agricultural success story in marathi, Takli Miya and Devlali Pravra dist. Nagar | Agrowon

श्रम, मजुरी, वेळ, पैसा वाचविणाऱ्या विविध सुलभ यंत्रांची निर्मिती
अनिल देशपांडे
सोमवार, 8 जानेवारी 2018

नगर जिल्ह्यातील टाकळी मिया येथील प्रसाद देशमुख व शेजारील देवळाली प्रवरा गावातील त्यांचे सहकारी सौरभ कदम यांनी एकत्रितपणे व आपल्या गरजांमधून कल्पकतेने काही शेती अवजारे तयार केली आहेत. कांदा, हरभरा, ऊस आदी नेहमीच्या पीक उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ, मजूर बळ व पैसा या घटकांमध्ये मोठी बचत साधणारी ही सुलभ यंत्रे आहेत. निर्मितीचा लाभ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता अन्य शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल याचा प्रयत्न ते करताहेत.
 

नगर जिल्ह्यातील टाकळी मिया येथील प्रसाद देशमुख व शेजारील देवळाली प्रवरा गावातील त्यांचे सहकारी सौरभ कदम यांनी एकत्रितपणे व आपल्या गरजांमधून कल्पकतेने काही शेती अवजारे तयार केली आहेत. कांदा, हरभरा, ऊस आदी नेहमीच्या पीक उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ, मजूर बळ व पैसा या घटकांमध्ये मोठी बचत साधणारी ही सुलभ यंत्रे आहेत. निर्मितीचा लाभ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता अन्य शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल याचा प्रयत्न ते करताहेत.
 
नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा भागात शेतकरीराजा पुरुष बचत गट कार्यरत आहे. परिसरात प्रसिद्ध असलेले प्रयोगशील शेतकरी नितीन ढूस हे गटाचे अध्यक्ष आहेत. याच गावचे सौरभ कदम व टाकळी मिया येथील प्रसाद देशमुख हे गटाचे सदस्य आहेत. या परिसरात ऊस, कांदा, हरभरा अशी पिके घेतली जातात. या पिकांमधील विविध कामांसाठी मजुरांची गरज जास्त लागते. त्यासाठी मजुरीचा खर्च जास्त तर येतोच, परंतु बऱ्याचदा मजुरांची उपलब्धताही वेळेवर होत नाही. कामे खोळंबून राहतात. शेतकरी राजा बचत गटातील सदस्यांत यावर नेहमी चर्चा व्हायची.

यांत्रिकीकरणातून समस्येवर उपाय
सौरभ व प्रसाद अशा दोघांनाही यंत्रनिर्मितीची आवड होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येवर यंत्रांच्या माध्यमातून काही उपाय शोधता येईल का याचा ते सतत विचार करीत. सौरभ हे ‘एमटेक’ (सिव्हील) आहेत. त्यामुळे त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा मोठा फायदा होणार होता. दोघे एकत्रपणे सातत्याने चर्चा करीत. यंत्रनिर्मितीचे वेगवेगळे प्रयोग करीत. त्यातून आपल्या शेतातील गरजांनुसार काही यंत्रे विकसित करणे त्यांनी शक्य केले. गटाचे प्रमुख नितीन व अन्य सदस्यांशीही याबाबत वेळोवेळी चर्चा व्हायची.

दोघा मित्रांनी तयार केलेली यंत्रे व वैशिष्ट्ये
टॅक्टरवरील फवारणी यंत्र.
याची निर्मिती करण्यासाठी सुमारे तीस हजार रुपये खर्च आला. यात एचटीपी पंप, प्लॅस्टिकची टाकी व फवारणी पाइप असा संच आहे. यात फवारणी जसजशी करीत शेतातून पुढे जाऊन तसतशी नळी पुढे येत जातेच. मात्र काम संपल्यानंतर ती यांत्रिक पद्धतीने गुंडाळण्याची व्यवस्था केली आहे. इथे मजूर बळ वापरण्याची गरज नाही. स्पे गन किंवा बूम नोझल लावून फवारणी करता येते. यात दोन तासात सुमारे पाच एकर क्षेत्र फवारून होऊ शकते.

अशी झाली बचत
पूर्वीचा पाच एकरांत फवारणी खर्चातील मजुरी खर्च पुढीलप्रमाणे यायचा. पाणी वाहण्यासाठी दोन मजूर, कीडनाशक पुरवणे, फवारणी मजुरी असा सुमारे २००० रु. फवारणीसाठी वेळही चार ते पाच तास लागायचा. आता यंत्राद्वारे फवारणी करताना दोनच मजुरांची गरज पाच एकरांसाठी पुरते. तसेच मजुरीचा खर्च निम्म्याहून अधिक कमी होतो. शिवाय वेळेचीही मोठी बचत होते. गटातील महेश वाळुंज यांना १४ एकरांवरील कांदा पिकातील फवारणीसाठी हे यंत्र वापरले. या यंत्राद्वारे फवारणी पुरेशा दाबाने होते. फवारणीच्या गुणवत्तेतही खूपच फरक पडल्याचा त्यांचा अनुभव आहे. फवारणीनंतर पाइप गुंडाळणे मजुरांना बरेचसे कष्टाचे असते. आता तोही त्रास वाचला आहे.

