agricultural success story in marathi, Story of Sahiwal club, santosh raut, pune | Agrowon

दूध, तूपनिर्मितीसह जमिनीच्या सुपीकतेचे ध्येय
अमित गद्रे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

शेतीचेही आरोग्य जपतो
साहिवाल क्लबचे अध्यक्ष संतोष राऊत म्हणाले की दूध, तूप उत्पादनाबरोबरच शेती, आरोग्य आणि ऊर्जा या बाबींच्या अनुषंगाने साहिवाल गाय संवर्धनाकडे पाहातो.

  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कृषी पदवीधर, प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येत देशी गोवंशसंवर्धनासाठी ‘साहिवाल क्लब` स्थापन केला. जातिवंत दुधाळ साहिवाल गाईंचे संगोपन, दूध, तूपनिर्मिती; तसेच गोबरगॅस, शेतीसाठी सेंद्रीय खत आदी विविध उद्दिष्टांसह गटातील सदस्यांनी या क्षेत्रात भरीव वाटचाल सुरू केली आहे.
 
देशी गोवंशाचे महत्त्व वाढू लागले आहे. त्यातीलच एक साहिवाल गोवंशसंवर्धनासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कृषी पदवीधर आणि प्रयोगशील शेतकरी सुमारे एक वर्षापूर्वी एकत्र आले. त्यांनी गटाला ‘साहिवाल क्लब’ असे नाव दिले. त्याचे सध्या ५२ सदस्य अाहेत. शेतीत प्रयोगशीलता सांभाळण्याबरोबरच गोसंवर्धन व शास्त्रीय नोंदी ठेवू शकणाऱ्यांनाच क्लबचे सदस्य करण्यात आले आहे.

 • साहिवाल गायीचे वैशिष्ट्य
 • राजस्थान, हरियाना, पंजाब राज्यातील या गायीच्या दुग्धोत्पादनात कडाक्याची थंडी, पाऊस तसेच उष्ण तापमानातही सातत्य
 • काटक, रोगप्रतिकारशक्ती चांगली

असा आहे ‘साहिवाल क्लब’
गटाचे मार्गदर्शक सदस्य आणि पुणे कृषी महाविद्यालयातील पशुतज्ज्ञ डॉ.सोमनाथ माने म्हणाले की साहिवाल गाय आपल्या राज्यातील वातावरणात चांगल्या प्रकारे रूळू शकते हे अभ्यासातून लक्षात आले. त्यानंतर कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेला (एनडीआरआय) भेट देऊन तज्ज्ञांशी चर्चा केली. हरियाना राज्यातील पशुपालकांच्या भेटी घेतल्या. सन २०१५ मध्ये हरियाना राज्यातील पशुसंवर्धन विभागाची अधिकृत संमती व कागदपत्रांची पूर्तता करून पहिल्या वेताच्या १८ गाभण साहिवाल गायी आणल्या. गाय गोठ्यात येईपर्यंत सुमारे साठहजार रुपयांपर्यंत खर्च आला. यात गायीची खरेदी, आरोग्य, जनुकीय आणि दूध गुणवत्ता तपासणी व शासकीय परवान्याचा समावेश आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर भागातील सदस्यांना प्रत्येकी दोन ते चार गायी संगोपनासाठी दिल्या. आपल्या वातावरणात रुळल्या. तीन महिन्यांत त्यांच्या आरोग्यात चांगली सुधारणा झाली. सुदृढ वासरे जन्माला आली. पहिल्या वेताच्या गायीचे प्रतिदिन सरासरी ६ ते ८ लिटर दुग्धोत्पादन आहे. पुढे ते वाढते. बारामती, इंदापूर, मुळशी, दौंड, शिरूर, सासवड, हवेली तालुक्यातील सदस्यांना साहिवालच्या रेतमात्रा देतो. व्हॉट्सॲपवर तांत्रिक माहितीही दिली जाते.

गायींची गुणवत्ता

 • एनडीडीबीतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार हरियाना, पंजाबमधील पशुपालकांकडून पहिल्या वेताच्या जातिवंत दुधाळ साहिवाल गायी आणल्या जातात.
 • ब्रुसोलेसीस, टीबी, जॉन डिसीज आदी रोगांबाबत पशुवैद्यकांकडून तपासणी.
 • हिस्सार कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागाच्या प्रयोगशाळेत दूध गुणवत्ता तपासणी.
 • राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेत गायींची जनुकीय (डीएनए) तपासणी.
 • एनडीआरआय, एनडीडीबी संस्थेतून साहिवाल रेतमात्रांची खरेदी. त्यामुळे दुग्धोत्पादन सातत्य आणि वाढ.
 • प्रत्येक गायीची स्वतंत्र नोंद. शास्त्रीय पद्धतीने संवर्धन.
 • परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत देशी गाय व्यवस्थापन तंत्राचा प्रसार.

