‍तीकडून दरवर्षी व्यवस्थितरीत्या काढणी करून घेतात.

अंजलीताईंची समर्थ साथ
प्राध्यापक पदाची नोकरी सोडून शेतीची जोखीम स्वीकारणाऱ्या अनिल यांच्या पाठीशी पत्नी अंजली खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या साथीमुळेच आपण शेती कसू शकलो, जगण्याचा खरा आनंद मिळाला, असं अनिल अभिमानानं सांगतात.

झाड तोडायचे नाही हा नियम
शेतातील धुऱ्या-बांधावर वाढलेले कोणतेही झाड तोडायचे नाही हा नियम अनिल यांनी सर्वांसाठी घालून दिला आहे. त्यामुळेच शिवारात बोरी, बाभळीसह विविध झाडांची संख्या लक्षणीय दिसते.

संपकर्  : अनिल परांजपे, ७५८८८१८३९४, ७०३०४०९४३०  

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...