कांदा रोपवाटिका पेरणी यंत्र ः
हे एका मनुष्याकरवी चालवण्याचे सुलभ यंत्र आहे. रोपवाटिकेसाठी रोपे तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो. यंत्र बनविण्यासाठीचा खर्च सुमारे नऊ हजार रुपये आला आहे.

पारंपरिक मजुरांकरवी बियाणे वापर पद्धत
पारंपरिक पद्धतीत हाताने बियाणे टाकले जाते किंवा फोकून दिले जाते. त्यामुळे मजुरांवरच अवलंबून राहणे क्रमप्राप्त असते. मजूर कुशल नसल्यास एकसारखे बियाणे टाकले जात नाही. कुठे ते दाट तर कुठे विरळ पडते. त्याचा कांदा रोपांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. मजुरांच्या कामावर देखरेख टेवण्याची गरज भासते. साधारण दहा किलो कांदा बियाणे टाकण्यासाठी १३ मजूर लागतात. त्यांची मजुरी प्रति दोनशे रुपयांप्रमाणे २६०० रुपये होते. देखरेखीसाठीची मजुरीचे मूल्य ३०० असे एकूण २९०० रुपये होतात. हाताने बी फोकल्यास पूर्ण लागवडीसाठी चार ते पाच किलो बियाणे लागते.

यंत्राद्वारे पेरणी पद्धतीचे फायदे

  • कमी वेळेत जास्त बियाणे पेरले जाऊ शकते.
  • एक मजूर एका दिवसात आठ ते नऊ पायली म्हणजेच तीस किलो बियाणे सहज पेरू शकतो. याचा खर्च फार तर पाचशे रुपयांपर्यंत येऊ शकतो.
  • बियाणे एकसारखे पेरले जाऊन मातीआड होते. त्यामुळे दीड ते दोन किलो बियाणे एका
  • एकरासाठीची रोपे तयार करण्यासाठी पुरेसे ठरते. एकसारखी दर्जेदार रोपे तयार होतात.
  • यात बियाण्यांवरील व मजुरीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचतो.

शेतकरी अनुभव
राहुरी येथील संजय डौले यांनी कांदा रोपवाटिका यंत्राद्वारे केला. फोकून देण्याच्या पद्धतीत दुप्पट बियाणे लागत होते. यांत्रिक पद्धतीत ते कमी लागले. पारंपरिक पद्धतीत जिथे दीड एकरासाठीची कांदा रोपे मिळाली असती तेवढ्याच बियाण्यात तीन एकरांसाठीची रोपे मिळतील. रोपवाटिका एक एकरावर करण्यासाठी सुमारे ५७ मजूर व ३४२ मनुष्य तास लागले. त्यासाठी नऊ हजार रुपये टेम्पोने मजूर बळ आणणे असा सर्व मिळून दहा हजार रुपये खर्च आला. यंत्राकरवी दीड दिवसात एक एकरासाठी रोपवाटिकेचे बी पेरले गेले. यंत्राच्या पेरणीत वेग वाढला. मजुरीचा खर्च व कालावधी यात मोठी बचत झाली.

बहुद्देशीय टोकण यंत्र
हरभरा, सोयाबीन, छोटी भाजीपाला पिके, मेथी, धने, घास आदी पिकांसाठी याचा वापर करता येतो. यात साडेचार फुटी बेडचा वापर केला जातो. यात एक मनुष्य दिवसभरात यंत्राद्वारे ३० ते ४० किलो बियाणे टोकण करू शकतो. पूर्वी हेच काम करायला एका दिवसात सुमारे पंधरा मजूर लागायचे व साधारण १० किलो बियाणे टोकून व्हायचे.

  • उसात सोयाबीन वा हरभरा आंतरपीक घ्यायचे असल्यासही या यंत्राचा वापर करता येतो.
  • यंत्राद्वारे कामाचा वेग वाढतो. वेळेत बचत होते. पेरणी एकसारखी होऊन एक ते दीड इंच माती खाली जाते. रोपांची उगवण चांगली होते.
  • या पद्धतीत पिकाच्या गुणवत्तेतही खूप फरक पडला. मजूर समस्येवर पर्याय सापडला.

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार
प्रसाद म्हणाले की, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या रोजच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन त्याला वापरता येतील अशी यंत्रे विकसित करण्यावर आम्ही भर दिला आहे. कांदा रोपे पुनर्लागवड करण्याचे यंत्रही विकसित करण्याचे काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना यंत्रांची गरज आहे त्यांना ती उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी साह्य करू. आमच्या गटातील शेतकरी सध्या त्यांचा वापर चांगल्या पद्धतीने करीत आहेतच.

संपर्क ः प्रसाद देशमुख, ९९२२७०८४५७
सौरभ कदम, ९७३०१२३००५

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...