गायींच्या व्यवस्थापनाविषयी

 • हरियानातून गाय आणतानाच टॅगिंग क्रमांक. त्यानुसार रोजचे दूध उत्पादन, आहार, वासराचे वजन, लसीकरण, जंतनिर्मूलन, व्यायल्यानंतर गाईने किती दिवसांनी माज दाखविला, रेतनाची तारीख,गाय कधी व्यायली याची स्वतंत्र नोंद
 • गटातील बहुतांश सदस्यांमार्फत मुक्त संचार पद्धतीने व्यवस्थापन
 • घरच्या घरी पशुखाद्यनिर्मितीचे मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार दूध उत्पादक विविध खाद्यघटकांचा वापर करून पशुखाद्यनिर्मिती करतात.
 • साहिवाल गायीत रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. तज्ज्ञांच्या सल्याने कोरफड, शतावरी, हळद, शेवगा,कडीपत्ता या सारख्या औषधी वनस्पतींचा उपचारात वापर करतो.
 • शिफारशीनुसार लसीकरण. प्रतिगाय वर्षाला एक हजार रुपये औषधोपचार खर्च
 • महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार संकरित नेपियर (फुले जयवंत), लसूण घास (आरएल८८), मारवेल (मारवेल-४०), स्टायलो (फुले क्रांती) आदी चारापिकांची लागवड गटातील सदस्यांनी केली आहे.
 • गोठा भेट, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन
 • केवळ दूध, तूप उत्पादनाचे उद्दिष्ट न ठेवता दूधप्रक्रिया, गोबरगॅस, गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी तसेच गोमूत्र अर्क आदींचीही निर्मिती व त्यातून नफावाढ.

दूध, तूप विक्रीतून नफ्यात वाढ
डॉ. माने म्हणाले की पहिल्या वेताच्या गायीपासून प्रतिदिन ६ ते ८ लिटर दुग्धोत्पादन मिळते. पुढील काळात हेच उत्पादन १० ते १२ लिटरपर्यंत मिळेल. दुधाचे फॅट ४.५ ते ५.२, एसएनएफ ९ च्या दरम्यान आहे. प्रत्येक सदस्याकडे २ ते ४ गायी आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांकडून दुधाला मागणी वाढत आहे. पुणे शहराजवळचे पशुपालक एकत्रितपणे शहरात दररोज २०० लिटरपर्यंत दूध विक्री करतात. काही तूपनिर्मिती तर काही पनीरनिर्मितीमध्ये उतरत आहेत. ग्रामीण भागात दुधाला ६० ते ६५ रुपये तर शहरात ८० ते ९० रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. तुपाची २५०० ते ३००० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते.

  बहुविध फायद्यांसाठी साहिवाल
साहिवाल क्लबचे अध्यक्ष संतोष राऊत म्हणाले की दूध, तूप उत्पादनाबरोबरच शेती, आरोग्य आणि ऊर्जा या बाबींच्या अनुषंगाने साहिवाल गाय संवर्धनाकडे पाहातो. बहुतांश सदस्यांनी बायोगॅस युनिट उभारले आहेत. गॅस स्वयंपाकासाठी उपयोगात येतो. स्लरीपासून गांडूळ खत निर्मिती होते. बायोगॅस स्लरीमध्ये पीएसबी, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम जिवाणू संवर्धक मिसळतो. डाळिंब, द्राक्ष, केळी, सीताफळ, भाजीपाला पिकांत त्याचा वापर करतो. या सेंद्रीय घटकांमुळे मुळे जमिनीचा पोत सुधारण्यास चालना मिळणार आहे. रासायनिक खते, कीडनाशकांच्या वापरात बचत होत असून मालाची गुणवत्ता चांगली मिळत आहे. नुकताच मी ब्राझीलचा दौरा केला. तेथील पशुपालकांनी गीर, रेडसिंधी, कॉंक्रेज या भारतीय गायी चांगल्या पद्धतीने सांभाळलेल्या आहेत. तेथील गीर गाय दररोज सरासरी १५ लिटर दूध देते. काही शेतकऱ्यांकडे प्रतिदिन ३० लिटर दूध देणाऱ्याही गायी आहेत. त्यांनी शुद्ध गोवंश संवर्धन, आहार व्यवस्थापन, जातिवंत वळू संगोपनावर भर दिला आहे.

संपर्क ः संतोष राऊत- ९८६००६४४४४
डॉ.सोमनाथ माने ः ९८८१७२१०२२

 

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...